Monday, November 17, 2025

प्रभाग क्रमांक 7 ; वंदनाताई गायकवाड यांचा निवडणूक अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सौ वंदनाताई प्रवीण गायकवाड यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. 

अखेर ठरलं...भाजपकडून अण्णा पावसकर हेच कराडच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर...

वेध माझा ऑनलाइन।
भाजप चा उमेदवार कोण? याबाबत शहरात बरेच दिवस ससफेन्स होता मात्र आज तो ससफेन्स खुलल्याचे स्पष्ट झाले आहे...अण्णा पावसकर यांचे नाव कराडच्या नगराध्यक्ष पदासाठी फायनल झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे

कराडच्या नगराध्यक्ष पदाचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजेंद्रसिह यादव यांच्या नावाचीघोषणा शिवसेनेच्या मेळाव्यात करण्यात आली होती मात्र भाजप कडून कोण उमेदवार असेल?याबाबत मोठा सस्पेन्स ठेवण्यात आला होता आज तो संस्पेन्स ओपन झाला आहे विनायक पावसकर यांच्या नावावर भाजप कडून या पदासाठी शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक बातमी मिळाली आहे 

अण्णा पावसकर हे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून परिचित आहेत हिंदू एकता आंदोलन महाराष्ट राज्याचे ते उपाध्यक्ष आहेत हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे सलग 8 ते 9 वेळ नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी कराड शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून उठावदार काम सातत्याने केले आहे अनेक महत्वाच्या प्रश्नांवर त्यांनी  आपली ठाम आणि स्पष्ट भूमिका घेत शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे
आगळी वेगळी शिवजयंती साजरी करून संपूर्ण राज्यात कराड शहराचे नावलौकिक मोठा करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे

त्यांचे चिरंजीव भाजप चे राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे देखील ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नेते म्हणून राज्यात ओळखले जातात 
अण्णा पावसकर यांचा हिंदुत्ववादी  चेहरा भाजपने या पदासाठी जाहीर केला असल्याने भाजप च्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे
तसेच भाजप ने हिंदुत्ववादी कार्ड या निवडणुकीत त्यांच्या रूपाने बाहेर काढल्याने ही निवडणूक अधिकाधिक रंगत भरणारी ठरणार! एवढे मात्र नक्की झाले आहे.

गुंड्याभाऊ वाटेगावकर भाजप मध्ये दाखल ; प्रभाग 8 मधून उमेदवारी फिक्स...अखेर आमदार डॉ अतुल भोसलेंनी शहरातील राजकारणात भूकम्प घडवलाच!

वेध माझा ऑनलाइन
कराडच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये उमेदवार असलेले माजी नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी आजच भाजप मध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे शहरातील राजकारणात आमदार अतुल भोसलेंनी सांगितल्याप्रमाणे अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी धक्का नाही तर भूकम्प घडवल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत

दरम्यान अतुल भोसले शहरातील राजकारणात भूकम्प घडवणार असे काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः म्हटले होते त्याप्रमाणे आज घडले असेच म्हणावे लागेल
भाजप मध्ये कराडमधील अनेक दिगग्ज नगरसेवक जाणार असे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच नगरसेविका स्मिता हुलवन शिवाजी पवार त्याचबरोबर इंद्रजित गुजर संजय कांबळे अप्पा माने या नगरसेवकांना मिळवण्यात अतुल भोसले यशस्वी झाले मात्र आणखी 3 जण त्यांच्याबरोबर  जातील असे वातावरण शहरात असताना त्यांच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू होत्या त्यात गुंड्याभाऊ वाटेगावकर यांच्या नावाची चर्चा होती
तरीदेखील वाटेगावकर हे शिवसेनेच्या मेळाव्याला हजर होते त्याचवेळी या चर्चाना पूर्णविराम मिळाला असे सांगितले गेले
मात्र काल रात्री पासून पुन्हा भाजप च्या गोटात वाटेगावकर भाजप मध्ये येणार असे बोलले जाऊ लागले तोच आज अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी वाटेगावकर  भाजप मध्ये प्रवेशकर्ते झाले यावर शिक्कामोर्तब झाले आहे म्हणजेच अतुल  भोसले म्हटल्या प्रमाणे...हाच तो भूकम्प शहरातील राजकारणात झाला... अशी गावात जोरदार चर्चा सुरू झाली आहे... वाटेगावकर यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजप ची ताकद अधिक वाढली आहे

प्रभाग क्रमांक 9 मधूनआशुतोष जाधव यांनी भरला अर्ज

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आशुतोष जाधव यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.  सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.

