कराडच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये उमेदवार असलेले माजी नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी आजच भाजप मध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे शहरातील राजकारणात आमदार अतुल भोसलेंनी सांगितल्याप्रमाणे अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी धक्का नाही तर भूकम्प घडवल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत
दरम्यान अतुल भोसले शहरातील राजकारणात भूकम्प घडवणार असे काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः म्हटले होते त्याप्रमाणे आज घडले असेच म्हणावे लागेल
भाजप मध्ये कराडमधील अनेक दिगग्ज नगरसेवक जाणार असे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच नगरसेविका स्मिता हुलवन शिवाजी पवार त्याचबरोबर इंद्रजित गुजर संजय कांबळे अप्पा माने या नगरसेवकांना मिळवण्यात अतुल भोसले यशस्वी झाले मात्र आणखी 3 जण त्यांच्याबरोबर जातील असे वातावरण शहरात असताना त्यांच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू होत्या त्यात गुंड्याभाऊ वाटेगावकर यांच्या नावाची चर्चा होती
तरीदेखील वाटेगावकर हे शिवसेनेच्या मेळाव्याला हजर होते त्याचवेळी या चर्चाना पूर्णविराम मिळाला असे सांगितले गेले
मात्र काल रात्री पासून पुन्हा भाजप च्या गोटात वाटेगावकर भाजप मध्ये येणार असे बोलले जाऊ लागले तोच आज अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी वाटेगावकर भाजप मध्ये प्रवेशकर्ते झाले यावर शिक्कामोर्तब झाले आहे म्हणजेच अतुल भोसले म्हटल्या प्रमाणे...हाच तो भूकम्प शहरातील राजकारणात झाला... अशी गावात जोरदार चर्चा सुरू झाली आहे... वाटेगावकर यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजप ची ताकद अधिक वाढली आहे
No comments:
Post a Comment