वेध माझा ऑनलाइन।
भाजप चा उमेदवार कोण? याबाबत शहरात बरेच दिवस ससफेन्स होता मात्र आज तो ससफेन्स खुलल्याचे स्पष्ट झाले आहे...अण्णा पावसकर यांचे नाव कराडच्या नगराध्यक्ष पदासाठी फायनल झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे
कराडच्या नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजेंद्रसिह यादव यांच्या नावाचीघोषणा शिवसेनेच्या मेळाव्यात करण्यात आली होती मात्र भाजप कडून कोण उमेदवार असेल?याबाबत मोठा सस्पेन्स ठेवण्यात आला होता आज तो संस्पेन्स ओपन झाला आहे विनायक पावसकर यांच्या नावावर भाजप कडून या पदासाठी शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक बातमी मिळाली आहे
अण्णा पावसकर हे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून परिचित आहेत हिंदू एकता आंदोलन महाराष्ट राज्याचे ते उपाध्यक्ष आहेत हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे सलग 8 ते 9 वेळ नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी कराड शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून उठावदार काम सातत्याने केले आहे अनेक महत्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आपली ठाम आणि स्पष्ट भूमिका घेत शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे
आगळी वेगळी शिवजयंती साजरी करून संपूर्ण राज्यात कराड शहराचे नावलौकिक मोठा करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे
त्यांचे चिरंजीव भाजप चे राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे देखील ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नेते म्हणून राज्यात ओळखले जातात
अण्णा पावसकर यांचा हिंदुत्ववादी चेहरा भाजपने या पदासाठी जाहीर केला असल्याने भाजप च्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे
तसेच भाजप ने हिंदुत्ववादी कार्ड या निवडणुकीत त्यांच्या रूपाने बाहेर काढल्याने ही निवडणूक अधिकाधिक रंगत भरणारी ठरणार! एवढे मात्र नक्की झाले आहे.
No comments:
Post a Comment