कराडच्या कॉटेज हॉस्पीटलची स्वच्छता वेळच्या वेळी होत नाही त्याचा रुग्णांना त्रास भोगावा लागतो अशा अनेक तक्रारी वारंवार येत होत्या तरीही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होते कराडच्या दिवटे गल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आ अतुल भोसले याना याबाबतचा मेसेज केला त्यानंतर तातडीने कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले यांनी त्याठिकाणी स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणची स्वच्छता करण्याचे आदेश कृष्णा हॉस्पिटलच्या स्वच्छता टीमला दिले व कॉटेज हॉस्पिटलची स्वछता करून घेतली कॉटेजच्या रुग्णांसह शहरातील सुज्ञ नागरिकांनी त्यानिमित्ताने आमदार भोसले यांचे अभिनंदन केले आहे
शहर व परिसरातील गोर गरिबांच्या उपचारासाठी महत्वाच्या असलेल्या कॉटेज हॉस्पिटलमधील संडास बाथरूमच्या अस्वच्छतेसह त्या हॉस्पिटल परिसराचा कॅम्पस व एकूणच त्याठिकाणी सगळीकडेच घाणेरडे वातावरण असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार अतुल भोसलेंनी कृष्णा हॉस्पिलच्या "स्वच्छता टीमला' त्याठिकाणची स्वच्छता करण्याचे आदेश दिले व कॉटेज रुग्णालयाचा कायापालटच करून टाकला आहे
त्याठिकाणी अस्वच्छतेमुळे रुग्णांना त्रास होत असल्याच वारंवार बोललं जातं होत तशा तक्रारी रुग्ण व इतर लोकांकडून सातत्याने येत होत्या डॉ भोसले यांच्या कानावर या तक्रारी आल्यानंतर याविषयाला गांभीर्याने घेत त्याठिकाणची स्वछता करण्यासाठी त्यांनी तात्काळ आदेश दिले
त्यानिमित्ताने छोट्या छोट्या गोष्टीचे देखील गांभीर्य ओळखून जनतेच्या सेवेत आपले कर्तव्य असल्याची भावना असलेला कार्यक्षम व संवेदनशील आमदार म्हणून आमदार अतुल भोसले यांची आता ओळख निर्माण होऊ लागली आहे
आमदार नसताना त्यांनी हजारो कोटींचा निधी शहर व परिसरासाठी आणला होता आणि आमदार झाल्यावर त्यावरच काम करत त्यांनी आपला शब्द पाळला आहे संपूर्ण कराड दक्षिणमध्ये त्यांनी आणलेली विकासकामे सुरू आहेत त्यांच्या विकसनशील दृष्टीने शहराचा चेहरा बदलत आहे तरी अजूनही अतुलबाबा निधी आणतच आहेत व परिसराचा विकास त्यांच्याकडून सातत्याने चालूच आहे आणि आता दोन दिवसांपूर्वी कराडच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये स्वछतेचा अध्याय गिरवत आमदार भोसले यांनी मोबाईलवर आलेल्या एका मेसेजवर ऍक्शन घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे
एक संवेदनशील आमदार म्हणून त्यांनी यानिमित्ताने आपली ओळख निर्माण केली आहे शहर व परिसरात तशी चर्चाही सुरू आहे शहरातील सुज्ञ नागरिकांनी त्यानिमित्ताने आमदार भोसले यांचे अभिनंदन केले आहे
No comments:
Post a Comment