वेध माझा ऑनलाईन-मनोज जरांगे पाटलांनी सरकार शेतकऱ्यांना फक्त तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, सरकारच्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांचे काहीही भले होणार नाही. सरकारचे धोरणच असे आहे की, लोकांना केवळ आशेला लावून फसवणूक करायची. सणासुदीच्या काळातही सरकार शेतकऱ्यांशी आणि जनतेशी जाणूनबुजून खेळत असल्याचे जरांगे पाटलांनी म्हटले आहे.पुढे जरांगे पाटील असेही म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजनं काहीही साध्य होत नाही, तो फक्त क्षणिक दिलासा असतो, ज्याचा अर्थ शेवटी फसवणूकच होतो. सध्या दिवाळी, भाऊबीज आणि पाडवा हे सणांचे दिवस सुरू असल्याने, या काळात तात्पुरती गर्दी टाळण्यासाठी जरांगे पाटलांनी आपल्या पुढील योजना पुढे ढकलल्या आहेत. पाडव्यानंतर राज्यातील शेतकरी अभ्यासक, तज्ज्ञ आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून भविष्यातील आंदोलनाची तारीख जाहीर केली जाईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment