Sunday, November 16, 2025

कराडच्या प्रभाग क्रमांक 10 मधून सौ मनीषा मुळे यांचा भाजपकडून अर्ज दाखल -

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवार दिनांक 15 रोजी सौ मनीषा किरण मुळे यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

उमेदवार मनीषा किरण मुळे या युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते किरण मुळे यांच्या पत्नी आहेत किरण मुळे हे भाजप चे तसेच आमदार अतुल भोसले यांचे अत्यन्त विश्वासू म्हणून ओळखले जातात

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.  सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

No comments:

Post a Comment