भाजपचे कराड शहर सचिव व भाजप च्या ओबीसी विभागाचे माजी शहर अध्यक्ष सुनील नाकोड यांनी कराडच्या प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे
स्वतः ओबीसी असूनही ओपन प्रवर्गामधून त्याठिकाणी आपण तिकीट मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले
सुनील नाकोड हे गेली 15 वर्षे भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत हिंदू एकता आंदोलनाचे ते सक्रिय कार्यक्रर्ते देखील आहेत भाजप नेते विक्रम पावसकर व आमदार डॉ अतुल भोसले यांचे नेतृत्व ते मानतात सुनील नाकोड हे ओबीसी समाजाचे युवा नेते म्हणूनही परिचित आहेत भाजपचे निष्ठावन्त म्हणून ते ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते मदतीसाठी नेहमी पुढे असतात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले यांचा जोमाने प्रचार केल्याचे दिसले
त्यांचे समाजकार्य देखील अनेकवर्षं सातत्याने प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुरू आहे कोविड मध्ये त्यांनी स्वतः त्या परिसरात प्रतिबंधक औषध फवारणी केली होती शहरात पाणी टंचाई झाली असता स्वतःच्या खर्चाने टँकर ने त्या भागात पाणीपुरवठा केला होता लसीकरण मोहीम असेल तसेच मतदार नोंदणी मोहीम असेल तसेच परिसरातील महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी त्याठिकाणी राबवले आहेत तसेच विविध शासकीय योजनांचा जनतेला लाभ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न दिसले आहेत
त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचा सहभाग देखील त्याठिकाणी त्यांच्या बरोबरीने अनेक सामाजिक कार्यात दिसला आहे
गेल्या 2 पिढ्यांपासून त्यांचा भेळ पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत त्यातूनच आर्थिक बचत करत सामाजिक कार्यासाठी ते आपली तरतूद करून स्वखर्चाने अनेक सामाजिक उपक्रमांना मूर्त स्वरूप देताना दिसतात त्यांना असणारी सामाजिक कार्याची आवड एवढंच त्यामागाचे कारण आहे ओबीसी समाजासाठी देखील त्यांचे काम मोठे आहे सोमवैशिय क्षत्रिय समाजाच्या युवक मंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील ते सक्रिय काम पहात आहेत
त्यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळाल्यास भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे
No comments:
Post a Comment