वेध माझा ऑनलाईन
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर भुजबळांच्या मालकीच्या बेनामी संपत्तीची चौकशी होणार आहे. विशेष सत्र न्यायालयाने तसे आदेश दिले आहेत. या आधी ही चौकशी तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आली होती. ती आता पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आपल्या जीवावर राजकारणी स्वतःचे खिसे भरतात, मात्र आपल्याला न्याय मिळत नाही. आता भुजबळांची चौकशी सुरू झाल्यानतंर तरी देवेंद्र फडणवीस हे त्यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करणार की नाही असा प्रश्न अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, "छगन भुजबळ आणि त्यांच्यासारखे असंख्य मंत्री जे अमाप पैसा कमावतात, त्यांच्याविरुद्ध कितीही लढलात तरी तुम्ही जिंकणार नाहीत याची त्यांना खात्री असते. छगन भुजबळ यांनी कोविड काळात पिटीशन फाईल केलं. तेव्हा महाराष्ट्र सदन घोटाळ्याला चॅलेंज करता येणार नाही असा जीआर काढण्यात आला. त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये सुद्धा असाच प्रकार झाला. म्हणून छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्री माझ्यावर अब्रू नुकसानीचे दावे धडधड करतात."
No comments:
Post a Comment