Sunday, November 16, 2025

कराडच्या नगराध्यक्षपदासाठी झाकीर पठाण काँग्रेसकडून उमेदवार जाहीर ;

वेध माझा ऑनलाइन
कराड नगरपरिषदेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी  झाकीर पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल केला. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे
अखेर त्यांच्या नावाला काँग्रेसने उमेदवार  म्हणून अधिकृत आज जाहीर केले 

आज पृथ्वीराजबाबा कराडमध्ये आले असताना त्यांनी काँग्रेसच्या निष्ठावन्त लोकांशी बोलून हा निर्णय घेतला असल्याचे समजले एकूणच मुस्लिम समाजाला काँग्रेसनेतिकीट देऊन मुख्यतः भाजप विरोधी ही निवडणूक लढवण्यास प्राधान्य देणार असल्याचे दाखवून दिले आहे
भाजपकडून अण्णा पावसकर हा हिंदुत्ववादी चेहरा जाहीर झाल्यामुळे काँग्रेसने मुस्लिम चेहरा पुढे करून ही निवडणूक प्रामुख्याने भाजप विरोधी लढणार असल्याचे दाखवून दिले आहे

कराडात काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी अल्ताफ शिकलगार यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा  ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी अल्ताफ शिकलगार यांनी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल केला आहेत्यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे
कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला आहे.

उद्या १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 14 मधून वर्षा वास्के यांचा निवडणूक अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी  सौ वर्षा वास्के यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज ओबीसी महिला प्रवर्गातून दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.  सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.

कराडच्या प्रभाग क्रमांक 4 मधून सौ शैला पाटील यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाइन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दिनांक १६ रोजी सौ शैला रणजित पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.

प्रभाग क्रमांक 12 ; जयवन्त चौगुले यांचा भाजपकडून अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाइन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी जयवन्त चौगुले  यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 5 मधून शुभम लादे यांचा भाजपकडून अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाइन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी शुभम लादे यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 
वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक १६ रोजी सौ सपना ओसवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

उमेदवार सौ सपना ओसवाल या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय सामाजिक कार्यकर्ते  नितीन ओसवाल यांच्या पत्नी आहेत

कराडच्या प्रभाग क्रमांक 7 मधून लोकशाही आघाडीच्या वतीने जयंत बेडेकर यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी जयंत बेडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज लोकशाही आघाडी कडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 6 मधून सपना ओसवाल यांचा काँग्रेसकडून अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक १६ रोजी सौ सपना ओसवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

उमेदवार सौ सपना ओसवाल या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय सामाजिक कार्यकर्ते  नितीन ओसवाल यांच्या पत्नी आहेत

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.  सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.

कराडच्या प्रभाग क्रमांक 10 मधून सौ मनीषा मुळे यांचा भाजपकडून अर्ज दाखल -

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवार दिनांक 15 रोजी सौ मनीषा किरण मुळे यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

उमेदवार मनीषा किरण मुळे या युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते किरण मुळे यांच्या पत्नी आहेत किरण मुळे हे भाजप चे तसेच आमदार अतुल भोसले यांचे अत्यन्त विश्वासू म्हणून ओळखले जातात

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.  सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 7 मधून विद्या मोरे यांचा अपक्ष अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक १६ रोजी सौ.विद्या मोरे यांनी सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.

कराडच्या प्रभाग क्रमांक १२ मधून सौ. तेजस्विनी कुंभार यांचा अर्ज दाखल

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १२ मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक १६ रोजी सौ. तेजस्विनी कुंभार यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना व यशवंत विकास आघाडीतून दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.

कराडच्या प्रभाग क्रमांक 3 मधून लोकशाही आघाडीच्या वतीने प्रवीण पवार यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी प्रवीण पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज लोकशाही आघाडी कडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.  सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडमध्ये विनायक (अण्णा) पावसकर यांचा भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी विनायक(अण्णा)पावसकर  यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे
कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला आहे.

