Sunday, August 31, 2025

विक्रम पावसकर व अजय पावसकर यांच्या वतीने कराडकरांसाठी तीन समाजोपयोगी उपक्रम जाहीर , फिरता दवाखाना, आजी-आजोबा, महिला व तरुणींसाठी आरोग्य योजना

वेध माझा ऑनलाईन
गेली पन्नास वर्षे कराडच्या सामाजिक जीवनात सक्रिय असणारे हिंदुत्ववादी नेते व ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांची सुपुत्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर व अजय पावसकर यांच्या वतीने कराडकरांसाठी तीन समाजोपयोगी उपक्रम जाहीर करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणाऱ्या सेवा सप्ताहात 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान या योजना कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
याबाबतची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, विनायक पावसकर, हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक चंद्रकांत जिरंगे, भाजपचे शहराध्यक्ष सुषमा लोखंडे, अजय पावसकर उपस्थित होते .

अजय पावसकर यांच्या प्रयत्नाने मातृशक्ती आरोग्य भेट योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पंधरा वर्षांच्या पुढील लाडकी आई व ताई यांना सिंदूर हेल्थ कार्ड देण्यात येईल. या कार्डधारक महिलांची तीन महिन्यातून एकदा डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या कार्डधारक महिलांना वर्षातून एकदा पर्यटन सहलीचा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ देण्यात येणार असून दीपावली निमित्त भेटवस्तू देण्यात येणार आहे.

लाडके आजी आजोबा यांच्यासाठी अण्णा पावस्कर हेल्थ कार्ड योजना सुरू करण्यात आले असून या योजनेअंतर्गत ७० वर्षांच्या पुढील आजी-आजोबांना येणार आहे. या डॉक्टरांची या नागरिकांची रक्तदाब डायबिटीस व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात येईल. डॉक्टरने दिलेली प्रत्येक महिन्याच्या औषधी विनामूल्य देण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून निराधार आजोबांना सकाळी व संध्याकाळी जेवणाचे डबे पोहोच करण्यात येणार आहेत. या दोन्ही योजना परिसरात राबविण्यात येणार असून भविष्यात त्या इतर शहराच्या भागात राबवण्याचा मानस आहे. 

हिंदू एकता आंदोलन च्या वतीने दरवर्षी हिंदवी दहीहंडीचे आयोजन करण्यात येते मात्र यावर्षी पूरस्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या खर्चाची रक्कम कराड शहराच्या आरोग्यासाठी समर्पण समर्पित करण्याचे विक्रम पावस्कर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार विक्रम पावस्कर यांच्या संकल्पनेतून व ओम सेवा माध्यमातून कराड शहरासाठी विनामूल्य आरोग्य सेवेचा फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेनुसार प्रत्येक पेठेमध्ये नियोजित ठिकाणावर एक दिवस याप्रमाणे ही गाडी उभी राहणार असून तज्ञ डॉक्टर नागरिकांची आजारावरील औषधे त्याच ठिकाणी देणार आहेत. तसेच नागरिकांच्या गरजेनुसार, ऑक्सिजन युनिट, वॉकर बेड यासारखे साहित्यही विनामूल्य वापरासाठी उपलब्ध होणार आहे. विनायक पावस्कर व त्यांच्या समर्थकांच्या सामाजिक रुणातून उतराई होण्यासाठी कराडकर यांना विनामूल्य उपलब्ध होणाऱ्या या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अजय पावसकर यांनी केले आहे.आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनीही या उपक्रमांचा कराडकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Saturday, August 30, 2025

मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांना कराडमधून जेवणाचे साहित्य रवाना ;

वेध माझा ऑनलाईन।
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे कालपासुन मुंबईत आंदोलनास बसले आहेत. तेथील आंदोलनकर्त्यांच्या जेवण व पाण्याच्या सोयीसाठी भाकरी, पाणी जमा करण्याचे आवाहन कराडच्या मराठा समन्वयकांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत शहर परिसरातून २५ हजारांवर भाकरी-चपाती व जेवणाचे साहित्य जमा झाले कराडच्या दत्त चौकातुन शनिवारी रात्री मुंबईकडे ते सर्व साहित्य रवाना करण्यात आले.  

मुस्लीम समाजासह इतर अन्य समाजांनीही भाकरी व जेवणाचे साहित्य आणुन येथील दत्त चौकात थांबलेल्या समन्यवकांकडे जमा केले. हे सर्व साहित्य  आज मुंबईला रवाना करण्यात आले.

कुख्यात घरफोडी प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर ; सातारा पोलिसांची कारवाई -

वेध माझा ऑनलाइन
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुख्यात घरफोडी प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. लखन भोसले असे मृत आरोपीचे नाव असून तो अनेक घरफोडी आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये आहे या कारवाईत दुसरा एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला आहे शिक्रापूरजवळ संशयित आरोपी लखन भोसले आणि त्याचा साथीदार या भागात असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती.दरम्यान शिक्रापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मराठा आंदोलनावर चर्चेतून सर्वसमावेशक निर्णयाचा सरकारचा प्रयत्न ; फडणवीस

वेध माझा ऑनलाईन ।
मराठा आंदोलनावर चर्चेतून सर्वसमावेशक निर्णयाचा सरकारचा प्रयत्न आहे. लोकांना एकमेकांसमोर आणत झुंजवायचे किंवा प्यादी लढविण्याचा विरोधकांचा प्रयत्न असला तरी सरकार मात्र कायदेशीर मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली. ते सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषदेत बोलत होते.

मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे हे आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर विरोधकांची भाषा बदलली आहे. ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत. त्यांच्यात भांडणे लागायला हवीत, असे काहींचे प्रयत्न आहेत. सकाळपासूनच्या त्यांच्या विधानातून तसे प्रयत्न लक्षात येत आहेत. मात्र, विरोधकांनी आंदोलनावर राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करू नये. यात त्यांचेच तोंड भाजले जाईल, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात स्थितीचा आढावा घेतला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना परिस्थितीची माहिती दिली.
 
फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, विरोधकांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सोयीची भूमिका नव्हे तर ठाम भूमिका घ्यावी. समाजांत भांडणे लावून राजकीय लाभ घ्यायचा असल्याने विरोधक ठाम भूमिका घेत नाहीत. आम्हाला मात्र कोणत्याही समाजाला नाराज करायचे नाही. आम्ही सर्व समाजाच्या इच्छा समजून घेत आहोत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आताही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकून आहे. त्यानुसार भरती आणि प्रवेश प्रक्रियाही सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुंबईत मराठा आंदोलनादरम्यान एका मराठा बांधवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ;

वेध माझा ऑनलाईन
राजधानी मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान आणकी एका मराठा बांधवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील शिवनेरीजवळ एका मराठा बांधवाचा असाच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर, सर्वच आंदोलकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र, आता आणखी एका आंदोलक युवकाचा मृत्यू झाल्यानंतर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विजय घोगरे (रा.टाकळगाव, ता.अहमदपूर,जि.लातूर) या तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांना तत्काळ उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत येत आहेत. गाड्या घेऊन, कुणी रेल्वेने तर कुणी मिळेल ते वाहन पकडून मुंबई गाठत आहे. मात्र, गैरसोयी अभावी मराठा बांधवांचे हाल होताना दिसून येते. गेल्या दोन दिवसांपूर्वीच जुन्नर येथे आंदोलनात सहभागी असलेल्या एका कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर, आज मुंबईत अशीच घटना घडल्याने मराठा समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करत आहेत. तर कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह आणि सलग घडणाऱ्या दुर्दैवी घटनांमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मुंबईती सीएसएमटी परिसरात आज विजय घोगरे या युवकाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे जरांगे यांच्याशी फोनवर बोलले ...काय बोलले?

वेध माझा ऑनलाईन
राज्यातील मराठा आंदोलकांनी मुंबई धडक दिली असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू झाले आहे. या उपोषणाला महाविकास आघाडीतील अनेक नेते, आमदार, खासदार भेट देऊन आपली भूमिका मांडत आहेत. शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल आणि आजही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट देत त्यांच्यासमवेत चर्चा केली. विशेष म्हणजे आजच्या भेटीत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवर बोलणंही करुन दिलं. विशेष म्हणजे दीड ते 2 मिनिटे मनोज जरांगे पाटील यांचं उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलणं झालं आहे. त्यामुळे, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय बोलणं झालं याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र, मराठा आंदोलकांच्या मुंबई राहण्यासाठी आणि सोयी-सुविधेबाबत चर्चा झाल्याचे समजते.

रोहित पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट ; म्हणाले...पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक ;

वेध माझा ऑनलाइन।
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आहे. त्यासाठी मुंबईत भगवे वादळ आले आहे. हजारो मराठा आंदोलक राज्यभरातून मुंबईत हजर झाले आहेत. या आंदोलकांना पाहून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही’ असे म्हटले आहे

रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले की, ‘मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय?’
मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न… 
पुढे ते म्हणाले, ‘सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल.’ सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.


फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा डाव ! हाकेंचा गंभीर आरोप ; रोख कोणावर ? ;

वेध माझा ऑनलाइन
मुंबईमध्ये जरांगेंच्या आंदोलन स्थळी येऊन विरोधी आमदार खासदारांसह सत्ताधारी आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केला आहे. फडणवीसांचं सरकार उलथवण्यासाठी अजित पवार यांचे आमदार सुद्धा सहभागी झाल्याचा आरोप हाकेंचा आहे. या आरोपांना किनार आहे, दादांच्या आमदारांच्या भेटीगाठी… जरांगेंच्या आंदोलन स्थळी सत्ताधारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेत पाठिंबा जाहीर केला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या चेहऱ्या आडून आमदार आणि खासदार यांचा सरकार बदलण्याचा प्रयत्न असल्याचा थेट आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. तर सर्वपक्षीय आमदार खासदारांचं मनोज जरांगे पाटील यांना चांगलंच समर्थन वाढतंय. जरांगे पाटील मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या आंदोलनाला कोणाचं पाठबळ आहे. हे सर्वांनाच माहिती आहे, असं म्हटलं होतं. त्यावरून फडणवीसांचा रोख नेमका कोणावर? यावरून तर्क वितर्कांना सुरूवात झाली आहे.

फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा डाव ! हाकेंचा गंभीर आरोप ; रोख अजितदादा पवार यांच्यावर ;

वेध माझा ऑनलाइन
मुंबईमध्ये जरांगेंच्या आंदोलन स्थळी येऊन विरोधी आमदार खासदारांसह सत्ताधारी आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केला आहे. फडणवीसांचं सरकार उलथवण्यासाठी अजित पवार यांचे आमदार सुद्धा सहभागी झाल्याचा आरोप हाकेंचा आहे. या आरोपांना किनार आहे, दादांच्या आमदारांच्या भेटीगाठी… जरांगेंच्या आंदोलन स्थळी सत्ताधारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी भेट घेत पाठिंबा जाहीर केला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या चेहऱ्या आडून आमदार आणि खासदार यांचा सरकार बदलण्याचा प्रयत्न असल्याचा थेट आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. तर सर्वपक्षीय आमदार खासदारांचं मनोज जरांगे पाटील यांना चांगलंच समर्थन वाढतंय. जरांगे पाटील मुंबईत येण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या आंदोलनाला कोणाचं पाठबळ आहे. हे सर्वांनाच माहिती आहे, असं म्हटलं होतं. त्यावरून फडणवीसांचा रोख नेमका कोणावर? यावरून तर्क वितर्कांना सुरूवात झाली आहे.

Friday, August 29, 2025

आठव्या वेतन आयोगातील काही भत्त्यांना संपवण्यात येणार ?

वेध माझा ऑनलाइन
आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात सतत नवीनवीन माहिती येत आहे. आठव्या वेतन आयोगात किती लाभ होणार आणि कसा लाभ होणार या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता आहे. आता नव्या माहिती नुसार आठव्या वेतन आयोगातील काही भत्त्यांना संपवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. सातव्या आयोगात ज्याप्रमाणे केले होते तसेच काहीसे केले जाणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि सुविधांवर परिणाम होणार आहे.

