Sunday, November 16, 2025

कराडच्या प्रभाग क्रमांक 7 मधून विद्या मोरे यांचा अपक्ष अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक १६ रोजी सौ.विद्या मोरे यांनी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.

No comments:

Post a Comment