Thursday, October 1, 2026

कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ ; प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याचा भोसले पॅनेलने शब्द दिला होता ; भोसलेंनी शब्द पाळला :

वेध माझा ऑनलाइन।
य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सभासदांना देण्यात येणाऱ्या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला. कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले (बाबा) यांच्या हस्ते साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

पहिल्या दिवशी कारखाना कार्यक्षेत्रातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द तसेच वाळवा तालुक्यातील रेठरे हरणाक्ष, बिचूद तसेच कमळापूर, रामापूर या गावात सभासदांना साखर वितरण करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये नियोजनानुसार मोफत घरपोच साखर वितरित केली जाणार आहे. जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रत्येक सभासदास दिली जाणारी प्रतिशेअर ६० किलो मोफत साखर घरपोच देण्याचे अभिवचन दिले होते. या अभिवचनाची वचनपूर्ती दरवर्षी कारखाना करत आहे. यंदाही या मोफत घरपोच साखर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला आहे.  

याप्रसंगी व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे, संचालक लिंबाजी पाटील, बाजीराव निकम, संग्राम पाटील, अरविंद पाटील, बाळासो जगताप, अविनाश खरात,  मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार तसेच माजी संचालक जयवंतराव सावंत, ब्रिजराज मोहिते, दिपकराव जाधव, पै. आनंदराव मोहिते, एम.के. कापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. साखर पोत्यांच्या वाहनांचे पूजन करून वाहने रवाना करण्यात आली.


No comments:

Post a Comment