७ व्या वेतन आयोगात सरकारने अनेक छोटे – मोठे भत्ते हटवले होते. आणि त्यांच्या जागी मोठ्या वर्गवारीतील भत्त्यांचा समावेश केला होता. यामुळे भत्त्यांची संख्या कमी झाली असली तर पे सिस्टीमला सोपे आणि पारदर्शक बनवले जाऊ शकेल. आता बहुप्रतिक्षित आठव्या वेतन आयोगाबाबत देखील अशाच प्रकारची पावले सरकारकडून उचलली जाऊ शकतात. आता आठव्या वेतन आयोगात अशाच प्रकारची पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ओ बी सी समाज 15 दिवसांत मुंबई गाठणार ; उपोषण करणार ; मराठा आरक्षणाला विरोध करणार!

वेध माझा ऑनलाइन 
ओबीसी समाजाकडून या मराठा आरक्षणाला विरोध करण्यात येत आहे. आज नागपुरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. यावेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला तीव्र विरोध करण्यात आला.
मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. उद्या 27 ऑगस्टला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. मात्र आता ओबीसी समाजाकडून या मराठा आरक्षणाला विरोध करण्यात येत आहे. याबाबत आज नागपुरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे 
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातील महत्वाचे पदाधिकारी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला तीव्र विरोध करण्यात आला. तसेच ओबीसी आंदोलनाची दिशाही ठरविण्यात आली

उपराष्ट्रपतीपदासाठी कोणत्या उमेदवाराला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा ? देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता

वेध माझा ऑनलाइन
इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी हे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. त्यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर तिथे एक पत्रकार परिषद झाली. “देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. त्याचं कारण आपल्याला माहीत आहे, आधीचे उपराष्ट्रपती राजीनामा देउन अचानक गायब झाले. त्यानंतर ही निवडणूक होत आहे. इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आमच्या आघाडीकडून सुदर्शनसाहेब उमेवार आहेत. त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केलं. आता देशाला गरज आहे, ती म्हणजे सदसदविवेक बुद्धी जागी ठेऊन संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धी ठेऊन वागणारे उपराष्ट्रपती पाहिजेत” असं उद्धव ठाकरे म्हणाले.“आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत, त्याला अधिक मजबुती येण्यासाठी आपण ही निवडणूक जिंकण्याच्या इराद्याने लढवत आहोत. मी सुदर्शनसाहेबांना धन्यवाद देतो, ते मुंबईत आले, मातोश्रीला आले. आमच्याकडून त्यांना पाठिंबा आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे, महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष, त्यांचे नेते एकदिलाने सोबत आहोत. चमत्कार चौकटीत होत नसतो, तो कसाही होऊ शकतो, म्हणून त्याला चमत्कार म्हणतात” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एनडीचे उमेदवार राधाकृष्णन यांच्या पाठिंब्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता, या प्रश्नावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. “आता मतदार यादीतील त्यांचं नाव बघावं लागेल. फडणवीसांनी मला फोन केला, ही गोष्ट सत्य आहे. मला एका गोष्टीच आश्चर्य वाटलं, माझा पक्ष चोरला, माझा पक्ष फोडला. त्यांच्यासमोर माझे उमेदवार निवडून आणले. त्यांचा पाठिंबा सुद्धा त्यांना पाहिजे. या विनंतीला काय अर्थ आहे?. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी न मागता पाठिंबा दिला होता. कोणी विनंती केली नव्हती, गरज असेल तेव्हा वापरा आणि नंतर फेकून द्या या पद्धतीला नाकारलं पाहिजे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कोणा कोणाचा पाठिंबा?

वेध माझा ऑनलाइन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगेंना पाठिंबा दिला असून ते त्यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याशिवाय परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव देखील मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी देखील मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

मोहन भागवत म्हणाले...संघाला गरज असेल तोपर्यंत मी कार्यरत राहणार ; नरेंद्र मोदी 75 व्या वर्षानंतर राजकारणात निवृत्ती घेणार या चर्चांना भागवतांनी दिला पूर्णविराम

वेध माझा ऑनलाइन
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वयाच्या 75 व्या वर्षानंतर राजकारणात सक्रिय राहणार की निवृत्ती घेणार या चर्चांना अखेर सरसंघचालक मोहन भागवतांनी पूर्णविराम दिला आहे. 

मी किंवा एखाद्याने 75 व्या वर्षी निवृत्ती घ्यावी असं मी कधीही म्हटलो नाही, संघाने आदेश दिला तर मी निवृत्ती घेईन असं मोहन भागवत म्हणाले. संघाला गरज असेल तोपर्यंत मी कार्यरत राहणार असंही मोहन भागवतांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित तीन दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या अखेरच्या दिवशी मोहन भागवतांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मोहन भागवत यांनी यावेळी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानंतर ते राजकारणातून निवृत्त होतील, अशा चर्चांना भागवतांनी स्पष्टपणे फेटाळले.

एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला ; एकनाथ शिंदे पत्रकारांना म्हणाले... राज की बात राज ही रहेने दो...

वेध माझा ऑनलाइन
राज्यभरात गणपती बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आल्यानंतर आता दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे आज विविध जिल्ह्यात विसर्जन करण्यात आले. मुंबई, ठाण्यासह कोकणातील बहुतांश ठिकाणी दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईतील गणेशोत्सव देशात चर्चेत असतो, विशेष म्हणजे येथील राजकीय नेत्यांच्या घरातील गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याची वेगळीच परंपरा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्‍यांपासून ते बड्या राजकीय नेत्यांनी गाठीभेटी दिल्या. त्यामध्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भेट देत राज ठाकरेंच्या घरातील गणरायाचे दर्शन घेतले. या राजभेटीनंतर त्यांनी मिश्कील आणि तितकीच सूचक राजकीय प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट दिली. तत्पूर्वी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब  राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. शिवतीर्थवरून उद्धव ठाकरे बाहेर पडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनीही शिवतीर्थवर गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी, एकनाथ शिंदेनी राजकीय प्रतिक्रिया देत सस्पेन्स वाढवला. 'राज' की बात राझही रहने दो, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय सस्पेन्स वाढवला आहे.

भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून नवऱ्यानेच बायकोला संपवल्याची धक्कादायक घटना ...

वेध माझा ऑनलाइन
आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून नवऱ्यानेच बायकोला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील सोनपुर तांडा येथे पतीनेच पत्नीचा अतिशय निर्घुणपणे खून केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सगळीकडे गणेशोत्सव सणाचा उत्साह पाहायला मिळत असून गावोगावी आनंदाचे आणि सणासुदीचे वातावरण आहे. गणपती भक्तीत घरोघरी, गावोगावी आनंद उत्साह असताना पती-पत्नीच्या वादात झालेला शेवट सर्वांना हळहळ करणारा आहे. 
जिंतूर तालुक्यातील वाघी येथील विजय राठोड यांचा विवाह सोनपुर तांडा येथील विद्या विजय राठोड यांच्याशी झाला होता 3-4 दिवसांपुर्वी पती पत्नीमध्ये वाद झाला होता. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादामुळे पत्नी विद्या ही माहेरी राहायला आली होती. विद्या आज त्यांच्या वडिलांच्या शेतात असताना तिथेही या पती-पत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यातून विजय राठोड याने हातातील धारदार हत्याराने पत्नीच्या छाती, पोट, पाठीवर 10 ते 12 वार केले. ज्यामध्ये विद्या गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे, गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पारवे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

Thursday, August 28, 2025

वेध माझा ऑनलाइन ।
संगमनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जाहीर सभेत आमदार अमोल खताळ यांचं तोंड भरुन कौतुक केलं होतं. मात्र, त्याच संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, शहरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पुन्हा निधीचा "धडाका' ; आमदार अतुलबाबांनी आणला 10 कोटींचा निधी ; आता होणार अनेक विकासकामे ;

वेध माझा ऑनलाईन।
गणपती बाप्पाच्या आगमनाने कराड शहर सणाच्या उत्साहात न्हाऊन निघाले असतानाच; भाजप-महायुती सरकारने कराड शहरातील विविध विकासकाकामांसाठी तब्बल १० कोटींचा निधी मंजूर करुन कराडकरांचा आनंद द्विगुणित केला आहे. भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीच्या माध्यमातून, कराड शहरात नवी उद्याने व क्रीडांगण, सामाजिक सभागृहे, प्रशासकीय इमारतीचे नुतनीकरण, स्मशानभूमीचा विकास अशा पायाभूत कामांना चालना मिळणार आहे. त्यामुळे कराड शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. 

कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले विशेष प्रयत्नशील राहिले आहेत. भाजपा – महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या प्रगतीसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी यापूर्वीदेखील भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. यात आता आणखी १० कोटींच्या निधीची भर पडली आहे. आ.डॉ. भोसले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत नगर विकास विभागाच्यावतीने कराडसाठी १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्याचा शासन आदेश आज (ता. २८) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या निधीच्या माध्यमातून कराड नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे नुतनीकरण व फर्निचर कामासाठी ३.५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच नगरपरिषदेच्या मालकीची हिंदू स्मशानभूमी विकसित करणे (१.२५ कोटी), शनिवार पेठेतील आरक्षित भूखंड क्र. ७२ मधील गार्डन विकसित करणे (१ कोटी), मंगळवार पेठेतील खुल्या जागेत गार्डन विकसित करणे (१ कोटी), बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व व्यापारी संकुलाचे बांधकाम करणे (१ कोटी), तसेच याच परिसरातील नगर भूमापन क्र. ३५ या सार्वजनिक जागेत अभ्यासिका बांधणे (१ कोटी), रविवार पेठेतील सर्व्हे नंबर ४३० येथे कुंभार समाजाचे सामाजिक सभागृह बांधणे (५० लाख), नगरपरिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्र. १६ मधील खेळाचे मैदान विकसित करणे (५० लाख) आणि नगरपरिषदेच्या मालकीच्या आरक्षण क्र. १७ मधील गार्डन विकसित करणे (२५ लाख) अशी विकासकामे साकारली जाणार आहेत. 

या विकासकामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा विस्तारण्यास मदत होणार आहे. तसेच शहरातील खुल्या जागांचा विकास होणार असल्याने नव्या उद्यानांची भर पडणार आहे. याचबरोबर खेळाच्या मैदानांचा विकास आणि अभ्यासिकेच्या उभारणीमुळे याचा युवावर्गाला मोठा लाभ होणार आहे. कराड शहरासाठी १० कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल शहवासीयांकडून मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत.


अशी होणार विकासकामे..
• नगरपरिषद इमारत नुतनीकरण : ३.५० कोटी
• हिंदू स्मशानभूमीचा विकास : १.२५ कोटी
• शनिवार पेठेत गार्डन विकसित करणे : १ कोटी
• मंगळवार पेठेत गार्डन विकसित करणे : १ कोटी
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह व व्यापारी संकुलाचे बांधकाम : १ कोटी
• सार्वजनिक जागेत अभ्यासिका बांधणे : १ कोटी
• कुंभार समाज सामाजिक सभागृह उभारणी : ५० लाख
• खेळाचे मैदान विकसित करणे : ५० लाख
• गार्डन विकसित करणे : २५ लाख

आमदार अतुलबाबा म्हणाले; कराडच्या विकासासाठी मी कटिबद्ध
भाजपा-महायुती सरकारने मंजूर केलेल्या या निधीमुळे कराडचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. या निधीतून शहरात उद्याने, खुल्या जागांचा विकास, खेळाचे मैदान, अभ्का, सभागृह व व्यापारी संकुलाची उभारणी अशा विविध पायाभूत सुविधांची उभारणी केली जाणार आहे. या कामांमुळे कराडचा चेहरामोहरा बदलण्यास निश्चितच मदत होणार आहे. तसेच कराड शहरातील क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक सुविधांचा दर्जाही उंचावणार आहे. येथून पुढेही कराडकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने ठोस पावले उचलत, शासनाच्या माध्यमातून भरघोस निधी मिळवून देण्यास मी कटीबद्ध आहे.

