सातारा जिल्ह्यातील सातारा वाई महाबळेश्वर पाचगणी म्हसवड मलकापूर रहिमतपूरसह कराड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची सोडत ऑक्टोबर मध्ये मुंबईत काढली जाणार असल्याची माहिती मिळत आहे कराड शहरात नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांनी जोरदार तयारी करत कम्बर कसली आहे दरम्यान प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर नगरसेवक पदासाठीची सोडत निघेल व त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठीची सोडत निघणार असल्याची माहिती आहे
दरम्यान ओपन आरक्षण पडल्यास कराड शहरात नगराध्यक्ष पदासाठी 7 ते 8 इच्छुकांची नावे आतापासूनच चर्चेत आहेत
त्यामध्ये शहरातील प्रत्येक राजकीय पार्टीच्या प्रमुखाच्या नावाची या उमेदवारीसाठी चर्चा आहेच याशिवाय त्याच पार्टीतील आणखी एक किंवा दोन इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा देखील गावात आहे त्यामुळे साहजिकच नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस व अंतर्गत कुरघुड्या पहायला मिळणार आहेत... तसेच भाजप मधून या पदासाठी अनेकजण इच्छुक असून काहीजण पक्षाने उमेदवारीसाठी शब्द दिला तर ऐनवेळी पक्षप्रवेश करून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपली तयारी करत आहेत...
काँग्रेस व राष्ट्रवादी कडून देखील इच्छुकांची तयारी सुरू आहे... झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरी भाजप चा उमेदवार जिल्ह्यात निवडून आला असला तरी कराड शहरापुरत बोलायचं झाल्यास त्या निवडणुकीत राष्ट्रवादीने कराड शहरात भाजप च्या उमेद्वारासमोर लक्षवेधी मते घेतली आहेत...तर... त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ अतुल भोसलेंनी शहरात लीड घेतले आहे...
म्हणजेच शहरातील मतदारांचा लोकसभेला एका बाजूला तर विधानसभेला दुसऱ्या बाजूला असा कौल दिसून आला हा कौल देणाऱ्या कराड शहराची आता होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कोणाच्या पदरात मताचं दान टाकण्याची मानसिकता असेल? याचा विचार करूनच शहरातील प्रत्येक पार्टी अथवा राजकीय पक्ष यावेळी आपला उमेदवार जाहीर करेल...अशी शक्यता आहे...
दुसरीकडे या निवडणुकीकरिता जातीयतेच्या मुद्यांची किनार लावून त्या मतांना आपलेसे करत काही इच्छुक या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे... त्याकरिता उमेदवारांकडून हिंदू आणि मुस्लिम कार्ड खेळलं जाऊ शकत... हेही लक्षात घेतलं पाहिजे...
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याही मुद्यांना पुढे करून काही उमेदवार ही निवडणूक कॅच करायला नक्कीच बघतील... हा मुद्दा देखील सध्या जोरदार गाजतोय... त्यामुळे हा मुद्दा पुढे करत काही उमेदवार आपले नशीब त्या, - त्या मतदारांच्या जिवावर आजमावू शकतात... हेही तितकेच खरे...
या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभा नसेल असं आत्तातरी दिसतंय... मात्र मते खाण्यासाठी म्हणून आणि एखाद्याची जिरवायची ठरवून ऐनवेळी एखादा उमेदवार आपली उमेदवारी अपक्ष म्हणून जाहीर करू शकतो अशीही चिन्हे आहेत ...
हे सगळे राजकीय अंदाज असले तरी नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार प्रत्यक्ष बाहेर पडतील... त्यावेळी त्यांची नावे देखील लोकांसमोर येतील...त्यावेळी त्या सर्वच इच्छुक उमेदवारांची शहरातील लोकांमध्ये असणारी ईमेज... आतापर्यंतचे त्यांचे समाजासाठीचे केलेलं उपयुक्त कार्य, शहराच्या विकासासाठी त्या उमेदवाराचे आत्तापर्यंतचे योगदान, भविष्यात शहरासाठी त्या उमेदवाराचे विकसनशील व्हिजन काय आहे... या आणि अशा अनेक बाबी पाहूनच जनता या शहराचा नगराध्यक्ष निवडून देणार आहे...
दरम्यान कराड पालिकेची मुदत संपून 3 ते 4 वर्षाचा कालावधी निघून गेला आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना होईल अशी शक्यता आहे त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठीची सोडत निघणार आहे, त्यामुळे...यापुढची चर्चा त्यानंतरच करू...तूर्तास इतकंच ...!
No comments:
Post a Comment