उद्या १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग 13 मधून कीर्तिका विभूते यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 15 रोजी सौ कीर्तिका विभूते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.  सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग 12, 13 मधून विजय यादव यांचा अर्ज दाखल -

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 12 व 13  मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी विजय यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

प्रभाग क्रमांक 10 मधून श्रीमती आशाताई मुळे यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी श्रीमती आशाताई पांडुरंग मुळे यांनी ओबीसी महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

उमेदवार श्रीमती आशाताई मुळे या युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते ओंकार मुळे यांच्या मातोश्री आहेत

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.  सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडात भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी सुहास जगताप यांचा अर्ज दाखल...

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी सुहास जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे
कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला आहे.

उद्या १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपकडून प्रशांत कुलकर्णी यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी प्रशांत कुलकर्णी यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडून सुनील व्हावळ यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी सुनील व्हावळ यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडात लोकशाही आघाडीकडून राकेश शहा यांचा अर्ज दाखल:

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी राकेश शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज लोकशाही आघाडी कडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

शिवसेना नेते, राजेंद्रसिह यादव यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी राजेंद्रसिह यादव यांनी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे
कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवन्त शेलार , शहर अध्यक्ष राजेंद्र माने, प्रमोद वेरणेकर, रुपेश मुळे विजय यादव तसेच शिवसेनेचे  पदाधिकारी कार्यक्रते मोठ्या संख्येने  उपस्थित होते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या सूचनेनुसार सदर अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले 

उद्या १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

Saturday, November 15, 2025

कराडात भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अतुल शिंदेंनी दाखल केला अर्ज;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी अतुल शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे
कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला आहे.

उद्या १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 1 मधून सुदर्शन पाटसकर यांचा भाजपकडून अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 1  मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी सुदर्शन पाटसकर यांनी  आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 3 मधून जनशक्ती आघाडीकडून सारिका देशमुख यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी सौ सारिका देशमुख यांनी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज जनशक्ती आघाडीकडून दाखल केला आहे
त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपकडून सौ भाग्यश्री साळुंखे यांचा अर्ज दाखल -

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी सौ भाग्यश्री साळुंखे यांनी  सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहे
त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपकडून गणेश पवार यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी गणेश पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपकडून समाधान चव्हाण यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10  मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी समाधान चव्हाण व त्यांच्या बंधूनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 11 मधून अभिषेक भोसले यांनी भाजपकडून भरला अर्ज ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी अभिषेक भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

आशुतोष डूबल यांचा प्रभाग क्रमांक 13 मधून अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी आशुतोष डूबल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 10 मधून मोहसीन कागदी यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी मोहसीन कागदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 2 मधून सुहास पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी सुहास पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 8 मधून शैलेश गोंदकर यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 8 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी शैलेश गोंदकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजप कडून घनश्याम पेंढारकर यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शनिवार दिनांक 15 रोजी घनश्याम पेंढारकर  यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजपकडून दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

Friday, November 14, 2025

अखेर ठरलं...कराड पालिका निवडणुकीसाठी पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील येणार एकत्र... भाजप - शिवसेनेला विरोध करण्यासाठी दोन्ही माजी आमदार सरसावले ; नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौरभ पाटील ? माजी आमदार सतेज पाटील यांची या आघाडीसाठी शिष्ठाई ;

वेध माझा ऑनलाईन।
काल शुक्रवारी महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी झाल्याचे समजते त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या समर्थकांना समविचारी असणाऱ्या लोकशाही आघाडी शी जुळवून घ्या अशा सूचना केल्या आहेत त्यातच लोकशाही आघाडी च्या उमेदवाराला या निवडणुकीत या होणाऱ्या आघाडीतून नगराध्यक्षपदासाठी समविचाराने उमेदवारी मिळेल असेही ठरल्याचे समजते

अनेक दिवसांपासून शहरात भाजप व शिवसेनेचे उमेदवार कोण?याबाबत चर्चा होती मात्र दोन्ही काँग्रेस चे उमेदवार कोण?ही चर्चा नव्हतीच...मात्र अचानक काल शुक्रवारी महाविकास आघाडी च्या घडामोडी होऊ लागल्या असे कळले त्यात लोकशाही चे नेते मा आ बाळासाहेब पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा झाल्याचे समजले त्यासाठी माजी आमदार सतेज पाटील यांनी मध्यस्थीची शिष्ठई केल्याचेही कळते याबाबत पृथ्वीराजबाबा व बाळासाहेब पाटील यांच्यात चर्चा झाली आहे त्यामुळे आता आज- उद्या 2 दिवसात यानुसार ठरल्याप्रमाणे लोकशाहीचा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी जाहीर होऊन महाविकास आघाडी आपले उमेदवार जाहीर करणार आहे पृथ्वीराजबाबा व बाळासाहेब पाटील गट कामाला लागलाही आहे असेही समजते 
दरम्यान या आघाडीकडून माजी नगरसेवक सौरभ पाटील यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे येणार ? असेही समजते

