(अजिंक्य गोवेकर)
कराड-
एकीकडे राजकारणी म्हटलं की फसवणारे,किंवा खोट बोलणारे,कार्यकर्त्यांना वापरून घेणारे,
भ्रष्टाचारी,अशी इमेज लोकांच्या मनात पुढारी म्हटलं की सर्वसाधारणपणे असते.पण सगळेच एका माळेचे मणी नसतात तर राजकारण्यांमध्ये सुद्धा संवेदनशील माणूस एखाद्याला न्याय देण्यासाठी धडपडत असतो हेही काहीवेळा दिसून येत असते...असाच काहीसा प्रत्यय काल येथील सर्किट हौस येथे आला.राज्याचे गृह,वित्त राज्य मंत्री ना. शंभुराज देसाई पत्रकार परिषद घेण्याकरिता सर्किट हौस येथे काल संध्याकाळी अचानक आले. पत्रकार परिषद ठरल्याप्रमाणे पार पडली, आणि ते त्यांच्या पुढच्या नियोजित ठिकाणी जायला निघणार तोच, उत्तर कोपर्डे येथील एक युवती अचानकपणे त्या ठिकाणी येऊन... सर ,माझं एक तुमच्याकडे काम आहे ...अस मंत्री महोदयांना म्हणाली...बोला काय काम आहे, अस मंत्र्यांनी विचारले...त्यावर ती युवती म्हणाली... माझ्या भावाला पैसे देऊन एका सावकारी करणाऱ्याने त्याला फसवंले आहे .पैसे देऊन काही वर्षाच्या करारावर आमची जमीन संबंधित सावकाराने आपल्या ताब्यात घेतली आहे...एवढं ऐकूनच नामदार साहेबांना विषयाची खोली आणि गांभीर्य एका सेकंदात लक्षात आलं ... लगेचच त्यांनी त्या युवतीकडून त्या सावकाराचे गाव, बँकग्राउंड, तो काय करतो , याची माहिती जागेवरच घेऊन पोलिसांना तिथूनच फोन लावला...हॅलो, शम्भूराज बोलतो...सावकारीचा विषय आहे...स्ट्रॉंग ऍक्शन घ्या...आणि परत माझ्या पर्यंत हा विषय येऊ देऊ नका... तक्रारदार गरीब महिला आहे आणि ती माझ्याकडे तक्रार घेऊन आली आहे...स्ट्रॉंग ऍक्शन घ्या... तिथल्या तिथंच अस सांगून मंत्री महोदयांनी त्यांच्या कामाची चुणूक ऑन द स्पॉट तिथं उपस्थित सर्वानाच दाखवून दिली...
साखर कारखान्याची निवडणूक असो,किंवा विधान सभेची... नामदार देसाई हमखास पाटणकरांच्या मनावर अधिराज्य गाजवतात आणि पाटणकर जनता त्यांना सलग मोठ्या मताने निवडूनही देते असे पाटण भागातील गेल्या 10 वर्षांपासून सातत्याने चित्र पहावयास मिळत आहे... तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्यावर पक्षाच्या प्रवक्ता पदाची जबाबदारी दिली आहे, टी व्ही वर सातत्याने शम्भूराज देसाई सेनेची बाजू मांडताना दिसत असतात. सध्याच्या राज्यातील सरकारमध्ये ठाकरेंचे विश्वासू तसेच अभ्यासू म्हणून त्यांच्याकडे राज्यातील महत्वाच्या अनेक खात्यांची मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उत्कृष्ठ संसदपटू म्हणूनही त्यांना संबोधले जाते.आणि या सगळ्यांचे कारण म्हणजे त्यांच्या कामाची सडेतोड अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक असणारी पद्धती...मागील भाजप-सेना सरकारच्या काळात त्यांच्या मतदार संघात त्यांनी सर्वाधिक कामे केली. ,डोंगरी भागासाठी मोठा निधी खेचून आणण्यात त्यांनी राज्यात बाजी मारली.आणि त्या परिसरातील विकास साधण्यासाठी मोठे प्रयत्न
केले. हे आजही पाटणकरांच्या लक्षात आहे ...त्यांच्या कामाची तळमळ, पद्धत ग्राउंड वरच्या कार्यकर्त्याला देखील आपलीशी वाटावी अशी नेहमीच असते. त्यांच्याशी कधीही बोलले तरी असे कधीच वाटत नाही की आपण एखाद्या चेअरमन,आमदार,किंवा नामदाराशी बोलतोय...एवढी आपुलकी किंवा साधेपणा त्यांच्या बोलण्या वागण्यात कायमच दिसतो आणि...असतोही. जो एखाद्या गाव पातळीवरच्या लोकल पुढाऱ्यात दिसणेही अवघड असते, हे त्यांचे वेगळेपण व वैशिष्ठय मानवेच लागेल.आता तिसरी पिढी लोकसेवेत असताना जनतेत मिसळून लोकांना आपलं समजून लोकसेवा करणारे शंभूराज देसाई यांच्यासारखा लोकांनी ठरवलेला लोकनेता किमान या जिल्ह्यात तरी दुर्मिळच... ते आमदार किंवा मंत्री आहेत या पेक्षा ते आपले आहेत,,,इथं आपलं काम होणारच...ही खात्री लोकांच्या मनात त्यांच्या बद्दल आपुलकीचे घर निर्माण करून देणारी नेहमीच असते...असे हे व्यक्तिमत्व लोकनेत्याचा वारसा जपत जनसेवेत यशस्वी पुढे जात आहे...त्यासाठी लोकसेवेला पूजा मानून त्यातूनच स्वतः ला त्यांनी अक्षरशः वाहून घेतल्याचे त्यांच्या एकूणच सार्वजनिक काम करण्याच्या तडफडीने दिसून येतंय. याचा प्रत्यय म्हणूनच, या युवतीचा विषय अचानकपणे समोर आला असतानाही तो आपल्या मतदारसंघातला किंवा आपल्या मतदारांचा आहे, नाही...हे अजिबात न पाहता ऐनवेळी तो इतक्या जबाबदारीने व आपुलकीने हाताळला व पोलिसांना या प्रश्नी स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला सांगून त्या पीडित युवतीला on the spot न्याय दिला, किंबहुना देण्याचा प्रयत्न केला. यातूनच त्यांना असणारी लोकसेवेची तळमळ,तडफड दिसून आली व समाजकारणात ब्राईट फ्युचर असणारे नामदार शम्भूराज देसाई हे पाटणकर जनतेच्या गळ्यातील ताईत का बनले आहेत?...हे या अचानक घडलेल्या घटनेने सिद्ध आणि उघडही केले.

No comments:
Post a Comment