Wednesday, August 27, 2025

माजी नगरसेवक सुहास जगताप यांचा अनोखा उपक्रम ; गणेशोत्सव काळात घरोघरी गणपती आणण्यासाठी केली रिक्षाची सोय; भक्तगणांनी केले कौतुक ;

वेध माझा ऑनलाईन।
“गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!” या गजरात गणेशोत्सवाचा उत्साह कराड शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ओसंडून वाहतो आहे. परंतु गणेश मूर्ती घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची तसंच वाहतुकीची समस्या अनेक भक्तांसमोर उभी राहत होती. याच पार्श्वभूमीवर कराड शहराचे माजी नगरसेवक माननीय सुहास शिवाजीराव जगताप (भैय्या) यांनी पुढाकार घेत भक्तांसाठी एक भक्तिभावाने सेवाभावी उपक्रम राबवला.

जगताप यांनी तब्बल ३० ते ४० रिक्षांची मोफत व्यवस्था करून गणेश भक्तांना मूर्ती घरापर्यंत नेण्याची सोय उपलब्ध करून दिली. यामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणीशिवाय भक्तांनी आपल्या गणरायाला हर्षोल्हासात घरी आणले. रस्त्यांवर भक्तिगीतांच्या तालावर दणदणाट होत असताना, रिक्षांची ही सेवा मिळाल्याने भक्तांमध्ये समाधान, कृतज्ञता आणि आनंदाचे वातावरण होते.

या उपक्रमाचा शुभारंभ भाजप शहराध्यक्ष सुषमा लोखंडे, माजी नगरसेवक आप्पा माने, विनायक कदम, प्रशांत कुलकर्णी, दिलीप पाटील, हनमंत पाटील, वैभव माने, आबा कोळी, महेश कांबळे, सुधीर झेंडे, परेश काटवे दिलीप जाधव यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने श्रीफळ फोडून करण्यात आला. या वेळी शहरातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

भक्तगणांच्या प्रतिक्रिया... 
> “गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, पण त्यांच्या सेवेतून विघ्न टाळण्याचे काम सुहास भैय्या यांनी केले. अशा उपक्रमामुळे खरी समाजसेवा आणि भक्तीभाव अनुभवायला मिळतो.”


मलकापूरच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी ४१ लाखांचा निधी मंजूर; आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; बायोमायनिंग प्रकल्पासाठी मंजुरी ;

वेध माझा ऑनलाइन।
शहरातील वाढत्या घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नगरी) २.० अंतर्गत बायोमायनिंग प्रकल्पासाठी ही मंजुरी मिळाली असून, या निधीसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. या प्रकल्पामुळे मलकापूरकरांचा दीर्घकाळाचा कचऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नगरी) २.० अंतर्गत राज्यातील एकूण ९० नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये जुन्या साठवलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये मलकापूर नगरपरिषदेचा समावेश व्हावा, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार या योजनेत मलकापूर नगरपरिषदेचा समावेश झाला असून, त्यासाठी ४१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. 

बायोमायनिंग प्रक्रियेद्वारे कचऱ्याखालील जमिनीचा पुनर्वापर शक्य होणार असून, ही जमीन स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध करून दिली जाईल. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक धोके मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. 

मलकापूर नगरपरिषदेसह राज्यातील पुणे महानगरपालिका, नाशिक, जळगाव, इचलकरंजी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर अशा मोठ्या महानगरपालिकांसह बुलढाणा, भुसावळ, खामगाव, अंबाजोगाई, रेवराई, परळी वैजनाथ, खोपोली, महाड, श्रीगोंदा, माढा अशा लहान-मोठ्या नगरपरिषदांचा या योजनेत समावेश आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरे कचरामुक्त करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले असून, जुन्या कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही प्रक्रिया प्रभावी ठरणार आहे.

तसेच या प्रकल्पामुळे मलकापूर शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कचऱ्याची समस्या सोडवली जाणार असून शहर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे हा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले जात आहेत. 


बायोमायनिंग प्रक्रिया म्हणजे काय?

बायोमायनिंग म्हणजे जुन्या कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून त्यातून उपयुक्त घटक वेगळे करणे व उर्वरित कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे. या प्रक्रियेमुळे कचऱ्याखालील जमीन पुन्हा वापरासाठी मिळू शकते, तसेच आरोग्य आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी होणास मदत होणार आहे.



Tuesday, August 26, 2025

ओ बी सी नेते लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी रोखलं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी पाऊल उचलले ;

वेध माझा ऑनलाइन।
सोमवारी गेवराईमध्ये झालेल्या राड्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाणाऱ्या लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी रोखलं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचललं असून हाके हे जालन्यातील वडीगोद्री या ठिकाणी परत गेले. राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना गेवराईत येण्यापासून पोलिसांनी रोखलं. गेवराई तालुक्यातील नागझरी गावाजवळ हाकेना रोखण्यात आलं. बीड जिल्ह्यामध्ये जमाबंदीचे आदेश लागू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लक्ष्मण हाके यांना रोखल्याची माहिती आहे.
वेध माझा ऑनलाइन।
मनोज जरांगेंना आझाद मैदानात पुढील दोन आठवडे आंदोलन करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालायने दिला आहे. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. 

जरांगे माजला आहे, त्याची भाषा मग्रुरीची आहे, त्याला अटक झाल्यानंतरच कायदा कळेल अशा शब्दात सदावर्दे यांनी टीका केली. मनोज जरांगे, तू आता आंदोलन करु शकत नाहीस असं आव्हानही सदावर्तेंनी दिलं.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईंमध्ये आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. पण त्यापूर्वीच मनोज जरांगेंना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

मराठा आरक्षण प्रक्रियेबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ; मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची घेतलेली भूमिका यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत येऊन हे उपोषण चालू करणार आहेत. मात्र न्यायालयाने त्यांना मुंबईत येण्यास मनाई केल्यानंतर वातावरण जास्तच तापले आहे. असे असतानाच आता समोर मोठी माहिती समोर आली आहे. आज (26 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षण आणि त्यासाठी चालू असलेल्या प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयांबाबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली आहे.
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना, मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटमधील नोंदीनुसार आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी जरांगे यांची आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कायदेशीर प्रक्रिया चालू आहेत. हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या समितीला आता आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हैदराबादच्या गॅझेटचा अभ्यास करून त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. कारण ही प्रक्रिया क्लिष्ट आहे. जरांगे यांनीच केलेल्या मागणीनुसार शिंदे समितीला मुदतावाढ देण्यात आली आहे, असे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.

मी जाणारच… हायकोर्टाची मनाई तरी जरांगेंचा निर्धार कायम ;

वेध माझा ऑनलाइन
आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत आणि लोकशाही पद्धतीने करण्यात येणारं आंदोलन कधीही रोखता येत नाही. सरकारने गोर गरिबाच्या भावनांशी खेळू नये, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. तर नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं पण आझाद मैदानावर नाही, असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे.  मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या आदेशावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे ते असेही म्हणाले की, मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी नाकारली जाते आणि नवी मुंबई खारघर इथे परवानगी दिली जाते. मग आझाद मैदानावर काय प्रॉब्लेम आहे? न्यायालयाचा सन्मान करणारे लोकं आहोत. कायद्याच्या नियमात राहून अर्ज करून परवानगी मागितली आहे. त्यामुळे शंभर टक्के आम्हाला न्यायालयाकडून परवानगी मिळणार, असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला.

जरांगे पाटील म्हणाले...आझाद मैदान का नाही? ;

वेध माझा ऑनलाइन 
मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय आझाद मैदान येथे आंदोलन करता येणार नाही असा निर्णय दिला. एका जनहित याचिकेवर मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्या. संदीप मार्ने यांनी हा निर्णय दिला. या निर्णयावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे. आझाद मैदान का नाही? आम्ही मुंबईत जाणारच, आमचे वकील कोर्टात जाणार आहेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे म्हणाले की मा. न्यायदेवता तसं म्हणत असेल जर खारघर, नवी मुंबईत परवानगी देता येते तर आझाद मैदानावर आंदोलन करण्यास अडचण काय आहे? आम्ही न्यायदेवतेचा सन्मान करणारे लोक आहेत. आम्ही रितसर मार्गानं, संविधानाच्या मार्गानं अर्ज केलेले आहेत.न्यायदेवता 100 टक्के परवानगी देणार म्हणजे देणार, असं मनोज जरांगे म्हणाले. गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब लोकांच्या अडचणी आहेत. कायदा जनतेसाठी आहेत, जनतेचं गाऱ्हाणं ऐकून घेणं सरकारचं, न्यायदेवतेनं ऐकून घ्यावं, आमच्या वकिलांच्याकडून न्यायदेवतेसमोर आमची बाजू मांडली जाणार आहे.  न्यायदेवता 100 टक्के आम्हाला न्याय देणार, लोकशाही मार्गानं केलं जाणारं आंदोलन रोखता येणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 

मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये ; उच्च न्यायालयाकडून देण्यात आले निर्देश ; आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई ;

वेध माझा ऑनलाइन
ऐन गणपतीच्या तोंडावर मुंबईत धडकणारा मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा रोखण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वीय सहाय्यकांकडून प्रयत्न करण्यात आले. देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात आली. परंतु मनोज जरांगे मोर्चावर ठाम आहेत. मुंबईसाठी आम्ही रवाना होणारचं असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मात्र त्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आज (26 ऑगस्ट) मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचवेळी, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले.  मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. 


मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी राजेंद्र साबळे मनोज जरांगे यांच्या भेटीला ;

वेध माझा ऑनलाइन
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचे पाहायला मिळत आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील भर गणेशोत्सवात मुंबईत धडक देणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे पण गणेशोत्सवात विघ्न नको, असं म्हटलंय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा सरकार उलथवणार असा अल्टिमेटम देत थेट इशाराच दिलाय. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असताना दुसरीकडे ओबीसी समाज याला विरोध दर्शवत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत नियोजित असलेलं आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. 

मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला ; जरांगे पाटलांच्या मागणीला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध ;

वेध माझा ऑनलाइन मराठा समाजाने एल्गार पुकारत मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. येत्या २९ ऑगस्टला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील चलो मुंबईची हाक दिली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात मराठा आंदोलन हा मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजामध्ये सध्या मतभेद वाढत असल्याचे दिसत आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी जातीतून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाज या मागणीला तीव्र विरोध करत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील नियोजित आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कर्तव्य अधिकारी राजेंद्र साबळे यांनी त्यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने राजेंद्र साबळे हे जरांगे पाटलांना भेटले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही बाजूंच्या अपेक्षांवर चर्चा केली. तसेच येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये, यासाठी त्यांचा मार्ग जाणून घेण्यासाठी आलो आहे. त्यासोबतच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आंदोलन पुढे ढकलता येईल का, ही विनंती करण्यासाठी आल्याची माहिती राजेंद्र साबळे यांनी दिली.

पारदर्शक काम व धोरणात्मक निर्णयांमुळे कृष्णा बँकेला देश व राज्यपातळीवरील विविध पुरस्कार ; आमदार डॉ अतुल भोसले

वेध माझा ऑनलाइन 
पारदर्शक काम व धोरणात्मक निर्णयांमुळे कृष्णा बँकेला देश व राज्यपातळीवरील विविध पुरस्कार मिळत आहेत. सभासदांच्या विश्वास व योगदानामुळेच कृष्णा बँक उन्नत आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. कृष्णा सहकारी बँकेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. 

आटके टप्पा (ता. कराड) येथील विराज मल्टिपर्पज हॉल येथे कृष्णा सहकारी बँकेची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सभेचा प्रारंभ करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर कृष्णा बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाजीराव निकम, धोंडीराम जाधव, वसंतराव शिंदे, माजी संचालक माणिकराव जाधव, राजारामबापू कारखान्याचे संचालक बबनराव सावंत, माजी संचालक माणिकराव पाटील, कराड मर्चंट सोसायटीचे चेअरमन माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

याप्रसंगी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पांनी १९७१ साली कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. सभासदांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे व विश्वासामुळे बँकेने उत्तम प्रगती केली असून, येत्या आर्थिक वर्षात बँकेने १५०० कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांची एक सक्षम बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेने लौकिक मिळवला असून, बँकेने महाराष्ट्रभर विस्तार करण्याच्या दृष्टीने धोरण आखले आहे. 

