मलकपूरचे एकेकाळचे काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे हे सध्या भाजप शी जवळीक करत असून ते लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे ते पृथ्वीराज चव्हाण याना सोडून देत आता आमदार डॉ अतुल भोसले यांच्याशी जवळीक करताना दिसत आहेत त्यांच्या याच पक्षप्रवेशाच्या पर्शवभूमीवर माहिती देण्यासाठी त्यांनी आज संगम हॉटेल येथे पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचे सरळ उत्तर दिले नाही केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली आणि ही पत्रकार परिषद गुंडाळतच संपवली मात्र पत्रकारांनी त्यांची भम्पक उत्तरे ऐकून त्यांना शेवटी चांगलेच सुनावले व्यवस्थित उत्तरे द्यायची असतील तरच पत्रकारांना बोलवा असा सल्लाही त्यांना पत्रकारांनी दिला त्यावेळी याठिकाणी थोडा वादही झाला मात्र त्यांचा राजकीय फायदा होऊ शकतो अशा प्रश्नाची उत्तरे मात्र त्यांनी यावेळी दिली
मनोहर शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकीय वापर करत मलकापुरात आपले राजकीय बस्तान बसवले गेली 20 वर्षे त्यांनी पृथ्वीराजबाबा यांच्या नावावर राज्यभर स्वतःची ओळख करून घेतली... व मलकापूर मध्ये मोठा निधी उपलब्ध करून घेतला त्यामुळे पर्यायाने सातत्याने मलकापूर चा विकास होत गेला... ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा आता नगरपरिषदेमध्ये मलकापुचे विलीनीकरण झाले आहे हे होण्यासाठी पृथ्वीराजबाबा यांचा मोलाचा वाटा आहे हे कोणीही नाकारणार नाही... मलकापूरचा विकास आणि त्यामागचे कारण नगरपरिषदेच्या माध्यमातून पहायचे झाल्यास त्याचे उत्तर फक्त आणि फक्त पृथ्वीराजबाबा हेच असेल...आज आहे...मात्र हे सगळं आपल्यामुळे झालं आहे असा अविर्भाव दाखवत मनोहर शिंदे यांनी मलकापूरचे सर्वेसरवा आपणच असल्याचे भासवले... मात्र नगरपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस व पृथ्वीराजबाबा याचा वापर करून घेत आपले राजकारण केले अशी चर्चा असते...
सध्या त्यांनी काँग्रेस व पृथ्वीराजबाबा याना सोडचिठी देत ते भाजप च्या संपर्कात आहेत लवकरच ते भाजप मध्ये प्रवेश करतील असेही ठरले आहे... मलकापूर चे नेते आर आबा व प्रशांत चांदे यांनी यापूर्वी मलकापूर मध्ये प्रवेश केला आहे मनोहर शिंदे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांनी प्रवेश केल्याची आजही चर्चा असते... त्यांच्या सह अनेक कार्यकर्ते भाजप मध्ये गेले आहेत त्यामुळे मनोहर शिंदे यांना भाजप प्रवेश करण्याशिवाय आता पर्यायच नाही अशी परिस्थिती आसल्याने ते प्रवेश करत आहेत आशिही मलकापुरात चर्चा आहे...
दरम्यान त्यांच्या याच प्रवेशाच्या पर्शवभूमीवर माहिती देण्यासाठी त्यांनी संगम हॉटेल याठिकाणी पत्रकार परिषद बोलावली होती...
त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारले की...
तुम्हाला पृथ्वीराजबाबा यांनी एवढं भरभरून दिल यरी तुम्ही त्यांना सोडून का चालला आहात?...
यापूर्वी काही दिवसापर्यंत तुम्ही कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट च्या कारभारावर सार्वजनीक टीका करत आले आहात, मग अचानक असे काय झालं की ज्यामुळे तुम्ही कृष्णा च्या डॉ अतुलबाबा यांचे नेतृत्व मान्य करत ज्यांनी आतापर्यंत मदत केली त्या पृथ्वीराजबाबाना सोडून जात आहात?
आर आबा आणि प्रशांत चांदे यांच्यासह अनेकजण तुम्हाला सोडून गेले त्यामुळे नाईलाज म्हणून एकटे पडल्यामुळे आता तुम्ही भाजपमध्ये जात आहात का?
ज्या भाजप-सेनेला तुम्ही घटना बाह्य सरकार असे संबोधत होता त्याच सरकारच्या घटक पक्षात तुम्ही आता चालला आहात ?...असे का?
तुम्ही पृथ्वीराजबाबा आणि डॉ अतुलबाबा यांच्यापैकी कोणाला विकासाचा चेहरा मानता?
तुम्ही भाजप मध्ये गेला आणि सत्ता विरोधकांची आली तर मलकापुरच्या विकासासाठी तुम्ही विरोधकांना सहकार्य करणार का?
भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही काही अटी घातल्या आहात की विनाअट भाजप मध्ये चालले आहात?
असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले मात्र केवळ थातुरमातुर आणि फालतू उत्तरे देत त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळण्याचा प्रयत्न केला तोही हाणून पाडत पत्रकारांनी त्यांची भम्पक उत्तरे ऐकून शेवटी त्यांना चांगलेच सुनावले व्यवस्थित उत्तरे द्यायची असतील तरच पत्रकारांना बोलवा अशी भम्पक उत्तरे दिली तर आम्ही बातमी काय करायची? असा सवालही पत्रकारांनी त्यांना केला...
राजकीय फायदा होऊ शकतो अशा प्रश्नाची उत्तरे मात्र त्यांनी यावेळी दिली...
एकूणच ही पत्रकार परिषद... पत्रकार आणि मनोहर शिंदे यांच्यात अधूनमधून झालेल्या वादाने वादळी ठरली
No comments:
Post a Comment