वेध माझा ऑनलाइन -
गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली. या खटल्यावर 8 ऑक्टोबरला निकाल अपेक्षित असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणामुळे न्यायालयाने इतर प्रकरणांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता 12 नोव्हेंबरला शिवसेना पक्ष-चिन्हांसोबत आमदार अपात्रतेबाबत देखील सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
8 ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्ष व चिन्हाच्या मुद्द्यावर निर्णय येईल, अशी चर्चा होती. मात्र, सशस्त्र सुरक्षा दलांशी संबंधित एक महत्त्वाचे प्रकरण ऐनवेळी सुनावणीला आल्याने इतर खटल्यांची सुनावणी तातडीने आटोपण्यात आली. परिणामी, शिवसेना प्रकरण पुन्हा पुढे ढकलण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला आधीच सूचित केले होते की, त्यांच्या प्रकरणाची सुनावणी संक्षिप्त असेल. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जर आज सुनावणी शक्य नसेल, तर लवकरात लवकर पुढील तारीख द्यावी, अशी विनंती केली. त्यावर न्यायालयाने 12 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
No comments:
Post a Comment