कराड
येथील अतिक्रमण काढून शहरातील लोकांना वाहतुकीला अडथळा येऊ नये हा प्रमुख हेतू ठेवून शहरात अतिक्रमण मोहीम सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेचे मुख्याधिकारी डांगे यांनी नुकतेच काल वर्तमानपत्रातून व्यापाऱ्यांना सूचना करणारे एक प्रसिद्धीपत्रक काढले,पण शहरात अतिक्रमण बाबतीत इतकं रामायण झाल्यावर हे पत्रक आत्ता का काढलं ?ते काढण्यामाग नेमकी गेम काय असावी? या विषयी शहरात अनेक चर्चा सुरू आहेत.
काल काही दैनिकामधून पालिकेने जाहीर प्रसिद्धीकरणांच्या नावाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, येथील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकान चा बोर्ड करायचा असेल तर पालिकेकडून ना हरकत दाखला घेणे गरजेचे आहे. पायऱ्या बांधताना गटार स्वच्छतेसाठी मोकळी जागा सोडणेचे आहे.
खरतर झालेल्या अतिक्रमण मोहिमेत या नियमांचे उलनघन करणाऱ्यांवर कारवाई झाली.पण ज्या प्रमाणे आत्ता प्रसिद्धीपत्रकातून व्यापाऱ्यांना येथील c o नि ह्या सूचना दिल्या, त्या प्रमाणे अतिक्रमण कारवाई करण्यापूर्वी का दिल्या नाहीत ..... हाच प्रश्न आहे...तसे केले असते तर व्यापाऱ्यांना मोर्चा काढावा लागला नसता... तसेच शहरातील व्यापाऱ्यांचे मोठे झालेले नुकसान वाचले असते...
आता व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या पवितऱ्यात असल्याचे समजल्याने याच व्यापाऱ्यांना आता सगळं रामायण झाल्यावर उगीचच नव्याने मलमपट्टी करून त्यांना गोंजारण्यासाठी हा नोटीसीचा नवीन फंडा हुडकून काढला आहे ? अशी शहराला शंका आहे. तर c o च्या असल्या कारभाराविरोधात पालिकेत विशेष सभा होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे सावध झालेल्या c o नी या चर्चेतून स्वतःला वाचवण्यासाठी ही नोटीस वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्याची नवी आयडिया काढली आहे का ? की जेणेकरून या विषयावरच पडदा पडेल?कारण या पत्रकामुळे शहरात परत मोहीम सुरू होणार?की नाही?या चर्चेने वेग घेतला असल्याने, या चर्चेत शहराला नुसतच गोल गोल फिरवत वेळ घालवला जाईल? आणि मग ही मोहीम कालांतराने आपोआपच थांबेल व मोठी,मोठी राहिलेली शहरातील अतिक्रमणे वाचवण्यासाठी या निमित्ताने हा केलेला खटाटोप शेवटी यशस्वी होईल ?अशीही चर्चा आता सुरू आहे.त्यामुळे अशा अनेक चर्चेचे वादळ या प्रसिद्ध झालेल्या निवेदनाने शहरात घोंगावत आहे.म्हणून नेमकं हे निवेदन काढून त्यातून मुख्याधिकाऱ्यांना काय साध्य करायचे आहे? हेच शहराला व व्यापाऱ्यांना कळण आता गरजेच आहे....
येथील नेते आनंदा लादे यांनी शहरातील अतिक्रमणे काढताना दुजाभाव करण्यात आला या कारणाने काल येथे उपोषण सुरू केले होते. तिथे जाऊन मुख्याधिकारी यांनी लादेना 15 दिवसात शहरातील धेंडांची अतिक्रमण काढणार अशा भाषेत आश्वासन देऊन उपोषण सोडायला लावले.आता जर विचार केला,,,तर 15 दिवसच का?,,, आत्ताच 4 दिवस मोहीम बंद आहे तर लोक हळूहळू विसरू लागले आहेत, मग 15 दिवसांनी हा विषय शांत होऊन त्याचे गांभीर्य संपून जाईल आणि मग मुख्याधिकाऱ्यांना जे हवं आहे ते आपोआपच घडवून आणण्याचा प्रयत्न होईल...? अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.अशी चर्चा आहे. म्हणजे सगळंच कस प्लॅनिंग करून चाललंय इतपत हे जाणवल्याशिवाय राहत नाही.....
तर दुसरीकडे,शहरातील व्यापाऱ्यांना जेव्हा नोटीस किंवा निवेदन द्यायला पाहिजे होत,तेव्हा दिल गेलं नाही.आणि आता सगळं उजाड आणि भकास गाव करून ही नोटीस देऊन काय उपयोग? हे बारक्या पोराला पण कळतंय...मग, ही नोटीस, निवेदन किंवा सूचना व्यापाऱ्यांसाठी वर्तमानपत्रातून आत्ताच प्रसिद्ध करण्यामागची नेमकी गेम काय आहे ? हे शहराला आता कळलंच पाहिजे अशी या निमित्ताने चर्चा आहे.

No comments:
Post a Comment