, 28 जून : राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी राज्यात सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर ते बोलत आहेत. राज्यात लॉकडाऊनदरम्यान, शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. अशात राज्यातला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य अनलॉक होत असताना अनेक दुकानं आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावेळी आपण शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभं राहणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.
No comments:
Post a Comment