(अजिंक्य गोवेकर)
कराड-
सध्या कोरोना व्हायरस च्या प्रसाराला रोखण्यासाठी पंतप्रधानांनी 21 दिवसाचा लॉक डाऊन घोषित केला आहे.खरतर लोकांची एकमेकांशी असणारी रोजची साखळी मोडून काढणे हे या मागचे उद्दिष्ठ आहे,की जेणे करून लोक-लोकांच्या संपर्कात राहणार नाहीत व या विषाणूचा संसर्ग रोखला जाऊ शकेल. खूप चांगला पर्याय आहे ... पण याची दुसरी बाजू दुर्दैवाने खूप वाईट दिसून येत आहे ती म्हणजे,गोर-गरीब जे भीक मागून खातात,किंवा रोजच्या रोज कमावून खातात त्यांना सध्या 2 वेळा जेवायचं काय असा प्रश्न आहे.म्हणजे...भीक मागायची कोणाला...,रस्त्यावर भीक मागायला देखील कोणी दिसत नाही,तर स्वतः चे व घरच्यांचे पोट भरायचं कस... हा प्रश्न या लोकांना आहे,तर हातावर पोट आहे त्यांची तर मारामारच आहे,सध्या कोठे काम नाही तर खायलाही नाही अशी वाईट अवस्था त्यांची आहे. मग याच विषयाला धरून सगळीकडे चर्चा अशी आहे की...निवडणूक काळात जे लोक जेवण न मागता देतात ते या गरीब लोकांचा आत्ता जगण, मरण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय करायला मोठया मनाने सध्या का पुढं येत नाहीत...??? तसेच ज्या सामाजिक संस्था ,आम्ही गरिबांसाठी झटतो अस सांगत वर्तमानपत्रातून गरिबांना मदत केल्याचे फोटो सेशन करून चमकोगिरी करताना दिसतात आत्ता या संस्था कुठं गेल्या ?अशीही सध्या चर्चा आहे...
सध्या कोरोनाच्या प्रसाराच्या भीतीने कोणीही कोणाला जवळ करत नाही अशी सामाजिक स्थिती दिसते आहे,म्हणजे समाज एकत्र करून करायचे कोणतेही कार्यक्रम किंवा घरगुती कार्यक्रम कोणीच करण्याच्या मनस्थितीत नाहीत ,गर्दी करून या रोगाला आमंत्रण द्यायचं नाही म्हणून माणूस माणसापासून लांब आपआपल्या घरात स्वतःला कोंडून घेतल्याच्या अवस्थेत दिसतो आहे.हे चित्र एकीकडे,तर दुसरीकडे ज्या लोकांना घर दार नाही,किंवा हातावर पोट आहे अशा लोकांना सध्या या बंदमुळे पोटाला खाण्यासाठी नसल्याने या लोकांच्या पोरा बाळांना अक्षरशः भुकेने मरायची वेळ सध्या आली आहे. या लोकांना एखाद्या दयावानची गरज भासू लागली आहे की जो यांच्या भुकेची कळ ओळखून त्यांना अन्नाचा घास देऊ शकेल ,पण अद्याप कोणीच असा विचार करत पुढे आलेला दिसत नाही.
याच्या उलट चित्र निवडणुकीच्या दरम्यान नेहमी दिसते.नको म्हटलं तरी जेवायचा आग्रह होतो.सरसकट सगळ्यांना त्यावेळी बुचकळून काढले जाते. दारूचा पाऊस ही त्यावेळी पाडला जातो. .शेकडो लोक पुन्हा जेवतील एवढ्या अन्नाची नासाडी होते, तरी त्याचे सुख,दुःख त्यावेळी काही नसते. मग आजची परीस्थिती ओळखून रस्त्यावर भीक मागून खाणारे म्हातारे असतील,लहान मूल असतील बेवारस असतील किंवा रोज काम करायचं आणि जगायचं अशी जगण्याची पद्धती असणारे गरीब असतील ,त्यांची भूक समजून घेण्याची गरज आता खऱ्या अर्थाने आहे.यासाठी आपली बांधीलकी माणुसकीशी आहे असे स्वतःला समजावून सांगून मगच या लोकांचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊ शकतो. त्यांना दिलेल्या जेवणाच्या बदल्यात या लोकांचा आपल्याला कसलाही परत उपयोग नाही हे देखील लक्षात घेऊन हा दिलदारपणा दाखवणार्याची आज गरज आहे . तसेच ज्या संस्था आम्ही गरिबांना मदत करायला नेहमी तत्पर असतो अस सांगत तसे काही कार्यक्रम केल्याचे फोटो पत्रकारांना देत आमचे फोटो छापा अस सांगून आपली पाठ नेहमी थोपटून घेत असतात त्या संस्था आत्ताच्या वेळेला गरिबांच्या पोटाचा विचार करताना का दिसत नाहीत?
एकूणच, चार,चार दिवस उपाशी असणाऱ्या, भुकेने व्याकुळ होऊन रडणाऱ्या गरीब लहान मुलांना तसेच म्हाताऱ्या माणसांना व एकंदरच अशा गरिब असणाऱ्या प्रत्येकालाच दोन घास देण्यासाठी माणुसकीच्या नात्याने रस्त्यावर उतरण्याची वेळ माणूस म्हणऊन घेणाऱ्या प्रत्येकावर यानिमित्ताने आता आली आहे.या लोकांना आत्ताच अन्नाचा कण जर नाही मिळाला तर ही लोक अक्षरशः भूक भूक करून मरतील ...
आणि आपण त्यानंतर आपल्यातील माणुसकीला जागे करून काय उपयोग...???
लॉक डाऊन 21 दिवसाचा आहे...म्हणजे 21 दिवस हे सगळे गरीब उपाशी राहणार आहेत.
आत्ताच त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे..
याबाबत विचार व्हायला हवा...!!

No comments:
Post a Comment