वेध माझा ऑनलाईन
मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न गाजतोय. या आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज (11 ऑक्टोबर) जैन धर्मियांकडून मुंबईमध्ये धर्मसभा भरविण्यात आली होती. या धर्मसभेनंतर उपस्थित असणाऱ्या सर्व जैनमुनींनी एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली.
सरकारला माझा नाही, सनातन धर्माचा इशारा आहे. महाराष्ट्राचा मराठी माणूस कबुतरांना विरोध करत नाहीय. त्यांना राजकारणासाठी कबूतर आणायचे आहे. आम्ही आमचा धर्म विसरणार नाही, असं जैनमुनी निलेशचंद्र विजय म्हणाले. तसेच जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, असंही निलेश मुनी यांनी सांगितले. आता आमची देखील संघटना असणार आहे. आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू...कबुतरांची पार्टी पाहिजे, शिवसेनेतही वाघ होता, असं म्हणत निलेश मुनींकडून जन कल्याण पार्टीची घोषणा करण्यात आली. आमच्या पार्टीचं चिन्ह कबूतर असेल, अशी घोषणा निलेशचंद्र विजय यांनी केली. ही फक्त जैनांची पार्टी नाही, ही गुजराती मारवाडीची पार्टी, असं निलेश मुनी यांनी सांगितले. तसेच आमच्या जन कल्याण पार्टीत चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री असल्याचंही निलेशचंद्र विजय म्हणाले.
No comments:
Post a Comment