Saturday, October 25, 2025

कराडात आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचे रस्त्यात पडलेल्या खड्डयात बसून आंदोलन ; त्याठिकाणी रांगोळी काढून फटाकेही वाजवले ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील अनेक रस्त्यावर मोठयाप्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी खड्डयामधे बसून यमाच्या प्रतिमेचे पुजन केले. तसेच खड्डयांभोवती रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी, भिमशक्ती सामाजीक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आनंदराव लादे, जान फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद नायकवडी, दत्तात्रय दुपटे, विजय काटरे, संजय कांबळे, विकास लोंढे, दत्तात्रय पवार, मल्हारी गुजले, आसिफ मुल्ला व कार्यकर्ते उपस्थित होते.शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठयाप्रामणात खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. तर अपघातात शारीरीक दुखापतीबरोबरच वाहनांचेही नुकसान होत आहे. याबाबत अनेकदा मागणी करूनही खड्डे मुजवले जात नसल्याने शहरातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनोखे आंदोलन करून पालिकेचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान रस्ते खड्डेमय झाल्याने पालिका प्रशासनाने संमंधित ठेकेदारावर कारवाई करावी तसेच खड्डयांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment