अजिंक्य गोवेकर
कराड
कोरोना प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या शाळांचे सत्र कधी आणि कसे सुरू होणार हा प्रश्न पालक, विद्यार्थ्यांसह शिक्षण विभागालाही पडला होता. पण शिक्षण विभागाने यावर टप्याटप्याने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार केला असून मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे.
जुलैपासून ऑनलाईन शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभाग विचार करत असले तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून सूट देण्यात आली आहे. आणि नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग फक्त जुलैमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला असून, त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.
*त्याचप्रमाणे शाळा सुरु करण्यापूर्वी एक महिना गावामध्ये किंवा परिसरामध्ये कोविड १९ चा रुग्ण आढळला नाही याची खात्री करून शाळा सुरु करण्यात येणार आहे*. .
यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला असून त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सर्वसाधारणपणे शाळा सुरु करण्यासंदर्भातील वेळापत्रक ठरविण्यात आले आहे, त्यानुसार
नववी, दहावी, बारावी चे वर्ग जुलै २०२० पासून
सहावी ते आठवी चे वर्ग ऑगस्ट २०२० पासून ,
इयत्ता पहिली ते पाचवी चे वर्ग सप्टेंबर २०२० पासून आणि
अकरावी चे वर्ग दहावीच्या निकालावर आधारित सर्व पूर्ततेनंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment