वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक १६ रोजी सौ सपना ओसवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.
उमेदवार सौ सपना ओसवाल या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय सामाजिक कार्यकर्ते नितीन ओसवाल यांच्या पत्नी आहेत
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.
No comments:
Post a Comment