गेल्या आर्थिक वर्षात बँकेला चार नामांकित पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कृषी क्षेत्रात ए.आय.चा वापर, ठिबक सिंचन यासारख्या नव्या योजनांसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी कृष्णा सहकारी बँक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. आज कृष्णा आर्थिक परिवारातील सर्व संस्थांचा मिळून ३००० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट्य आमच्यासमोर असून, ते आम्ही नक्की साध्य करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, शेतकऱ्यांनी नवीन पिढीसाठी शेतीपूरक व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न करण्याची गरज असून, त्यांच्या शिक्षणासाठी व व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल. लोकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच आज कृष्णा आर्थिक परिवारातील सर्व संस्था सक्षमपणे व यशस्वीपणे कार्यरत आहेत.

याप्रसंगी कृष्णा आर्थिक परिवाराच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आणि वित्तपेटा मल्टिस्टेट क्रेडीट सोसायटीच्या वेबसाईटचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले आमदारपदी निवडून आल्याबद्दल सभासदांनी, अभिनंदनाचा ठराव करत जाहीर सत्कार केला.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी अहवाल वाचून दाखविला. सभेला कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, रणजीत लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, श्रीमती सरिता निकम, सौ. सारिका पवार, ॲड. विजय पाटील, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सदस्य गुणवंत जाधव, डॉ. राजेंद्र कुंभार, हणमंत पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील, दिलीपराव पाटील यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दामाजी मोरे यांनी स्वागत केले. शिवाजीराव थोरात यांनी आभार मानले. 

सभासदांना १२ टक्के लाभांश

कृष्णा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर केला. याला सभेची मंजुरी मिळताच, सभा सुरु असतानाच व्यासपीठावरुन बँकेचे मार्गदर्शक डॉ. सुरेश भोसले यांनी लॅपटॉपवर क्लिक केले आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे क्षणार्धात सभासदांच्या बँक खात्यावर लाभांशाची रक्कम वर्ग करण्यात आली. 


आटके येथील तलाठी कार्यालय व भक्त निवास चे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाणांच्या हस्ते संपन्न

वेध माझा ऑनलाइन
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमध्ये कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. त्या कामांची अजून भूमिपूजन व उदघाटन सुरु आहेत, विकास हेच ध्येय ठेवून पदाचा सामाजिक कामासाठी उपयोग करून आपले आयुष्य व्यतीत करणारे पृथ्वीराज चव्हाण हे एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे असे प्रतिपादन इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले. 

आटके येथील तलाठी कार्यालय व भक्त निवास या दोन्ही विकास कामाचे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आटके गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रोहिणी नितीन पाटील, उपसरपंच रमेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, गजानन आवळकर, ग्रा.प सदस्य सुरेश पाटील, बी.जी. काळे सर, संजय जाधव, हंबीरराव पाटील, सुनील जाधव, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, अवधूत पाटील यांच्यासह प्रशासकीय अधीकारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना इंद्रजीत चव्हाण म्हणाले कि, कराड दक्षिण मधील गावांनी पृथ्वीराज बाबांच्यावर कायमच प्रेम केले आहे. आटके गाव यामध्ये अग्रेसर राहिले आहे. गावामध्ये विकासाचा दृष्टिकोन जपण्याचं चांगलं काम गावाने कायम जपले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचा एकच ध्यास आणि विचार आहे कि, आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग मतदार संघातील जनतेसाठी झाला पाहिजे यासाठी त्यांना आजपर्यंत जी जी पदे मिळाली त्यामध्ये त्यांनी स्वतःचा स्वार्थ न साधता समाजाचा जनतेचा कायम विचार केला आहे, धोरणात्मक व सामाजिक विकासाचा ध्यास ठेवला आहे. पृथ्वीराज बाबा ज्या ज्या पदावर होते त्यां त्या वेळी घेतलेल्या निर्णयामुळे देशातील- राज्यातील जनतेचा नक्कीच फायदा झाला आहे जो आजही अनेक योजनांमधून लोकांना मिळत आहे. असा दृष्टिकोन ठेवून चव्हाण कुटुंबीय कायम राजकारणात कार्यरत आहेत. सामाजिक ध्यास ठेवून विकास केला तर नक्कीच प्रगती घडतं असते हे धोरण तंतोतंत पाळणारे पृथ्वीराज बाबा एकमेव राजकारणी असावेत. 

यावेळी अजितराव पाटील, गजानन आवळकर यांनी मनोगत व्यक्त केले तर बी.जी. काळे सर यांनी आभार मानले.  

Monday, August 25, 2025

वेध माझा ऑनलाइन।
जवळच्या व्यक्तीची अचानक प्रकृती बिघडणे हा जीवनातील सर्वात कठीण प्रसंग असतो. कराडचे नितीन ओसवाल यांच्यावरही काही दिवसांपूर्वी असा प्रसंग ओढावला. त्यांच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने स्पंदन हॉस्पिटल, कराड येथे दाखल करण्यात आले. तेथूनच ओसवाल कुटुंबाला जणू नवी आशा व कुटुंबासारखी साथ मिळाल्याचा अनुभव आला.

डॉ. अमित बोत्रे, डॉ. प्रशांत पवार आणि डॉ. संदिप बानुगडे या डॉक्टरांच्या योग्य निदान, मार्गदर्शन आणि वेळेवर केलेल्या उपचारामुळे कुटुंबीयांचा विश्वास अधिक दृढ झाला. “प्रत्येक दिलासा आणि केलेला प्रयत्न आमच्यासाठी मोठा आधार ठरला,” असे श्री. ओसवाल यांनी सांगितले.

नर्सिंग स्टाफ व कर्मचारी वर्गाने दाखवलेली निष्ठा, संयम आणि सेवाभाव याचे त्यांनी विशेष कौतुक केले. “दिवस-रात्र प्रत्येक क्षणी रुग्णाची काळजी घेतली जात असल्याचे पाहून खरी सुरक्षिततेची आणि माणुसकीची जाणीव झाली,” असे ते म्हणाले.

स्पंदन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधा – अतिदक्षता विभाग, डायलिसीस युनिट, व्हेंटिलेटर, डिजिटल एक्स-रे, 2D-इको, अल्ट्रासोनोग्राफी, सेंट्रल सक्शन, कार्डीयाक मॉनिटर, फार्मसी विभाग तसेच स्वच्छ व आरामदायी खोल्या – या सुविधा रुग्णांच्या जीवनासाठी जीवनदायी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या श्री. ओसवाल यांचे वडील प्रकृतीसुधाराकडे वाटचाल करत असून, “या पुनर्जन्मामागे स्पंदन हॉस्पिटलची संपूर्ण टीमच कारणीभूत आहे,” असे त्यांनी मनापासून सांगितले. शेवटी “सेवाभाव, माणुसकी आणि आधुनिक उपचार यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या स्पंदन हॉस्पिटलचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो,” अशा शब्दांत नितीन ओसवाल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
वेध माझा ऑनलाइन।
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमध्ये कोट्यवधींची विकासकामे केली आहेत. त्या कामांची अजून भूमिपूजन व उदघाटन सुरु आहेत, विकास हेच ध्येय ठेवून पदाचा सामाजिक कामासाठी उपयोग करून आपले आयुष्य व्यतीत करणारे पृथ्वीराज चव्हाण हे एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे असे प्रतिपादन इंद्रजित चव्हाण यांनी व्यक्त केले. आटके येथील तलाठी कार्यालय व भक्त निवास या दोन्ही विकास कामाचे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आटके गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रोहिणी नितीन पाटील, उपसरपंच रमेश जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, गजानन आवळकर, ग्रा.प सदस्य सुरेश पाटील, बी.जी. काळे सर, संजय जाधव, हंबीरराव पाटील, सुनील जाधव, चंद्रकांत पाटील, संजय पाटील, अवधूत पाटील यांच्यासह प्रशासकीय अधीकारी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना इंद्रजीत चव्हाण म्हणाले कि, कराड दक्षिण मधील गावांनी पृथ्वीराज बाबांच्यावर कायमच प्रेम केले आहे. आटके गाव यामध्ये अग्रेसर राहिले आहे. गावामध्ये विकासाचा दृष्टिकोन जपण्याचं चांगलं काम गावाने कायम जपले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचा एकच ध्यास आणि विचार आहे कि, आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग मतदार संघातील जनतेसाठी झाला पाहिजे यासाठी त्यांना आजपर्यंत जी जी पदे मिळाली त्यामध्ये त्यांनी स्वतःचा स्वार्थ न साधता समाजाचा जनतेचा कायम विचार केला आहे, धोरणात्मक व सामाजिक विकासाचा ध्यास ठेवला आहे. पृथ्वीराज बाबा ज्या ज्या पदावर होते त्यां त्या वेळी घेतलेल्या निर्णयामुळे देशातील- राज्यातील जनतेचा नक्कीच फायदा झाला आहे जो आजही अनेक योजनांमधून लोकांना मिळत आहे. असा दृष्टिकोन ठेवून चव्हाण कुटुंबीय कायम राजकारणात कार्यरत आहेत. सामाजिक ध्यास ठेवून विकास केला तर नक्कीच प्रगती घडतं असते हे धोरण तंतोतंत पाळणारे पृथ्वीराज बाबा एकमेव राजकारणी असावेत. 
यावेळी अजितराव पाटील, गजानन आवळकर यांनी मनोगत व्यक्त केले तर बी.जी. काळे सर यांनी आभार मानले.  

Friday, August 22, 2025

इंद्रजीत चव्हाण व गजानन आवळकर म्हणाले... मी व माझ्या कुटुंबाने एकाच ठिकाणी मतदान केले आहे ; भाजपने केलेल्या आरोपांचे खंडन ;

वेध माझा ऑनलाइन।
माझ्यावर व माझ्या कुटुंबावर दुबार मत नोंदणीचे केलेल्या आरोपांचे खंडन करतो कारण पृथ्वीराज चव्हाणांचे नाव घेऊन मतांची झालेली चोरी झाकण्यासाठीच भाजपच्या कराड दक्षिण मधील पदाधिकार्यांनी आरोप केले आहेत. भाजपचे आरोप हे मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच केले आहेत अशी टीका इंद्रजीत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी गजानन आवळकर, अजितराव पाटील, भानुदास माळी, झाकीर पठाण, दिग्विजय सूर्यवंशी, प्रशांत देशमुख, बंडानाना जगताप, नितीन थोरात, नानासो पाटील, शिवाजीराव मोहिते, प्रदीप जाधव, आदींची यावेळी उपस्थिती होती. 

यापुढे बोलताना इंद्रजित चव्हाण म्हणले कि, दुबार मतदान नोंद आणि बोगस मतदान यामध्ये फरक आहे. माझे व माझ्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे असलेल्या दुबार मत नोंदणीबाबत आम्ही ज्या त्या वेळी निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील नाव कमी करून एकाच ठिकाणी नाव असण्याबाबत अर्ज केले होते परंतु असे असताना आमच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत असणे हि निवडणूक आयोगाचीच चूक आहे असे आमचे स्पष्ट आरोप आहेत. 

मुळात मतदार यादीमध्येच घोळ आहे व ती सदोष झाली पाहिजे यासाठीच तर आमची मागणी आहे. परंतु निवडणूक आयोगावर आरोप केले तर त्यांच्या मदतीसाठी भाजपचे पदाधिकारी धावून येतात यावरूनच निवडणुकीत नक्की काय प्रकार झाला हे दिसून येते. माझे सद्याचे असलेले वय व मतदार यादीतील असलेले वय यामध्ये तफावत आहे. जर नाव नोंदणी नजीकची आहे तर ती सिद्ध करावी आणि जर दुबार मतनोंदणी प्रमाणे दुबार मतदान केले आहे तर ते पुराव्यासहित सिद्ध करावे अशी आमची मागणी आहे. 

