कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून यावेळच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज गुरूवार दिनांक 13 रोजी भारतीय जनता पार्टी कडून श्री शिवाजी पवार (तात्या) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.यावेळी त्यांच्या पत्नी पल्लवी पवार बंधू संजय पवार उपस्थित होते
१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.
No comments:
Post a Comment