आज सोमवारी सायंकाळी शहरातील शनिवार पेठेतील यशवन्त हायस्कुल मागील परिसरातील कराड पालिकेच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशन क्रमांक 1 चे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कराडच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री देसाई यांनी दिली
यावेळी माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बाळासाहेब पाटील व नगराध्यक्ष यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त करत पालकमंत्री देसाई यांचे आभार मानले
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरे ... मला माहित नाही... माहिती घेतो... आणि मग बोलतो अशाच सुरात दिली... मात्र काही प्रश्नावर ते सविस्तर बोलले हेही खरे आहे!
त्यापैकी पदवीधर निवडणुकीतील पराभवावरून जयकुमार गोरेंच्या विधानावर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली
पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर जयकुमार गोरेंनी महायुतीतील घटक पक्षांवर फसवणुकीची शंका व्यक्त केली होती. यावर बोलताना शंभूराज देसाईंनी गोरेंनी कुणाचंही नाव घेतलं नसल्याचं म्हटलंय. महायुतीतील वीसपेक्षा अधिक घटक पक्ष एकत्र बसून पराभवाची कारणं शोधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेने आपल्या परीने प्रयत्न केल्याचंही देसाईंनी स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे यांच्या जावयाला सरकारने १२०० एकर सुपीक जमीन दिल्याच्या आरोपावर देसाईंनी सावध भूमिका घेतली. या प्रकरणाची आपल्याला पुरेशी माहिती नसल्याने माहिती घेतल्यानंतरच भाष्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
सांगलीला पाणी रोखल्याच्या आरोपावरही देसाईंनी स्पष्टीकरण दिलं. अल निनोच्या प्रभावामुळे कोयना धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टीएमसीने कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. पिण्याचं पाणी, जनावरांसाठी पाणी आणि राखीव साठ्याचं नियोजन लक्षात घेऊन पाणी सोडण्याच्या प्रमाणाचा अभ्यास जलसंपदा विभागाला करण्यास सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.
किणी टोलनाक्यावर ऊसदरासाठी होणाऱ्या आंदोलनाबाबतही देसाईंनी भूमिका स्पष्ट केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन संचालक मंडळाने पुढाकार घेऊन बैठक आयोजित करावी आणि ऊसदराच्या प्रश्नावर मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, असं त्यांनी म्हटलंय.
No comments:
Post a Comment