यावेळी गजानन आवळकर म्हणले कि, माझे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचा गेली ४० वर्षे मी स्वीय सहायक म्हणून काम करीत आहे. माझ्यावर झालेले आरोप निरर्थक आहेत कारण, माझे मूळ गाव वाठार असून मी राहायला कराड मध्ये आहे. दोन्ही ठिकाणी मतदानाची नोंदी बाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी इनकॅमेरा सुनावणी झाली होती. व त्याचवेळी निवडणूक आयोगाच्य कार्यालयात वाठार मध्येच मतदान नोंद ठेवण्याबाबत अर्ज केला होता पण अजूनही आमची नावे दोन्ही मतदार यादीत आहेत. कागदोपत्री सर्व पुरावे असताना सुद्धा माझे नाव जर दोन ठिकाणी असेल तर यामध्ये पूर्णपणे निवडणूक आयोगाची चुकी आहे. यामुळे माझ्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचे मी खंडन करतो.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतण्यावर दुबार आणि तीबार मतदान नोंदणी केल्याचा भाजपचा आरोप ; इतर कुटुंबियांवर देखील दुबार मतदानाचा आरोप ; पत्रकारांसमोर सादर केली कागदपत्रे ; कराड दक्षिणच्या राजकारणात खळबळ ; भागात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन।
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरच्या लोकांनीच दुबार मतदान केल्याचा गंभीर आरोप कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी धंनजय पाटील तसेच भाजप चे सैदापुर चे नेते मोहनराव जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केला 
यावेळी सदर पदाधिकाऱ्यांनी कागपत्रासाहित पुरावे सादर केले 

यावेळी भाजपच्या शहर अध्यक्ष सौ सुषमा लोखंडे माजी नगरसेवक सुहास जगताप अतुल शिंदे तसेच दयाभाऊ पाटील आदी उपस्थित होते

यावेळी धनंजय पाटील यांनी सांगितले की पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजित चव्हाण व त्यांच्या पत्नी यांचे मतदान 3 ठिकाणी आहे तर उर्वरित 8 जणांनी 2 ठिकाणी  दुबार मतदान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला दरम्यान तज्ञा लोकांचा सल्ला घेऊन संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे देखील यावेळी सदर पदाधिकाऱ्यांनी सांगितले

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्होट चोरी चा मुद्दा काढल्यानंतर संपूर्ण देशात हा विषय मोठा गाजत आहे कराडमध्ये देखील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पी ए गजानन आवळकर तचे त्यांचे पुतणे इंद्रजित चव्हाण आणि कुटुंबीय असे मिळून सर्वजण दुबार आणि तिबार मतदान करत असल्याचा आरोप येथील भाजपने कागदपत्रे सादर करत आज केल्याने राज्यात या बातमीने खळबळ माजली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयावर राहुल गांधींनाच यावर उत्तर द्यावे लागणार आहे त्यातले खरे व्होट चोर कोण आहे हे यानिमित्ताने आता समोर आले आहे असेही फडणवीस म्हणाले आहेत

Thursday, August 21, 2025

उपोषणकर्ते गणेश पवार यांची तब्बेत खालावली! ; बी पी होतोय "लो' ! ...आज नऊवा दिवस; आजपासून औषधोपचार नाकारले ; प्रशासनाने दखल घेणे गरज ;


वेध माझा ऑनलाइन।
बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी 14 तपासून चालू असलेले कपील ग्रामपंचायतचे माजी सदस्य गणेश पवार यांचा उपोषणाचा आज नऊवा दिवस असून आजपासून वैद्यकीय उपचार नाकारणार असल्याची  माहिती गणेश पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान गणेश पवार यांची तब्बेत खालावली असून त्यांचा रक्तदाब देखील "लो' होत असल्याची माहिती मिळत आहे याची प्रशासनाने आतातरी दखल घेणे गरजेचे असल्याचे बोललं जातंय

कापील गावच्या मतदार यादीमध्ये 2024 च्या विधानसभेला 9 मतदारांची नावे त्यात सामील झाली हे लोक कापील चे रहिवासी नाहीत, यांची कोणतीही मालमत्ता या गावात नाही, ते भाड्याने सुद्धा येथे राहत नाहीत. तरीसुद्धा यांची नावे मतदार यादीत आली आहेत  यासाठी चुकीच्या कागदपत्राचा वापर केल्याचा आरोप गणेश पवार यांनी केला आहे.
या 9 मतदारांची अन्य ठिकाणी असलेली मतदार यादीमधील नावे आयोजित पत्रकार परिषदेत सादर केली. तरीसुद्धा शासन यावर कोणतेही कारवाई करत नाही. यासाठी मोठी तडजोड झाल्याचा आरोपही गणेश पवार यांनी केला आहे. त्या 9 मतदारावर गुन्हे दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी असही ते यावेळी म्हणाले

Tuesday, August 19, 2025

बोगस मतदान प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकार्यांवर कारवाई करा - भानुदास माळी

वेध माझा ऑनलाइन
 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिराळा, इस्लामपूर, कोरेगाव, पाटण या व इतर भागातील मतदारांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झालेली आहे. हि बाब अत्यंत गंभीर असून लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहचवीणारी आहे याबाबत कराडचे प्रांताधिकारी यांना निवेदन दिले परंतु याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. कराड दक्षिण मधील बोगस मतदानाच्या गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आलो होतो पण प्रांतांकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर दिले गेले नाही उलट ते भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे आम्हाला उत्तरे देत होते.   बोगस मतदानाबाबत आमचा जो मूळ मुद्दा आहे कि, ज्या अधिकाऱ्यांनी हि बोगस नावे नोंदविली गेली त्यांच्यावर आणि बोगस मतदारांवर कारवाई करावी पण याबाबत चकार शब्द प्रांतांनी काढला नाही. आम्ही हि चौकशी करू, नियमात बघू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. यावेळी इंद्रजित चव्हाण, नामदेवराव पाटील, गजानन आवळकर, नितीन ढापरे, संभाजी चव्हाण, संजय तडाखे, सुरेश भोसले, देवदास माने, प्रदीप जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

बोगस मतदानाच्या प्रक्रियेबाबत वेळोवेळी आवाज उठाव करून सुद्धा प्रशासन ढम्म असल्याचे दिसून येत आहे. आम्ही या संपूर्ण प्रक्रियेवर असमाधानी असून संपूर्ण सातारा जिल्हा त्यामध्ये विशेषतः कराड दक्षिण मध्ये ज्याप्रकारे मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान नोंदणी केली गेली त्या विरोधात तीव्र आंदोलन नजीकच्या काही दिवसात करणार आहोत. असे पत्रकारांशी बोलताना भानुदास माळी यांनी सांगितले. 

गणेश पवार यांच्या आंदोलनाची दखल का नाही घेतली ?
त्यांनी त्यांच्या गावातील बोगस मतदार पुराव्यासहित दाखविले आहेत व त्यांची मागणी आहे कि बोगस मतदारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी त्यांचे गेली आठवडाभर आंदोलन सुरु आहे पण प्रशासनाकडून चिडीचूपची भूमिका दिसून येत आहे.

सावधान… धोका वाढला, हवामान खात्याने दिला इशारा ;

वेध माझा ऑनलाइन
मुंबईत रात्रभर पाऊस सुरू असून पहाटे पावसाचा जोर वाढलाय. दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलंय. आज मुंबईला रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मुंबईसह पुण्यात देखील धुवाधार पाऊस सुरू असल्याचे बघायला मिळतंय. भारतीय हवामान खात्याकडून मुंबईसह, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये अलर्ट जारी केला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की, अति महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये. यासोबतच हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आलाय.
पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहोत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 100 / 112 / 103 डायल करा, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलंय. आता परत पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्त्यांमध्ये गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी साचल्याचे बघायला मिळतंय. जागोजागी महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर थांबल्याचे बघाायला मिळतंय.

मी दोन ठिकाणी मतदान केलेलं नाही, माझ्यावर खोटा आरोप केला गेला याबाबत 2 दिवसांनी मी पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार ; पृथ्वीराज चव्हाण यांचे पी ए गजानन अवळकर यांची प्रतिक्रिया ;

वेध माझा ऑनलाइन
मी दोन ठिकाणी मतदान केलेलं नांही माझ्यावर खोटा आरोप केला गेला तसे वाटत असेल तर विरोधकांनी कोणत्याही कोर्टात जावं याबाबतचे उत्तर मी माझ्या 2 दिवसांनी घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत योग्य कागदपत्राच्या पुराव्यासहित देणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पी ए गजानन आवळकर यांनी पत्रकारांशी बोलताना आज स्पष्ट केलं

ओबीसी सेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी आज सध्या सर्वत्र गाजत असलेल्या बोगस मतदानाविषयासंदर्भात येथील प्रांत कार्यालय येथे मोर्चा काढला होता यावेळी प्रांतांना निवेदन देखील देण्यात आले दरम्यान या मोर्चात सहभागी होण्यासाठी आले असता गजानन आवळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला

2 दिवसांपूर्वी भाजप चे सैदापुर चे नेते मोहनराव जाधव यांनी पत्रकार परिषद घेत पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहायक श्री आवळकर यांनी आपल्या कुटुंबासह वाठार व कराड अशा एकूण 2 ठिकाणी मतदान नोंदणी करत दोन ठिकाणी मतदान केले असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यांच्या या भूमिकेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा यांची मूक संमती होती का?असा सवाल देखील यावेळी केला गेला याबाबत आज  गजानन आवळकर यांनी प्रतिक्रिया देत भाजपचे नेते मोहनराव जाधव यांचे सर्व आरोप फेटाळले आणि 2 दिवसांनी याविषयाबाबत सविस्तर बोलेन असे सांगितले 


सातारा जिल्ह्यात स्वच्छतेची धडक मोहीम राबवणारपालकमंत्री शंभूराज देसाई: कराड येथे पत्रकार देवदास मुळे यांचा सत्कार

वेध माझा ऑनलाइन
स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालकमंत्री म्हणून स्वच्छतेबाबत आढावा घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कराड, पाचगणी नगरपालिका पारितोषिक मिळवत असतील तर अन्य नगरपालिकांनीही काम केले पाहिजे. याबाबत जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. लवकरच ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच ‌यांची कार्यशाळा घेऊन स्वच्छतेबाबत धडक मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचा राज्यस्तरीय स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार देवदास मुळे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ अतुलबाबा भोसले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, रणजीत पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी तसेच कराड शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

जिल्ह्यात स्वच्छतेबाबत प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. सातारा नगरपालिकेने स्वच्छता मार्शल नेमले आहेत. देवदास मुळे यांनी सातत्याने स्वच्छतेविषयी लिखाण करून जनजागृती केली. त्याची दखल शासनाने घेतली आहे, असे नामदार देसाई म्हणाले.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, कराडच्या पत्रकारितेला वेगळी उंची आहे. देवदास मुळे यांनी आतापर्यंत जपलेला बंधुभाव आणि समाजाप्रती प्रेम यापुढेही कायम ठेवावे. कराड दक्षिणचे लोकप्रतिनिधी म्हणून पत्रकार भवन आणि पत्रकार कॉलनी उभारणे या कामांना आपले प्राधान्य असणार आहे. नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करावेत, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

देवदास मुळे यांनी सत्काराला उत्तर देताना स्वच्छतेचा आग्रह धरणारी पत्रकारिता यापुढेही करण्याची ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण व स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाची माहिती दिली. 

यावेळी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोरख तावरे, सतीश मोरे, सचिन देशमुख, शशिकांत पाटील, सचिन शिंदे, हेमंत पवार, अजय जाधव, संभाजी थोरात, विकास भोसले, खंडू इंगळे, नितीन ढापरे, अकबर शेख, दिनकर थोरात यासह कराड शहर व तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

प्रमोद तोडकर यांनी सूत्रसंचालन केले. अभयकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. विशाल पाटील, सुलतान फकीर, सुरेश डुबल, कैलास थोरवडे यांनी स्वागत केले. संदीप चेणगे यांनी मानपत्र वाचन केले. अशोक मोहने यांनी आभार मानले.

Monday, August 18, 2025

डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक प्रा.अभिषेक भोसले यांची उमेदवारी कार्यकर्त्यांनीच केली जाहीर ! ; कराड पालिकेच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अभिषेक भोसलेंची उमेदवारी जाहीर करणारा व्हीडिओ व्हायरल!! ; शहरात जोरदार चर्चा ;


वेध माझा ऑनलाइन ।
आमदार डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे भाजप चे कराड शहर उपाध्यक्ष अभिषेक भोसले यांच्या कार्यकर्ते व मित्र परिवाराने कराडमध्ये होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक 11 मधून निश्चित करत त्यांच्या उमेदवारीला फ्लॅश करणारी  एक व्हीडिओ रील व्हायरल केली आहे त्याचीच चर्चा सध्या कराडमध्ये जोरदार सुरू आहे.
पालिका निवडणुकीसाठी कालच शहरांतील 
प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या त्यानंतर या व्हीडिओ व्हायरलचा प्रकार काय आहे... हे  जाणून घेऊया...