कराडच्या प्रभाग 4 मधून सौ स्वाती रमेश मोहिते यांनी दाखल केला अर्ज ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार दिनांक 14 रोजी सौ स्वाती रमेश मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 13 मधून सौ स्मिता हुलवान यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार दिनांक 14 रोजी सौ. स्मिता हुलवान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 14 मधून सौ. प्रियांका दत्तात्रय भोंगाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वेध माझा ऑनलाइन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार दिनांक 14 रोजी सौ. प्रियांका दत्तात्रय भोंगाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

महाविकास आघाडी होण्याबाबत आज साताऱ्यात होणारी बैठक पुढे ढकलली ? ; शशिकांत शिंदे रणजित देखमुख व मा आ बाळासाहेब पाटील यांची होणार होती बैठक ! येत्या 2 दिवसात होणार बैठक !

वेध माझा ऑनलाईन
आज साताऱ्यात कराडसह संपूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्याबाबत चर्चा करण्यासाठी माजी आ बाळासाहेब पाटील  काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजित पाटील राष्ट्रवादी चे राज्य अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची एकत्रित बैठक होणार होती मात्र अचानक रणजित देखमुख व शशिकांत शिंदे मुंबईला गेल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे असे खात्रीलायक समजते येत्या 2 दिवसात ही बैठक होईल? असेही समजते
 
संपूर्ण जिल्ह्यात सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण आहे त्यातच भाजप ने बहुतांशी शहरात स्वबळाचा नारा देत निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे मित्रपक्षाशी दोन हात करत राष्ट्रवादी व काँग्रेसशी देखील त्यांना जिल्ह्यात तोंड द्यायचं आहे वातावरण जरी भाजपमय वाटत असले तरी महाविकास आघाडी बनवून पुन्हा दोन्ही काँग्रेस भाजपशी लढण्यासाठी या निवडणुकीत सज्ज आहेत
काँग्रेस व राष्ट्रवादी महाविकास आघाडी च्या निमित्तानं एकत्र मोर्चेबांधणी करताना दिसत आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी व ते अस्तित्व वाढवण्यासाठी ही दोन्ही पक्ष बाह्या सरकवून तयारीत आहेत त्याच तयारीचा एक भाग म्हणून  आज साताऱ्यात कराडसह संपूर्ण जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्याबाबत चर्चा करण्यासाठी माजी आ बाळासाहेब पाटील  काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजित पाटील राष्ट्रवादी चे राज्य अध्यक्ष शशिकांत शिंदे यांची एकत्रित बैठक होणार होती मात्र अचानक रणजित देखमुख व शशिकांत शिंदे मुंबईला गेल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे असे खात्रीलायक समजते 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बाहेर गावी असल्याने ते रोज आपल्या निष्ठांवत कार्यकर्त्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे येथील राजकीय माहिती घेत आहेत व आपले निर्णय त्याद्वारे कार्यकर्त्यांना कळवत आहेत त्यांनी महाविकास आघाडी करण्यासाठी तसेच पक्षचिन्हवर निवडणूक लढवण्याबाबतचे आदेश आपल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते 

Thursday, November 13, 2025

कराडच्या प्रभाग 7 मधून अजय कुलकर्णी - उंडाळकर यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाइन ।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शुक्रवार दिनांक 14 रोजी अजय कुलकर्णी (उंडाळकर) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासहित आज किती उमेदवारी अर्ज झाले दाखल ? ; कोणी,कोणी भरले अर्ज ?

वेध माझा ऑनलाइन।
मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी आज गुरुवारी नगराध्यक्षपदासाठी १ आणि विविध प्रभागांतून नगरसेवक पदासाठी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे...

