आज सायंकाळी 5 वाजता भाजप ने आपल्या पक्षाचा मेळावा आयोजित केला असल्याचे काल पक्ष कार्यालयातून सांगण्यात आले आहे या मेळाव्यात भाजप आपली निवडणुकीतील भूमिका आज स्पष्ट करेल आणि भाजप आपला नगराध्यक्ष पदासाठीचा उमेदवार देखील आज जाहीर करेल आणि हे होत असताना आज शहरातील उरलेल्या महत्वाच्या नेत्यांचे पक्ष प्रवेश होतील का? आणि डॉ अतुल भोसले यांनी संगीतल्याप्रमाणे गावच्या राजकारणात आज भूकम्प होईल का ? अशी गावात चर्चा सुरू आहे
आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाचे गावात न भूतो न भविष्यती असे राजकीय वातावरण झाले आहे... जो तो भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहे... यापूर्वी बरेच दिगग्ज पुढार्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अतुल भोसले यांचे हात बळकट केले आहेत...
त्याच पार्शवभूमीवर आमदार अतुल भोसले काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की... आजपर्यंत शहराच्या राजकारणात धक्के दिले आता कराडच्या राजकारणात भूकम्प करणार...त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ काय? याबद्दल शहरात जोरात चर्चा असतानाच आज भाजप ने आयोजित केलेल्या मेळाव्यात त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ कळेल का ? म्हणजेच आमदार अतुल भोसले यांनी गेले महिनाभर ज्याप्रमाणे गावात आपल्या नेतृत्वाखाली अनेक पक्ष प्रवेश करून घेतले त्याचप्रमाणे काही पक्षप्रवेश मागे ठेवले आहेत अशी चर्चा आहे...ते पक्षप्रवेश करूनच ते आज शहरात भूकम्प करणार आहेत... असे बोलले जात आहे... तो भूकम्प आज त्यांच्या मेळाव्यात होणार का?... अशी चर्चा आहे.. आणि यानिमित्ताने या मेळाव्यात कोण, कोण प्रवेश करणार ? याबाबतही शहरात चर्चा आहे
No comments:
Post a Comment