अभिषेक भोसले हे स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहेत कराडमधील श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक येथे ते आर्किटेक्चर विभागाचे प्राध्यापक म्हणून काम करतात छ शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करणारे व्याख्याते म्हणून देखील त्यांची ओळख आहे त्यांना सामाजिक कामाची आवड असल्याने ते शहरातील विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर दिसतात ते भाजप चे शहर उपाध्यक्ष आहेतच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुलोम या संघटनेच्या माध्यमातून देखील ते यशस्वी कार्यरत आहेत याची दखल घेत अभिषेक भोसले यांच्या घरी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रभुरामचंद्राची एक मूर्ती भेट म्हणून पाठवली आहे प्रसिद्धी पासून नेहमीच स्वतःला लांब ठेवत अभिषेक भोसले यांचे समाजकार्य जोमाने सुरू आहे त्याचा मित्रपरिवार खूप मोठा आहे कोविडमध्ये त्यांनी केलेले काम लोकांच्या आजही लक्षात आहे त्यांनी सुमारे 5 वर्षांपूर्वी समाजकारणात एन्ट्री केली आमदार डॉ अतुल भोसलेना ते आपले दैवत मानतात 2019 च्या पूरपरिस्थितीमध्ये त्यांनी शहरातील लोकांना केलेली मदत आजही चर्चेत असते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निराधार लोकांना मदत करण्याचे ते कधीही विसरत नाहीत त्यांचा तो उपक्रम अनेकजण कॉपी करताना दिसतात आयुष्यमान भारत ,तसेच गाव चलो अभियान मुख्यमंत्री वयोश्री योजना तसेच महिलांसाठी अनेक उपक्रम देखील त्यांनी राबवले आहेत  त्यांच्या वार्ड परिसरातील दवाखान्याच्या दारातच बसणारी भाजी मंडई रस्त्यातुन उठऊन त्यांनी रुग्णांचे आशीर्वाद घेतले आहेत रस्ते लाईट पाणी याही विषयावर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे सर्व समाजात त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत या त्यांच्या एकूणच सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या मित्रपरिवाराने  व कार्यकर्त्यांनी त्यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक 11 मधून जाहिरच करून टाकली आहे त्यासाठी त्यांची व्हीडिओ रील तयार करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या व्हीडिओ मध्ये अभिषेक भोसले हे पालिकेत एन्ट्री करण्याकरिता पालिकेसमोर उभे आहेत असे दाखवून त्यांची  उमेदवारी होणाऱ्या शहराच्या पालिका निवडणुकीत निश्चित असल्याचे संकेत देण्यात आले आहेत 
सदर व्हीडिओ रील सध्या जोरदार व्हायरल होत असल्याने त्याचीच कराडात सध्या जोरदार चर्चाही सुरू आहे त्यामुळे आता अभिषेक भोसले यांच्या अधिकृत उमेदवारीच्या घोषणेची त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशी टाळून बोगस मतदारांना पाठीशी घातले ;माझे आंदोलन दडपण्याचा प्रशासनाचा डाव ; उपोषणकर्ते गणेश पवार यांचा गंभीर आरोप ;

वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीत कापिल व गोळेश्वर येथे बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते गणेश पवार यांनी केला आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशी टाळून बोगस मतदारांना पाठीशी घातल्याचा ठपका यावेळी गणेश पवार यांनी  ठेवला आहे.दरम्यान माझे हे आंदोलन दडपण्याचा प्रशासनाचा डाव दिसत आहे. आपला ‌‘जीव गेला तरी मागे हटणार नाही. आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण आम्ही ठाम आहोत,‌’ असे गणेश पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान या बोगस मतांच्या भानगडीची चर्चा आता राज्यभर होऊ लागली आहे

14 ऑगस्टपासून येथील प्रशासकीय कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाचा आज (सोमवारी) पाचवा दिवस असूनही निवडणूक निर्णय अधिकारी चर्चेसाठी न आल्याने गणेश पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी उपोषणस्थळी पत्रकार परिषद घेऊन गणेश पवार यांनी बोगस मतदारांचे पुरावे सादर केले.
पवार यांच्या मते, मतदार नोंदणी प्रक्रियेत केवळ आधारकार्डावरून नावे समाविष्ट करण्यात आली असून, काहींची रेशनकार्डे परजिल्ह्यातील असताना जोडलेली वीजबिले मात्र इतरांची असल्याचे उघड झाले आहे. मूळ गावातील यादीत नावे कायम असतानाही विधानसभा यादीत पुन्हा तीच नावे समाविष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत कापिल येथील 9 व गोळेश्वर येथील तब्बल 75 असे एकूण 84 बोगस मतदार आढळल्याचा दावा त्यांनी केला.
‌‘ग्रामपंचायत व लोकसभा यादीत नावे नसताना अवघ्या चार महिन्यांत विधानसभा यादीत नावे कशी आली?‌’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माहिती अधिकाराखाली कागदपत्रे मागितल्यावर केवळ आधारकार्ड वगळता इतर कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‌‘बोगस कागदपत्रांवर मतदार नोंदणी करून निवडणूक विभागाची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारांवर गुन्हा दाखल व्हावा व पारदर्शकता न ठेवणाऱ्या निर्णय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हावी,‌’ अशी ठाम मागणी पवार यांनी केली.
गेल्या पाच दिवसापासून आपले उपोषण सुरू आहे. परंतु यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे काम केले आहे का? तसे नसेल तर ते ठोस पुरावे का सादर करीत नाहीत. निवडणूक निर्णय अधिकारी आंदोलन स्थळी भेट न देता आपणाला त्यांच्या दालनात चर्चेसाठी बोलावून घेत आहेत. यावरून हे आंदोलन दडपण्याचा प्रशासनाचा डाव दिसत आहे. आपला ‌‘जीव गेला तरी मागे हटणार नाही. आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण आम्ही ठाम आहोत,‌’ असे गणेश पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात ‘लाडकी बहीण योजने’च्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा झाला शुभारंभ ;

वेध माझा ऑनलाइन।
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यात ‘लाडकी बहीण योजने’च्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात या योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. ज्या सुनांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात, त्यांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एक हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे.


एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ठाण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदेंनी लाडकी सून योजना सुरु करत असल्याचे जाहीर केले. ज्याप्रकारे घरांमध्ये लाडकी मुलगी असते पण लाडकी सून मात्र नसते, अशा विचारधारेला छेद देऊन प्रत्येक सून ही लाडकीच असली पाहिजे, या उद्देशाने शिवसेनेकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये केवळ पीडित सुनांनाच नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाणार आहे, जेणेकरून समाजात एक सकारात्मक संदेश जाईल.

या मोहिमेअंतर्गत, घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी एक विशेष हेल्पलाइन नंबर देण्यात आला आहे. 8828862288 असा हा हेल्पलाईन नंबर असणार आहे. या मोहिमेत शिवसेना शाखा आणि कार्यालयेही सहभागी होणार आहे. तसेच पीडित महिलांना तातडीने मदत पुरवली जाईल. यावेळी एकनाथ शिंदेंनी या योजनेबद्दल आपले मत व्यक्त केले. “जशी आपली मुलगी असते, तशीच सूनही असते. तिलाही सन्मानाने वागवले पाहिजे. अनेक घरांमध्ये सुनांवर अत्याचार होतात, त्यांना त्रास दिला जातो. याला आळा घालण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे. ज्या सुनांना मदत हवी असेल, त्यांनी न घाबरता या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.” असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले.

कोल्हापुरात गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल ;

वेध माझा ऑनलाईन
सर्किट बेंच कामकाजाच्या पहिल्याच दिवशी गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. गोकुळच संचालक मंडळ बरखास्त करून नुकसानीच्या वसुलीबाबत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने ही याचिका स्वीकारली आहे. गोकुळ दूध संघात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केला आहे. सर्किट बेंच सुरू झालेल्या पहिल्याच दिवशी 120 केसेस बोर्डवर आल्या.याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे हे आजरा तालुक्यातील महादेव सहकारी दूध संस्थेचे संचालक आहेत. गोकुळच्या लेखापरीक्षणात अनेक त्रुटी आढळून आल्या असतानाही संचालकांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. याबाबत मंगळवार, 26 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

राज्यात पावसाचे थैमान ; 5 जिल्ह्यांना मोठा धोका ; ते कोणते जिल्हे आहेत ?

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्र राज्यात सध्या पावसाचे प्रचंड थैमान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील पूर परिस्थिती चिंताजनक झाली असून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. रत्नागिरी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा आदी जिल्ह्यांतील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशातच हवामान खात्याकडून राज्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता चांगलीच वाढली आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, पालघर, ठाणे, संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान, मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसताय. आज रात्रभरात ठिकठिकाणी ६० ते १०० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान... 
मुंबईमधील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. मुंबई आणि परिसरामध्ये रेड अलर्ट असल्यामुळे मुंबई आणि परिसरातल्या शाळा उद्या बंद राहणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि पनवेल महापालिका यासह पनवेल पालिका विभाग या ठिकाणी उद्या शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहे. मुसळधार पावसामुळे पाणी साचलं असल्याने तसेच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने उद्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईत धुव्वाधार... शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर,; आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, बीएमसीकडून आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन
रात्रीपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच पावसाचा जोर आता वाढताना दिसतोय. मुंबईतील सखल भागात पावसाचं पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागतेय तर दुसरीकडे पावसाचं पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनं पाण्यात बुडले आणि रस्त्यातच गाडी बंद पडल्याने चालकांना आपली गाडी धकलत वाट शोधताना नाकीनऊ येताना दिसतंय. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे तर रस्ते वाहतूक पूर्णतः मंदावली असल्याने नागरिकांचा मोठा खोळंबा झाला आहे.मुंबईत मुसळधार पावसाचा जोर आणखीन वाढत असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना, ज्यांची वेळ दुपारी १२ वाजेनंतर आहे, त्यांना आज, सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर केली. तर सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना घरी घेऊन जावं, असं आवाहन पालकांना शाळांकडून केलं . या सगळ्या पार्श्वभूमीवर आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन बीएमसी कडून मुंबईकरांना करण्यात आलं.

Saturday, August 16, 2025

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकाकडूनच दुबार मतदार नोंदणी ; बोगस मतदान करण्यासाठी पदाचा गैरवापर केला : पृथ्वीराज चव्हाण यांची याला मूकसंमती आहे का? पत्रकार परिषदेत मोहनराव जाधव यांचा गंभीर आरोप ;

वेध माझा ऑनलाइन
देशात नुकतेच काही राजकीय पक्षांनी मतदारांची दुबार नोंदणी झाल्याचा आक्षेप नोंदविला आहे. या अनुषंगाने २६०-कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार या नात्याने, आम्ही निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीचे अवलोकन केले असता, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकानेच चक्क दुबार मतदार नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे. या स्वीय सहाय्यकाने केवळ स्वत:चेच नाही; आपल्या पत्नीचे व भावाचे नावदेखील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दोन-दोन ठिकाणी नोंदविल्याचे दिसून आले आहे. बोगस मतदान करण्यासाठीच आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी हे कृत्य केल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. याबाबत चौकशी होऊन गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी सैदपूरचे भाजपचे नेते मोहनराव जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

मोहनराव जाधव यांनी मांडलेले मुद्दे...
वाठार व कराड केंद्रावर दोन्ही ठिकाणी नोंद
मोहनराव जाधव म्हणाले...२६०-कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्रमांक २९५ मध्ये वाठार मतदान केंद्रावर १३५९ क्रमांकाच्या ठिकाणी गजानन शंकर आवळकर (वय ६३) या मतदाराचे नाव नमूद असल्याचे दिसून येते. तसेच १३५८ क्रमांकाच्या ठिकाणी संगीता गजानन आवळकर (वय ५६); तर ७१७ क्रमांकाच्या ठिकाणी जयप्रकाश शंकर आवळकर (वय ४९) यांचे नाव नमूद असल्याचे दिसून येते.
याच मतदारसंघातील यादी भाग क्रमांक १२७ मध्ये कराड शहर मतदान केंद्रावरसुद्धा, वर नमूद केलेले मतदार अनुक्रमे गजानन शंकर आवळकर (वय ६२) यांचे नाव ५७३ व्या क्रमांकावर, संगीता गजानन आवळकर (वय ५४) यांचे नाव ५७४ व्या क्रमांकावर; तर जयप्रकाश शंकर आवळकर (वय ४८) या मतदारांचे नाव दुबार नोंद असल्याचे स्पष्टपणे दिसून येते 

बोगस मतदानासाठीच दुबार नोंदणी
जाधव पुढे म्हणाले...या तिन्ही मतदारांनी बोगस मतदान करण्याच्या उद्देशानेच आपली नावे दोन्ही ठिकाणी जाणीवपूर्वक नोंदविल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. कारण वर दुबार नोंद असलेले गजानन शंकर आवळकर ही सामान्य व्यक्ती नसून, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्वीय सहाय्यक आहे. त्यांनी स्वत:बरोबरच पत्नीचे आणि भावाचे नाव वाठार व कराड अशा दोन्ही मतदान केंद्रावर ठेऊन, बोगस मतदान केल्याची दाट शक्यता आम्हाला वाटते.
वास्तविक याबाबत मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर विहित प्रक्रियेनुसार आक्षेप नोंदविण्यात आला होता. पण त्यावेळी श्री. आवळकर यांनी आपल्या पदाचा आणि माजी मुख्यमंत्री व तत्कालीन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वरदहस्ताचा वापर करत, स्वत:ची व कुटुंबीयांची दुबार नोंद रद्द होऊ नये, यासाठी मोठा खटाटोप केला. या प्रकरणात त्यांच्या या कृत्यामुळे एका बी.एल.ओ. प्रतिनिधीला घाबरुन राजीनामा द्यावा लागल्याचे प्रकरण सर्वश्रुत आहे. शिवाय ऐन निवडणुकीदिवशी त्यांनी दोन्ही केंद्रावर मतदान करण्याचा धक्कादायक प्रकारही केला असल्याचे, अनेकांनी स्वत: पाहिले आहे
बोगस कागदपत्रांचा वापर?
या मतदार यादीत वाठार आणि कराड येथे या तिन्ही मतदारांनी नोंदविलेल्या नावावेळी जे वय नमूद केले आहे, त्यातदेखील स्पष्ट तफावत दिसून येत आहे. त्यामुळे ही नावे नोंदविताना गजानन आवळकर यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी बोगस आधार कार्ड अथवा तत्सम कागदपत्रांचा आधार घेतला का?, याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याच गजानन आवळकर यांनी मतदार यादीबाबत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्या व्यक्तीने स्वत:च घोळ केला आहे, तो कुठल्या तोंडाने उच्च न्यायालयात गेला आहे? हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.
गुन्हे दाखल करुन, सखोल चौकशी करा!
राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकाचे नाव अशाप्रकारे बोगस मतदानासाठी दोन्ही ठिकाणच्या यादीत नोंदविले जाणे, हे धक्कादायक आहे. स्वत: स्वीय सहाय्यकच अशाप्रकारे नोंदणी करत असेल, तर आवळकर यांनी आपल्या या राजकीय बळाचा वापर करत संपूर्ण कराड दक्षिण मतदारसंघात अशाप्रकारे आणखी किती जणांची दुबार नोंदणी केली आहे?, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. त्यामुळे बोगस कागदपत्रे वापरुन, खोट्या वयाची नोंद करुन दुबार मतदार नोंदणी केल्याबद्दल या मतदारांवर गुन्हे दाखल करुन, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही या पत्रकार परिषदेद्वारे करत आहोत असेही ते म्हणाले
पृथ्वीराज चव्हाण यांची मूकसंमती आहे का?
राज्याचे मुख्यमंत्रीपद, केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रीपद, खासदार, आमदारपद भूषविलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या जबाबदार नेत्याचा स्वीय सहाय्यक अशी अनागोंदी करत असतानाही, त्याची कल्पना त्यांना नसेल यावर आमचा विश्वास बसत नाही. किंबहुना आपल्या स्वीय सहाय्यकाच्या या कृत्याला त्यांची मूकसंमतीच होती का? अशा प्रश्नही आम्हाला पडला आहे.
विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नेमलेल्या मतदार सत्यशोधन समितीचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मतदार यादीत काही घोळ झाला आहे का? याची पडताळणी केली जात असल्याचे समजते. मग या पडताळणीत त्यांना आपल्या स्वीय सहाय्यकानेच केलेला घोळ का बरे दिसला नसेल? की दिसूनही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे का, असा प्रश्नही आम्हाला या निमित्ताने त्यांना विचारावासा वाटतो.
लोकशाही तत्वांना हरताळ फासणारे कृत्य
मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीच्या स्वीय सहाय्यकानेच अशाप्रकारे दुबार मतदार नोंदणी करणे आणि ती कायम ठेवणे, हे कृत्य लोकशाही तत्वांना हरताळ फासणारे आहे. त्यामुळे लोकशाही तत्वांच्या संरक्षणासाठी अशाप्रकारे दुबार नोंदणी करणाऱ्या गजानन आवळकर यांच्यासह अन्य दोघांवर प्रशासनाने ताबडतोब गुन्हा दाखल करुन, त्यांची सखोल चौकशी करावी. जेणेकरुन या लोकांनी मतदारसंघात अन्य ठिकाणी अशा दुबार मतदारनोंदी कायम ठेऊन, जाणीवपूर्वक लबाडी केली आहे का?, याचाही उलगडा होऊ शकेल. वरील मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणीही मोहनराव जाधव यांनी यावेळी केली 


वार्ड क्रमांक 2 मधील कोल्हाटी समाज वस्तीतील रस्त्याचे लवकरच काँक्रीटीकरण होणार ; सदर कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देणार ; राजेंद्रसिह यादव यांनी दिला शब्द ; सामाजिक कार्यकर्ते विनायक कदम यांनी केली होती मागणी ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील कोल्हाटी समाज वस्तीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याबरोबरच त्या परिसरातील लाईट व गटारची कामे करण्यात यावी अशी मागणी युवा नेते विनायक कदम यांनी शिवसेनेचे सातारा जिल्हा समनवयक राजेंद्रसिह यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे.या सर्व कामासाठी  शासनाकडून निधी उपलब्ध करून देऊ व ही कामे लवकरच मार्गी लावू अशी ग्वाही राजेंद्रसिह यादव यांनी यानिमित्ताने दिली यावेळी  कोल्हाटी समासासह वार्ड क्रमांक 2 मधील नागरिक उपस्थित होते
दरम्यान राजेंद्रसिह यादव याना, विनायक कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की...
कराड नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक दोनमध्ये कोल्हाटी समाजाची वस्ती आहे. या वस्तीत अनेक ठिकाणी आतील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यांवर पाणी साचते व चिखलामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना, तसेच रहिवाशांना दैनंदिन कामांसाठी प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून आपण माननीय नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधित विभागाशी पाठपुरावा करून या रस्त्यांचे तातडीने काँक्रीटीकरण करून देण्यासाठी प्रयत्न करावा त्यामुळे या भागातील नागरिकांचा मोठा प्रश्न सुटेल व सर्वांना मोठा दिलासा मिळेल असा आम्हाला विश्वास आहे असे सदर निवेदनात म्हटले आहे

विनायक कदम हे विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर दिसतात त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे त्यांनी कोरोनात केलेल्या कामाची नेहमीच मोठी चर्चा होत असते नुकतेच त्यांनी वार्डातील नवमतदार नोंदणीचा यशस्वि कार्यक्रम घेत पक्ष नेतृत्वाकडून वाहवा मिळवली त्यांनी वार्डातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी पालिकेत जाऊन मागच्या आठवड्यात निवेदन दिले होते त्यानंतर पालिकेने तत्काळ त्याठिकाणच्या कुत्र्यांची धरपकड करत त्यांची नसबंदि केली होती नुकतीच त्यांनी वार्ड क्रमांक 2 मधील रस्त्यात असणारे खड्डे बुजवण्याची मोहीम नुकतीच राबवली आहे आणि आता त्यांनी या परिसरात काँक्रीट रस्ते वीज व गटर ची मागणी करत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे

दरम्यान राजेंद्रसिह यादव यांनी त्या परिसरातील रस्ते व गटरच्या दुरावस्थेची पाहणी केल्यानंतर विनायक कदम यांनी मागणी केल्याप्रमाणे या भागात काँक्रीट रस्ते गटर तसेच लाईटची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक तो निधी शासनाद्वारे उपलब्ध करून देऊ व लवकरात लवकर ही कामे मार्गी लावू असे लगोलग तेथेच सांगून टाकले 

यावेळी माजी नगरसेवक गजाभाऊ कांबळे  गुंड्याभाऊ वाटेगावकर सामाजिक कार्यकर्ते विनायक कदम विनोंद शिंदे ओंकार मुळे सुधीर एकांडे तसेच शूभम कांबळे नरेंद्र लिबे गणेश आवळे प्रमोद पवार नूरुल मुल्ला सुजित पवार बाबा जावळे विशाल जावळे आकाश पाटणकर सागर जावळे (सावळ्या) कार्यकर्ते उपस्थित होते

Friday, August 15, 2025

भारतीय नागरिक नसतानाही सोनिया गांधी मतदार होत्या; भाजपचा 1980 चा दाखला देत पलटवार ;

वेध माझा ऑनलाईन।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर ‘व्होट चोरी’चे आरोप केल्यानंतर भाजपने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने सोनिया गांधी यांच्या नावाचा संदर्भ देत काँग्रेसवर निवडणुकीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, सोनिया गांधी या 1983 साली भारतीय नागरिक बनल्या, पण 1980 सालच्या मतदारयादीत त्यांचे नाव कसे काय आले असा प्रश्न भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला. अमित मालवीय यांनी या संबंधित पुरावे देत असल्याचा दावा केला आणि काँग्रेसवर निवडणूक कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.भाजपाच्या IT सेल प्रमुख अमित मालवीय यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या माहितीनुसार, 1980 मध्ये सोनिया गांधी यांचा नाव नवी दिल्लीतील मतदार यादीत समाविष्ट आहे. परंतु त्यावेळी त्या भारतीय नागरिक नव्हत्या, तर इटलीच्या नागरिक होत्या असा दावा अमित मालवीय यांनी केला आहे. सोनिया गांधी यांना 1983 साली भारतीय नागरिकत्व प्राप्त झाल्याचं अमित मालवीय म्हणाले.

महापालिका निवडणुकीची ट्रायल? ठाकरे बंधूंचे एकत्रित पॅनल ; विरोधात फडणवीसांचे शिलेदार ! कोण मारणार बाजी?

वेध माझा ऑनलाइन।
गेल्या काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सातत्याने पाहायला मिळतात. आगामी मुंबई महापालिका निवडणूक मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येऊन लढेल, अशी चर्चा सुरु असतानाच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडीट सोसायटीची निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेची युती झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षाच्या कामगार सेना उत्कर्ष पॅनल हे एकत्र येऊन ही निवडणूक लढवणार आहेत. आता ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी खेळी केली आहे.बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलविरोधात भाजपचं पॅनल ठरलं आहे. ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दोन शिलेदार मैदानात उतरणार आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीत भाजपचं सहकार समृद्धी पॅनल हे निवडणूक लढणार आहे. भाजपकडून प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे बेस्ट पतपेढी निवडणूक ही अटीतटीची ठरणार असल्याचे बोललं जात आहे.

आम्ही तीन पक्षाचे सरकार आहे...अजितदादांनी कार्यकर्त्याला चांगलंच झापल ; कार्यकर्ता तिथून निघूनच गेला

वेध माझा ऑनलाइन।
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी नेहमीच ओळखले जातात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ते चांगलेच फटकरताना अनेकदा पाहायला मिळाले आहेत. मग त्यामध्ये सामान्य माणून असो किंवा अधिकारी अजित पवार हे नियमावर बोट ठेवून शिस्तीचे पालन करण्यास सांगत असतात. तसेच अजित पवार कार्यकर्ते असतील किंवा ठेकेदार त्यांनाही अनेकदा झापताना दिसतात. आजही बीडमध्ये अजित पवारांनी एका समर्थकाची चांगलीच कानउघडणी केल्याचं समोर आलं.

 एक समर्थक अर्ज घेऊन अजित पवारांकडे आला. यावेळी अजित पवारांनी तो अर्ज घेताच समर्थक काहीतरी बोलू लागला. यानंतर एक मिनिट ऐकायला शिक...कागद दिलंय ना...आम्ही तीन पक्षाचे सरकार आहे. महामंडळाचे वाटप अद्याप झालेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कोणती महामंडळ हे ठरेल...आमच्या वाट्याला महामंडळ आलं तर आम्ही विचार करू...नाही आलं तर ज्यांच्या वाट्याला येईल त्यांना जाऊन भेटा, असं म्हणत एका सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाला चांगलंच फैलावर घेतलं. या समर्थकाची कान उघडणे केल्यानंतर इतर समर्थकांनी मात्र काढता पाय घेतला.

पुढील तीन दिवसात कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्राला हवामान खात्याकडून मान्सूनचा येलो अलर्ट...

वेध माझा ऑनलाइन
राज्याच्या विविध भागांत मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, विदर्भ आणि मराठवाड्यात विशेषतः जोरदार पावसाची शक्यता आहे. मान्सूनच्या वाऱ्याची तीव्रता अधिक वाढल्याने विदर्भात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर येणाऱ्या तीन दिवस कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्राला हवामान खात्याकडून मान्सूचा येलो अलर्ट जारी केला आहे तर मराठवाड्याकरता हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यासह विदर्भाला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती पुणे हवामान विभागचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी.सानप यांनी दिली आहे. 

रोहित पवार म्हणाले ...तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील!

वेध माझा ऑनलाइन।
सामान्य जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवा बेरोजगारांचे प्रश्न घेऊन आपण भंडाऱ्यात शेतकरी मोर्चा तथा मंडल यात्रा काढत आहे. मतांची चोरी पकडी गई, राहुल गांधींनी उघड उघड पुराव्यानिशी मतांची चोरी झाल्याचं प्रेस कॉन्फरन्समधून जाहीर केलं आहे. आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत, टप्प्याटप्प्याने समोर येणार आहोत. मतांची चोरी म्हणजेच लोकशाहीची चोरी आहे. लोकशाहीची चोरी होत असेल तर, गरिबांना न्याय देता येणार नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला. तसेच, अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. 

राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली असून मोठ्या संख्येने आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. सध्या ते आमदार सत्तेत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आणखी काही नेते त्यांची साथ सोडत आहेत. त्यातच, रोहित पवार यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आम्ही भाजपाच्या विरोधात अहो, भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. त्यामुळे, जर अजित पवारांनी भाजपची साथ सोडली आणि शरद पवार साहेबांसोबत पुरोगामी विचारासोबत ते आले तर आम्ही त्यांचा विचार करू. मात्र, अजित पवार भाजपसोबत असतील तर आम्ही एकत्र येऊच शकत नाही. जर त्यांनी भाजपला सोडलं तर सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचं तो विचार केला जाईल, असे म्हणत अजित पवारांनी भाजपची साथ सोडल्यास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात रोहित पवारांनी भाष्य केलं.

निवडणुका घेताच कशाला? पालघरमध्ये एकाच महिलेचे मतदारयादीत सहा ठिकाणी नाव असल्याचं आलं समोर : त्यावरुन माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर केली टीका ;

वेध माझा ऑनलाइन 
निवडणूक आयोगाला मतदारयादीत घोळ घालून निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यांनीच ग्रामपंचायतीपासून आमदार-खासदार पदाचे उमेदवार जाहीर करावेत, निवडणुकीचा प्रश्न उरणार नाही अशी संतप्त टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली. हितेंद्र ठाकून यांनी निवडणूक आयोगावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत.

अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारयादीतील घोळाबाबत आयोगावर टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर पालघरच्या सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे एका मतदार यादीत तब्बल सहा वेळा नाव असल्याचा प्रकार उघड झाला. याच मुद्द्यावरून ठाकूर यांनीही निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.
अशा प्रकारचे असंख्य घोळ मतदारयादीत आहेत. आम्ही हे प्रकार वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. लोकसभा आणि विधानसभेत अशाच प्रकारे परिवर्तन झालं असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदाराच्या घोळावर प्रतिक्रिया देताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, "जर निवडणूक आयोगाकडूनच अशी निष्क्रियता राहणार असेल, तर यापुढे कोणत्याही निवडणुका घेण्याची गरज नाही. थेट ग्रामपंचायतीपासून आमदार- खासदारापर्यंतचे उमेदवार आयोगानेच घोषित करावेत. त्यामुळे ग्रामपंचायतचा सदस्य कोण किंवा आमदार कोण हा निवडणुकीचा प्रश्नच राहणार नाही

Thursday, August 14, 2025

डोंबवली बँकेच्या कराड शाखेच्यावतीने पोलीसांना राखी बांधून रक्षा बंधन केले साजरे ; व्यवस्थापक विजय देशपांडे यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन
डोंबवली नागरी सहकारी बँकेच्या कराड शाखेच्या वतीने बँकेच्या स्टाफकडून कराड शहर पोलीस स्टेशन येथे पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले याबाबतची माहिती व्यवस्थापक विजय देशपांडे यांनी वेध माझा ला बोलताना दिली

ते म्हणाले रक्षाबंधन हा सण विश्वासाचा सण आहे पोलीस हे खऱ्या अर्थाने समाजाचे रक्षणकर्ते आहेत त्यांच्या कर्तव्यप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या ऋणात राहणे व त्यांच्या पाठीशी नागरिक म्हणून खंबीर उभे राहण्यासाठी म्हणून आम्ही डोंबवली बँक कराड शाखेकडून त्यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून आमच्या त्यांच्याबद्दलच्या असलेल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या

यावेळी महिला पोलीसांसह कराड शहर पोलीस प्रमुख तसेच पोलीस कॉन्स्टेबल व अधिकारी वर्गाला राखी बांधण्यात आली
शाखा व्यवस्थापक विजय देशपांडे तसेच उमेश महाडिक दत्तात्रय माळी स्वाती बोराटे श्वेता लाड प्रियांका गवाते आदी स्टाफ यावेळी उपस्थित होता

कराड शहरातील मतदार यादीत बाहेरील भागातील नावे समाविष्ठ झाल्याचे निष्पन्न - याबाबत योग्य ती कारवाई करा: सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पेंढारकर, दीपक पाटील,अजय उंडाळकर व विक्रम जाधव यांची मागणी ; प्रांतांना निवेदन सादर ;

वेध माझा ऑनलाईन
परगावातील परजिल्ह्यातील तसेच शहर भागातील दुसऱ्या पेठेतील मतदारांची नावे कराड दक्षिण मतदार संघांतर्गत असणाऱ्या कराड शहरातील मतदार यादीत समाविष्ठ झाल्याचे निदर्शनास आले असल्याने याबाबतची योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील व अजय उंडाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे

निवेदनात म्हटले आहे की चुकीच्या भागात नोंद झालेली नावे त्याठिकाणहून वगळून योग्य त्या ठिकाणी नोंद व्हावीत जेणेकरून त्याही लोकांचा मतदान हक्क अभाधित राहील 
तसेच काही स्थलांतरित मतदारांसह दुबार व मयत मतदारांची  नावे देखील
संबंधित यादीत आहेत याबाबत देखील योग्य तो बदल व्हावा
ऑनलाइन नोंदणीमुळे चेकलिस्टला पडणारी नावे चेक करून त्यानंतर नावे संबंधित लिस्टमध्ये समाविष्ट करावी
बाहेरील नावे अजूनही लिस्ट मध्ये नोंद होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे
संबंधित मतदार यादीत 30 ऑक्टोबर  2006 पूर्वी जन्म झालेल्यांची नावे नोंद होताना दिसत आहेत मात्र 1 नोव्हेम्बर  नंतर जन्म झालेल्याची नावे या यादीत नोंद होत नाहीत तसेच 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावे देखील या मतदार यादीत नोंद होत नाहीत  याकडे लक्ष देऊन संबंधित प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशीही मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे
दरम्यान सदर मागण्यांचे निवेदन माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, अजय उंडाळकर व विक्रम जाधव यांनी कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे  याना आज दिले

Tuesday, August 12, 2025

नामदेवराव पाटील म्हणाले ... कराड विमानतळासाठीचा प्रशासकीय परवानगी पासून ते निधी मिळेपर्यंतचा पूर्ण पाठपुरावा पृथ्वीराजबाबांचाच...

वेध माझा ऑनलाइन
 स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांचे स्वप्न आणि धोरण होते की प्रत्येक तालुकास्तरावर विमानतळ असले पाहिजे. त्यानुसार कराड येथे विमानतळाची स्थापना झाली. त्यानंतर कालांतराने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर कराड चे सुपुत्र श्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त कराड साठी विशेष निधीची तरतूद केली. त्याचवेळी कराड विमानतळाचे विस्तारीकरण भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे जाणून यासाठी पृथ्वीराज बाबांनी तरतूद करीत नियोजन केले. कराड विमानतळाचे विस्तारीकरण हे माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचे काम असून त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील हा एक महत्वाचा उपक्रम आहे. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीने मुख्यमंत्री पदाच्या काळापासून कराडच्या विमानतळाचे विस्तारीकरण साठी सर्व प्रशासकीय परवानगी पासून ते निधी मिळेपर्यंत पूर्ण पाठपुरावा केलेला आहे. कराडच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी १७.१६ कोटींच्या निधीबाबत जो श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला त्याबाबतची सत्यता व माहिती देणे महत्वाचे असल्याने हे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडत आहे. 

वास्तविक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे कराड विमानतळाच्या विस्तारीकरण साठी मुख्यमंत्री काळापासून आग्रही आहेत. विस्तारिकरण बाबतच्या सर्व परवानगी आणि प्रशासकीय मान्यता पृथ्वीराज बाबांच्या पाठपुराव्याने पूर्तता झाल्यानंतर निधी प्राप्त व्हायला सुरुवात झाली. 2023-24 साली २२१.५१ कोटी इतका निधी मंजूर झाला. ४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन आदेशात स्पष्ट नमूद केले आहे कि, कराड विमानतळाच्या विस्तारीकरण कामासाठी २८ ऑगस्ट २०१२ च्या शासन निर्णयान्वये रु. ९५.६४ कोटी इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच उक्त शासन निर्णयातील कामांसाठी २९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु. २२१.५१ कोटी इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. 

तसेच या शासन निर्णयामध्ये असे आहे कि, २९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे वळतीकरण करणेकरीता रु. ८.५० कोटी इतक्या खर्चासाठीची रक्कम हि. २८ ऑगस्ट २०१२ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे ठेवण्यात आली आहे. शासन आदेश स्पष्ट वाचला की समजून येईल. शासन आदेशात स्पष्ट आहे कि, २९ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयातील अ.क्र. ९ मधील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजेनच्या पाईपलाईनचे स्थलांतर करण्याकरिता रु. १७.१६ कोटी इतक्या खर्चास द्वितीय सुधारित मान्यता देण्यात येत आहे. असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. 

तसेच विमानतळ बाधितांना मोबदला मिळण्यासाठी व पुनर्वसनाकरिता भूसंपादनाची कार्यवाही व भैरवनाथ पाणीपुरवठा योजेनच्या पाइपलाइनचे स्थलांतर करणे या विषयावर माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै २०२४ रोजी मिटिंग सुद्धा झाली होती. 

यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी कराडच्या विकासासाठी दूरदृष्टीचा विचार करून कराडच्या विमानतळ विस्तारीकरणसाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे तसेच निधी सुद्धा मंजूर करून आणला आहे. पृथ्वीराज बाबांनी कराडचा सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे दुरदृष्टीने विकास केला आहे. पृथ्वीराज बाबांनी केलेल्या कामांचे उदघाटन तसेच त्यांनी आणलेला विकासनिधी बाबत कोणताही श्रेयवाद न करता कराड दक्षिणची आजपर्यंतची गरिमा राखली पाहिजे.