मुंबई
लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊनमधून शिथीलता देण्यास सुरुवात करण्यात केली असून, येत्या ८ जूनपासून राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश आज राज्य सरकारने जारी केला आहे. खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचा-यांच्या हजेरीत सुरू करता येवू शकतील असे या आदेशात म्हटले आहे.
राज्य सरकारने राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमधून आता काही प्रमाणात शिथीलता देण्यास सुरूवात केली आहे.राज्य सरकारने आज एक आदेश जारी करीत येत्या ८ जूनपासून राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्याची परवानगी दिली आहे.अशी कार्यालये सूरू करताना १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकता असे या आदेशात म्हटले आहे. इतर कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करावे लागेल.आपली कार्यालये सुरू करताना कंपनीला कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घ्यावा लागणार.अशा कार्यालयातून कर्मचारी घरी परतल्यानंतर कोणालाही लागण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
येत्या रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच वाटण्यास परवानगी देण्यात आली आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरूणांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे व त्यांना मास्क, सॅनिटायझरसारख्या सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.त्याच बरोबर विद्यापीठ आणि महाविद्यालय,शैक्षणिक संस्थांचे कार्यालयाचेही कामकाज सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये केवळ शिकवण्याचे काम करणारे कर्मचारी यांना वगळून इतर कर्मचा-यांना कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ई शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे,उत्तरपत्रिका तपासणे आणि निकालाचे काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment