उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रिकरण करण्यासाठी तुम्ही जसा पुढाकार घेतला त्याप्रमाणे अजितदादा आणि थोरले पवार साहेब यांच्या पुन्हा एक होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का ?या वेध माझा च्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सावधपणे उत्तर देत... टाळी एका हाताने वाजत नाही... असे म्हणत अजितदादा पुन्हा एक होण्यासाठी तयार नाहीत... असेच सुचवले...
काल सोमवारी राष्ट्रवादी च्या नेत्या खा सुप्रिया सुळे कराडात आल्या असता त्यांनी विरंगुळा बंगला येथे पत्रकारांशी संवाद साधला
त्या पुढे म्हणाल्या आमदार जयंत पाटील यांच्यावर भाजप च्या गोपीचंद पडळकरांनी ज्या खालच्या दर्जाची टीका केली त्याचा मी निषेध करते ...मात्र अजितदादा आणि रोहित पवार हे देखील शासकीय अधिकाऱ्यांना अरेरावी च्या भाषेत बोलले असल्याची व्हीडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली आहे मग याही दोघांच्या बोलण्याचा तुम्ही निषेध करता का?या वेध माझा च्या प्रश्नावर उत्तर देताना... प्रत्येकाने कोणाशीही बोलताना सुसंस्कृतपणे बोललं पाहिजे...आपण यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात राहतो... असे म्हणत त्यांनी गुळगुळीत उत्तर दिले...मग...त्यांच्याही बोलण्याचा तुम्ही निषेध करता का?असे विचारले असता आत्या या नात्याने मी रोहितला सुसंस्कृत बोलण्याचा नक्कीच सल्ला देईन,कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत म्हणून तो रागात तसे बोलला असेल असे म्हणत... त्यांनी विषय तिसरीकडेच नेला...
माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर पक्षातच नाराजी का आहे ? त्यांना लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या नेतृत्वाने उमेदवार म्हणून का डावलले? तसेच जयंत पाटील पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा आहे... नेमकं पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीत काय चाललंय ? नेमकं चुकतंय कोणाचं? एकेकाळच्या बालेकिल्ल्यात पक्षाची अशी अवस्था का ? या प्रश्नावर... झालं गेलं जाऊ दे...माझ्याही पक्ष सोडण्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात...या बातम्या देणारे सूत्र कोण असतात...हेच कळत नाही...अस म्हणत त्यांनी तीसरीकडेच विषय नेला... मात्र वेध माझा च्या प्रश्नावर प्रॉपर उत्तर देणे टाळले.
No comments:
Post a Comment