कराड -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये वीज बिले ग्राहकांना देण्यात आली नव्हती.सदर बिलांचे वाटप सध्या सुरू केले असून ही वीज बिले वाढीव दराने आकरण्यात आली आहेत.यामुळे नागरिकांच्यात प्रचंड नाराजी असून,लॉकडाऊन मध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाले असल्यामुळे सदरची बिले भरायची कशी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या अन्यायकारक वीज बिल संदर्भात कराडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.रोहिणी उमेश शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याबरोबर सविस्तर चर्चा केली.
ही वीज बिले अन्यायकारक असून आधीच अडचणीत असलेल्या जनतेने सदरची बिले भरायची कशी असा सवाल केला.व याबाबत सर्वमान्य असा तोडगा काढून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.अशी मागणी नगराध्यक्षांनी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत जेष्ठ नगरसेवक श्री.विनायकराव पावसकर (आण्णा) कुंभार समाजाचे नेते श्री.नथुराम कुंभार यांनीही भाग घेतला.यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कराड शहरचे श्री.अजितकुमार नवाळे , शिवजीत पाटील,संदीप पांढरपट्टे,तुषार खराडे सर्व सहाय्यक अभियंता, प्रमोद धुमाळ - लिपिक व इतर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment