कराड मधील एकाच वार्डातील एकमेकांचे राजकीय विरोधक म्हणून शहराला परिचित असलेले नगरसेवक इंद्रजित गुजर आणि राजेंद्रसिह यादव यांचे राजकीय मनोमिलन झाल्याची चर्चा अनेक दिवसांपासून शहरात सुरू होती मात्र आज प्रत्यक्षात राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इंद्रजित गुजर 4 वाजण्याच्या दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह आले असता अनेकांच्या भुवया त्याठिकाणी उंचावल्या त्यामुळे आता शहरात राजकीय समीकरणाचा वेगळाच ट्विस्ट निर्माण झालाय अशी चर्चा आहे
कराड मधील शनिवार पेठेतील नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले राजेंद्रसिह यादव आणि इंद्रजित गुजर यांचा राजकीय विरोध गेली दोन दशके शहराने पहिला आहे यादव आणि गुजर त्याठिकाणी एकमेकविरोधात नगरसेवक म्हणून निवडूनही आले आहेत... मात्र या वेळच्या होणाऱ्या पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद ओपन पडल्यास राजेंद्रसिह यादव उमेदवार म्हणून इच्छुक आहेत, तर इंद्रजित गुजर यांनी नुकतीच झालेली आमदारकीची निवडणूक लढवली आहे... नगरपरिषदेच्या होणाऱ्या यावेळच्या शहरातील राजकारणात एकमेकाला मदत करन्यासाठी एकत्र येण्याचा मानस या दोघांकडूनही समनवयक पद्धतीने करण्यात आला होता... त्या अनुषंगाने एकत्र येत या दोघांच्यात एक बैठक देखील पार पडली होती... त्याचवेळी ही युती फिक्स झाली अशीही चर्चा होती... आणि आज यादव यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः इंद्रजित गुजर व राजेंद्रसिह यादव या दोघांनी उघडपणे एकत्रित येत या युतीसंदर्भातील कराडकरांसमोर आपली पाने उघड केली... त्यामुळे इंद्रजित गुजर यांच्या जनपरिवर्तन आघाडीसह राजेंद्रसिह यादव यांची यशवंतआघाडी शहरातील होणाऱ्या पालिका निवडणुकीत एकमेकांला मदत करणार का? अशी चर्चा आहे...
तर दुसरीकडे यादव यांच्या वाढदिवसानिमित्त काल शहरातील लोकशाही आघाडीच्या सौरभ पाटील यांनी देखील यादव याना आपल्या निवासस्थानी नेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या... त्यामुळे त्यांच्याही या भूमिकेचा पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक अर्थाने राजकीय तर्क लावला जात आहे...लोकशाही आघाडी यादव यांच्या आघाडीशी पालिका निवडणुकीत जुळवून घेण्यासाठी इच्छुक आहे का? अशाही चर्चा यानिमित्ताने सुरू आहे...
दरम्यान शहराची निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे अशा चर्चा आता होणारच...
No comments:
Post a Comment