कराड
वाढीव वीज बीलांसदर्भात काल सोमवार दि 29 रोजी येथील महावितरण चे अतिरीक्त कार्यकारी अभियंता आजीतकूमार नवाळे, संदीप पांढरपट्टे, शिवजीत पाटील यांनी येथील पालिकेतील लोकशाही आघाडीचे गटनेते श्री सौरभ पाटील यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक मोहसीन आंबेकरी उपस्थित होते.
Mseb च्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी नगरसेवक पाटील यांच्यासमोर आपली भूमिका मांडून त्याबाबतचे निवेदनही दिले.
यावेळी नगरसेवक सौरभ पाटील या अधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले , जनतेमध्ये सध्या वीजबिलांबाबत खूप गैरसमज आहेत. लॉकडाऊन मूळे जनतेची आर्थिक घडी विस्कटल्याने जनतेत आक्रोश आहे. अशा परिस्थितीत लोकशाही आघाडी कराडकरांसोबत ठामपणे उभी आहे.अन्यायी पद्धतीने आलेल्या बिलांबाबत जनतेला त्रास न होता महावीतरणाने व्यवहार्य मार्ग काढावा अशी मागणीही सौरभ पाटील यांनी यावेळी केली. वीज बिलांचे हप्ते ठरऊन देता येतील का याबाबतही यावेळी चर्चा झाली. वीज बीलांबाबत चौकशी करण्यासाठी संबंधीत कार्यालयात प्रचंड गर्दी होते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे आवश्यक आहे. तेंव्हा कराड शहरातील प्रत्येक पेठेला एक एक दिवस द्या जेणेकरून एकाच वेळी गर्दी होणार नाही अशी सूचना सौरभ पाटील यांनी यावेळी बोलताना केली.

No comments:
Post a Comment