प्रभाग 11 मधून मनोहर भास्करराव शिंदे, राजश्री नितीन जगताप
प्रभाग १० मधून वसीम शब्बीर मुल्ला 
प्रभाग ८ मधून गीता नंदकुमार साठे 
प्रभाग ७ मधून संभाजी मारुती रैनाक
प्रभाग ५  मधून तानाजी संभाजीराव देशमुख, राजेंद्र प्रल्हाद यादव
प्रभाग ४ मधून कल्पना नारायण रैनाक, सचिन संपत खैरे 
प्रभाग ३  मधून रंजना अशोक पाचुंदकर
प्रभाग 2  मधून गीतांजली शहाजी पाटील, विक्रम अशोक चव्हाण
प्रभाग १ मधून शहाजी आनंदराव पाटील 
प्रभाग ५ मधून मधुकर महादेव शेलार यांनी
तर अपक्ष उमेदवार म्हणून —
प्रभाग १ मधून नितीन उर्फ नारायण विष्णुपंत काशीद पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कराडच्या प्रभाग क्रमांक 14 मधून शिवाजी पवार(तात्या) यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून यावेळच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज गुरूवार दिनांक 13 रोजी भारतीय जनता पार्टी कडून श्री शिवाजी पवार (तात्या) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.यावेळी त्यांच्या पत्नी पल्लवी पवार बंधू संजय पवार उपस्थित होते
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 3 मधून साहेबराव शेवाळे यांचा अर्ज दाखल -

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून  होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज गुरूवार दिनांक 13 रोजी  साहेबराव शेवाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग 8 मधून संजय चन्ने यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 8 मधून यावेळच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज गुरूवार दिनांक 13 रोजी संजय चन्ने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

कराडच्या प्रभाग क्रमांक 7 मधून सौ अंजली कुंभार यांचा भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल /

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून यावेळच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज गुरूवार दिनांक 13 रोजी भारतीय जनता पार्टी कडून सौ अंजली नथु कुंभार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

Wednesday, November 12, 2025

भाजपच्या वतीने आज अजय पावसकर यांचा अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून यावेळच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज बुधवार दिनांक १२ रोजी भारतीय जनता पार्टी कडून अजय पावसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; राज्यात अनेक ठिकाणी भाजप स्वबळावर लढणार ;

वेध माझा ऑनलाईन
निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यात दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजपकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात काही ठिकाणी भाजप ही निवडणूक महायुतीमध्ये लढणार आहे, तर काही ठिकाणी निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे. 

भाजपच्या स्टार प्रचारकांची यादि पुढीलप्रमाणे...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे,  पीयूष गोयल, नारायण राणे, सुधीर  मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुलरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती पहाता सर्व पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे, कारण यानंतर आता लगेच महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं होतं, त्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे मतदार कोणाच्या बाजुने कौल देणार हे देखील पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पक्षांतराला देखील वेग आला आहे, महायुतीमधीलच घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटातील अनेक नेते भाजपात प्रवेश करताना दिसत आहेत, यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश मस्के यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती, मात्र या नाराजीनंतर देखील भाजपात होणारे पक्ष प्रवेश सुरूच आहेत.

आज राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सपंली / काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे बहुतांशी आमदार सोबत घेत शरद पवारांची साथ सोडली होती. अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले, पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दोन्ही पक्षांनी दावा केला होता. काही काळानंतर कोर्टाने नाव आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या गटाला दिले होते. मात्र आमदार अपात्रतेचे प्रकरण अजूनही कोर्टात आहे. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली.  
आज दुपारी सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीच्या सुरुवातील शरद पवारांचे वकील कपिल सिब्बल यांनी मला सुनावणीसाठी 2 तास लागतील अशी माहिती दिली. यावर कोर्टाने तुम्ही सुरुवातीला कोणत्या प्रकरणाचा युक्तिवाद करणार आहेत अशी विचारणा केली. त्यानंतर वकिलांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठड्यात सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यानंतर आता 21 जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Tuesday, November 11, 2025

भाजप व शिवसेना एकमेकासमोर येऊन लढणार ; 31 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष असे 32 जण निवडून आणण्याचा कराडच्या भाजपच्या मेळाव्यात संकल्प ; कराड नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले...

वेध माझा ऑनलाईन
आमच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या आणि मित्र पक्षांच्या मागण्या यांचा मेळ कसा घालायचा हा आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे... तो नाही सुटला तर आम्ही भाजप म्हणूनच लढणार असल्याचे सांगत भाजप स्वबळावर लढणार... असे आमदार डॉ अतुल भोसले यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत... दरम्यान 31 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असे  32 जण भाजप चे निवडून आणायचे असा निर्धार व संकल्प आजच्या भाजप च्या मेळाव्यात करण्यात आला... म्हणजेच शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत  एकमेकांसमोर येऊन लढणार हे आता स्पष्ट झाले आहे

कराडमधील विठ्ठल चौकातील बाबूभाई पदमसी हॉल याठिकाणी आज भाजप चा मेळावा पार पडला या मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते

यावेळी आमदार डॉ अतुल भोसले म्हणाले... भाजप च्या माध्यमातून कराड शहरासाठी व परिसरासाठी भरगोस निधी आला आहे त्यातून शहरातील पाणी रस्ते वीज तसेच भविष्यातील शहरातील अनेक अडचणी दूर होऊन शहर विकसनशील होण्यासाठी मदत होणार आहे...कराड शहर झोपडपत्तीमुक्त करण्याचे माझे स्वप्न आहे...कराडचे स्टेडियम लवकरात लवकर सुरू करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले 
कराडच्या निवडणुकीतून भाजपचा नगराध्यक्ष निवडून द्यायचा व सर्व नगरसेवक निवडून आणण्याबाबत या मेळाव्यात संकल्प करण्यात आला

दरम्यान नगराध्यक्षपदासाठी अण्णा पावसकर, जयवन्त पाटील अरुण जाधव  अतुल शिंदे व बंडा काका डूबल हे इच्छुक आहेत असे त्यांनी सांगितले

यावेळी शहर अध्यक्ष सौ सुषमा लोखंडे
विक्रम पावसकर, अरुण जाधव शिवाजी पवार तात्या स्मिता हुलवान माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, रोहिणी शिंदे इंद्रजित गुजर सुहास जगताप आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक अतुल शिंदे यांनी केले
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली
मेळाव्यास शहरातील युवा तसेच महिलावर्गासह व्यापारीवर्ग भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक नगरसेवक तसेच पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवावर्ग खूपच मोठ्या संख्येने उपस्थित होता

Monday, November 10, 2025

आजच्या कराडातील भाजपच्या मेळाव्यात आमदार अतुल भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे राजकीय भूकम्प होणार का ?

वेध माझा ऑनलाईन।
आज सायंकाळी 5 वाजता भाजप ने आपल्या पक्षाचा मेळावा आयोजित केला असल्याचे काल पक्ष कार्यालयातून सांगण्यात आले आहे या मेळाव्यात भाजप आपली निवडणुकीतील भूमिका आज स्पष्ट करेल आणि भाजप आपला नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार देखील आज जाहीर करेल आणि हे होत असताना आज शहरातील उरलेल्या महत्वाच्या नेत्यांचे पक्ष प्रवेश होतील का? आणि डॉ अतुल भोसले यांनी संगीतल्याप्रमाणे गावच्या राजकारणात आज भूकम्प होईल का ? अशी गावात चर्चा सुरू आहे

आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाचे गावात न भूतो न भविष्यती असे राजकीय वातावरण झाले आहे... जो तो भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहे... यापूर्वी बरेच दिगग्ज पुढार्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अतुल भोसले यांचे हात बळकट केले आहेत...
 त्याच पार्शवभूमीवर आमदार अतुल भोसले काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की... आजपर्यंत शहराच्या राजकारणात धक्के दिले आता कराडच्या राजकारणात भूकम्प करणार...त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? याबद्दल शहरात जोरात चर्चा असतानाच आज भाजप ने आयोजित केलेल्या मेळाव्यात त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ कळेल का ? म्हणजेच  आमदार अतुल भोसले यांनी गेले महिनाभर ज्याप्रमाणे गावात आपल्या नेतृत्वाखाली अनेक पक्ष प्रवेश करून घेतले त्याचप्रमाणे काही पक्षप्रवेश मागे ठेवले आहेत अशी चर्चा आहे...ते पक्षप्रवेश करूनच ते आज शहरात भूकम्प करणार आहेत... असे बोलले जात आहे... तो भूकम्प आज त्यांच्या मेळाव्यात होणार का?... अशी चर्चा आहे.. आणि यानिमित्ताने या मेळाव्यात कोण, कोण प्रवेश करणार ? याबाबतही शहरात चर्चा आहे