कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी समाधान चव्हाण व त्यांच्या बंधूनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहे. त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.
No comments:
Post a Comment