Thursday, September 4, 2025

छगन भुजबळ सरकारमध्ये मनापासून सहभागी नाहीत, ते असह्य मानसिकतेतून सत्तेत आहेत ; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा कराडमध्ये गौप्यस्फोट ; वेध- माझा शी केली बातचीत ; आणखी म्हणाले...गजेटच्या जीवावर आरक्षण देता येते का? तसा निकष नाहीये...

वेध माझा ऑनलाईन।
छगन भुजबळ हे असह्य मानसिकतेतून या सरकारमध्ये सामील झाले असावेत... कारण ते प्रतिगामी सरकारचे सध्या घटक आहेत...मात्र ते मूळ पुरोगामी विचाराचे आहेत...मी त्यांना चांगले ओळखतो...आम्ही एकत्र काम केले आहे , ते सिनिअर नेते आहेत... ते मनापासून या सरकारमध्ये नक्कीच सहभागी झाले नाहीत...असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज कराडमध्ये वेध माझा शी बोलताना केला

दरम्यान जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून मुंबईत उपोषण केले ते त्यांनी फार मोठ्या परिपक्वतेने हाताळले त्यात त्यांनी मुंबई व संपूर्ण राज्याची काळजी घेतली असल्याचे दिसले असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक केले...मात्र सरकारकडून मिळालेला या संबंधितचा जीआर पाहिल्यानंतर मराठ्यांची काळजी वाटते असेही थोरात म्हणाले... मराठा समाजाला नेमकं त्यातून काय दिलंय?असा सवाल करत त्यांनी राज्यात मराठा आरक्षण मिळेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली.. सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले

ते आज कराड येथील शासकीय विश्राम गृह येथे आले असता वेध- माझा शी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले

ते पुढे म्हणाले...आमदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या सरकारच्या माध्यमातून सातारा गॅजेट ची जबाबदारी घेतली आहे मात्र खरतर गॅजेट च्या जीवावर आरक्षण देता येते का?तसा निकशच नाहीये मग कसे आरक्षण देणार? हाच मोठा प्रश्न आहे...आरक्षण चिघळत चाललंय म्हणून काहीतरी शब्द द्यायचा म्हणून हा प्रयोग केला गेला असावा आणि जरांगे पाटील यांनीही या प्रश्नाबाबत परिपक्वता दाखवत आरक्षण थांबवत मुंबई आणि महाराष्ट्राची एकप्रकारे चांगली काळजी घेतली असेही थोरात म्हणाले...
पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांसहित त्यांच्या पी ए आवळकर याच्या दुबार मतदान करण्याबाबतच्या भाजप च्या आरोपाला उत्तर देताना त्यांनी याबाबत प्रशासनाला जबाबदार धरत वेळेवर नावे कट केली गेली नसल्याने हा प्रश्न उपस्थित झाल्याचे थोरात म्हणाले

भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जातंय असा आरोपही त्यांनी यावेळी केला तसेच
शेतकऱ्यांच्या प्रश्नासह सरकारचे राज्यातल्या अनेक मुद्यावर दुर्लक्ष होत असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली
दरम्यान राहुल गांधी यांच्या व्होटचोरी च्या मुद्याला  राज्यात लोकांपर्यंत पोचवायला काँग्रेस कमी पडतंय का? या प्रश्नावर सविस्तर उत्तर देण्याचे टाळत त्यांनी पुन्हा भाजपवर टीका केली

No comments:

Post a Comment