Thursday, June 11, 2020

छ.शिवाजी स्टेडियम परिसरात आयुर्वेदिक काढ्याचे मोफत वाटप


कराड,दि.11(प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, सुखायु फाऊंडेशन आणि ध्यास मंच कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढविणार्‍या आयुर्वेदिक़ काढ्यांचे मोफत वाटप येथील छ.शिवाजी स्टेडियम परिसरात व्यायामासाठी येणार्‍या नागरीकांना करण्यात आले. नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हा या जनजागृती अभियानामागचा प्रमुख उद्देश आहे.

आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या या आयुर्वेदीक काढ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती व सुखायु फाऊंडेशनच्या माध्यमातून कराड शहरात ठिकठिकाणी कोरोनाच्या लढाईत सक्रिय असणार्‍यांना मोफत वाटप केले जात आहे. हे अभियान गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. येथील छ.शिवाजी स्टेडियम परिसरात सकाळी व्यायामासाठी येणार्‍या नागरिकांना गेल्या एक आठवड्यापासून मोफत आयुर्वेदीक काढ्याचे वाटप केले जात आहे. या काढा वितरणाचा शुभारंभ मुळचे कराडचे व सध्या गडचिरोली येथे कार्यरत असलेले जिल्हा पोलिस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत छ.शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यावेळी सुखायु फाऊंडेशनचे अध्यक्ष वैद्य नचिकेत वाचासुंदर,  रा.स्व.संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख राजेंद्र आलोणे, जिल्हा कार्यवाह श्रीकांत एकांडे, सहकार्यवाह गणेश गिजरे, दादासो मानकर, सचिन जोशी व संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी आरोग्यप्रेमी नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग ठेऊन या काढ्याचा लाभ घेतला. या उपक्रमाचे नियोजन ध्यास मंच कराडचे दीपक खटावकर व त्यांच्या सहकार्‍यांनी केले.

No comments:

Post a Comment