कराड-
संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा भारतातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य आणि केंद्र शासनाद्वारे अनेक तातडीने उपाय,प्रतिबंध घातले जात आहेत त्यातील व्यापक प्रयत्नांचा भाग म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी रविवार दि २२मार्च २०२० रोजी 'जनता कर्फ्यू ' चे आवाहन केले आहे.
आपले कुटुंब, समाज व पर्यायाने देशातील प्रत्येक नागरिकाचा सुरक्षेचा दृष्टीने आपण सर्वानी स्वयंप्रेरणेने रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ वाजे पर्यंत घराबाहेर न पडून हा 'जनता कर्फ्यू यशस्वी करूयात, मी व माझे कुटुंब या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होत आहे.आपण सर्वांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन कराड नगरीच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी कराड वासीयांना केले आहे.
No comments:
Post a Comment