Monday, June 29, 2020

कोरोनाच्या लॉक डाऊन काळातील विजबिले माफ करा ; कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडींच्या नेतृत्वाखाली भाजपाची मागणी

कराड
कोरोनाच्या लॉक डाऊन काळातील विजबिले माफ करा अशी मागणी करणारे निवेदन आज शहर भाजपा च्या वतीने अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनास देण्यात आले.
कोरोनामुळे तीन महिन्यांपासून सर्वत्र महासंकट चालू असून या कालावधीत वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव वीज बील मिळाले असल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे.  महावितरण कंपनीकडून मनमानी करत सरासरी बीलामुळे ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबवावी. अंदाजे बीले टाकण्यापेक्षा रिडिंग घेतल्या शिवाय नागरिकांची वीज बीले तयार करू नयेत. ज्या कंपनी व व्यावसायिक आहेत यांच्यासह सर्व नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वाढीव बीले आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. वीज बील भरणा करण्यासाठी व वीज बीलाची रक्कम कमी करून घेण्यासाठी कंपनीमार्फत अर्ज भरण्यास सांगितले जात आहे. यामुळे वीज बील भरणा केंद्रावर नागरिकांच्या रांगा वाढत असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. सदर सर्व बाबींचा विचार करून कोरोना काळातील वीज बीले माफ करावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टी कराड यांच्या वतीने आज येथे करण्यांत आली. बीला संदर्भात काही तक्रार असल्यास कराड शहर अध्यक्ष यांच्या व्हाट्स अप नंबरवर 9822449444 या वर संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान कराड शहर भाजपा अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या वतीने सदर निवेदन तहसीलदार व प्रांत अधिकारी तसेच एम. एस. इ. बी  यांना देण्यात आले .
 यावेळी कराड शहर सरचिटणीस श्री. प्रमोद शिंदे व सरचिटणीस श्री. राहुल भिसे, महिला मोर्चा कराड शहर अध्यक्षा सौ. सीमा घार्गे, अनुसूचीत जाती कराड शहर अध्यक्ष श्री. सागर लादे, श्री. शुभम पवार,श्री. इसाकचाचा मुजावर श्री. विवेक भोसले,श्री.क्षीरसागर इ. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment