पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने महत्त्वपूर्ण संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक समीर माधवराव मोहिते यांच्या सूचनेनुसार मुकेश आनंदराव मोहिते यांची सातारा दक्षिण विभाग समन्वयकपदी, तर अमरजीत सत्यवान कांबळे यांची सातारा उत्तर विभाग समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन्ही नवनियुक्त समन्वयकांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले. पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातील सातारा जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविणे, पदवीधर मतदारांशी प्रभावी संपर्क निर्माण करणे तसेच तळागाळातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संघटनेशी अधिक मजबूतपणे जोडणे, या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील पदवीधर मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका आणि विचार पोहोचविण्यासोबतच मतदारसंघातील विविध भागांमध्ये संघटनात्मक बैठका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय आणि पक्षाच्या संघटनात्मक उपक्रमांना गती देण्याची जबाबदारी दोन्ही समन्वयकांवर असणार आहे.
या नियुक्तीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा), विधिमंडळ गटनेते आ. सतेज पाटील, आ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील, प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र बेडके तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र शेलार यांनी मुकेश मोहिते व अमरजीत कांबळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या नियुक्त्यांमुळे सातारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा असून, पुणे पदवीधर मतदारसंघातील संघटनात्मक बांधणी अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी दोन्ही समन्वयकांकडून काम केले जाणार आहे.
No comments:
Post a Comment