कराडच्या पालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून निवड होणार आहे त्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत ओपन आरक्षण पडल्यामुळे थेट नगराध्यक्ष पदासाठी चुरस असणार आहे या निवडणुकीत ज्याचा दम आहे तो लढले आणि ज्याचा तो घासच नाही तो कोंप्रमाईज करणार असे दिसत आहे
शिवसेना भाजप कडून अनेक उमेदवारांच्या नावाच्या चर्चा गावात सुरू आहेत मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी कडून या प्रमुख पदासाठी उमेदवार म्हणून फारसे कोणी चर्चेत का नाही?अशीच सध्या चर्चा होताना दिसत आहे
माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील यांचे राजकीय सख्य झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून सर्वानाच माहीत आहे या दोघांच्या जिरवाजीर्वी च्या राजकारणाने कराड उत्तर व दक्षिण मध्ये भाजप निवडून आलं याची जाणीव आता या दोघांच्याही कार्यकर्त्यांना होताना दिसत आहे त्यातच आता होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही चूक सुधारण्याची संधी देखील आली आहे त्यासाठी काय केलं पाहिजे हे पाहणे गरजेचे आहे
पालिका निवडणुकीत भाजप जोरदार तयारीच्या बेतात आहे तर शिवसेना आपला उमेदवार जाहीर करत भाजप च्या बरोबरीत रहायला बघत आहे या दोघांचीही ताकद सत्ताधारी म्हणून सेना-व भाजप ने आपापला विकास निधी आणत दाखवली आहे राहिला प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा या दोघांची स्वतन्त्र ताकद गावात भाजप सेने च्या तुलनेत बरीच म्हणायची अशी आहे मात्र हे दोघे एकत्र आले तर मात्र या दोन्ही ताकदी अनेक प्रकाराने सरस ठरू शकतात असे चित्र बनू शकते
तुलनेत पहायला गेलं तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे मुस्लिम व मागासवर्गीय मतदार अधिक प्रमाणात दिसतोतर हिंदू मताचा टक्का भाजप सेनेकडे तुलनेत अधिक दिसतो काँग्रेस राष्ट्रवादी कडे हिंदू मतांची बेरीज देखील असल्यामुळे या मतांमध्ये एकूणच डिव्हायडेशन होणार हे स्पष्ट दिसते पण मुस्लिम व मागासवर्गीय मतांमध्ये या तुलनेत विभागणी परिणामकारक होईल असे नाही आणि या दोन्ही मतांची गठा बेरीज केल्यास काँग्रेस राष्ट्रवादी कडे मतांचा मोठा कौल दिसतो मात्र या दोन पार्ट्यांमध्ये फूट पडली तर मात्र भाजप सेना सत्तेत आरामात येताना दिसते आहे हे सिम्पल गणित आहे म्हणजेच दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास कराडात बदलाचा चमत्कार दिसेल असे जाणकार ठामपणे सांगताना दिसत आहेत
मागील निवडणुकीत मुस्लिम मतांमध्ये विभागणी झाली व भाजप ची शीट निवडून आली याचा अर्थ भाजप ची मते शहरात खूप आहेत असा त्याचा अर्थ होत नाही लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना कराड शहरात अधिक मते पडली आहेत म्हणजेच जरी पराभव झाला तरी शिंदे यांनी शहरात भाजप विरोधात असणारी पारंपरिक मुस्लिम व मागासवर्गीय मते गठय्याने मिळवली याच मतात विभागणी झालेली दिसली नाही म्हणजेच ही मते विभागली गेली नाही तर चमत्कार घडवू शकतात हे यातून स्पष्ट झाले नगरपालिका निवडणुकीत याच चमत्काराचा पहायचे असेल तर दोन्ही आमदारांनी आपले राजकीय जे काही असतील ते हेवेदावे बाजूला ठेवत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी आवश्यक ती तडजोड करणे गरजेचे आहे ही तडजोड यशस्वी झाल्यास कराडात बदलाचा चमत्कार होणार हे नक्की!
No comments:
Post a Comment