कराड
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण, सहकार महर्षी यशवंतराव मोहिते,लोकनेते राजारामबापू पाटील,जेष्ठ विचारवंत रफिक झकेरीया यांचे सध्या जन्म शताब्दी वर्ष आहे.त्या निमित्ताने या सर्वांच्या कार्य कर्तृत्वाचे स्मरण व्हावे म्हणून,येत्या 11 मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मुंबई येथील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात या नेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे,जेष्ठ पत्रकार कुमार केतकर,मधुकर भावे,व सनदी अधिकारी श्री,गोडबोले या वेळी आपले विचार मांडून या दिवंगत नेत्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणार आहेत. विधान सभा व विधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे.,अशी माहिती कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ.इंद्रजित मोहिते यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच,जेष्ठ नेते शरद पवार,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे अनेक आजी, माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.दरम्यान होणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या निवडनूक पटलावर अविनाश मोहितेबरोबर एकत्र येण्याबाबत "मी एकतर्फी प्रेम करत नाही'असे सांगत भविष्यात अविनाश मोहितेंनी तयारी दाखवल्यास आपण एकत्र येऊ शकतो असे त्यांनी यावेळी संकेतही दिले.दरम्यान ते पुढे म्हणाले,राज्याच्या सुव्यवस्थित बांधणीसाठी यशवंतराव मोहितेंसह या चारही दिवंगत लोकनेत्यांचं योगदान फारच मोठं आहे.यांनी बहुजन लोकांना केंद्रबिंदू मानून त्या काळात केलेलं काम आजही राज्याच्या पटलावर आदर्शवत म्हणूनच आहे.त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज समाज कारण होण्याची गरज आहे.आम्हाला या गौरव सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभलं म्हणून आम्हाला अभिमान वाटतो आहे.जुन्या जाणत्या या नेत्यांचा गौरव सोहळा आयोजित केल्याने सध्याच्या सरकारची वाटचाल योग्य चालु आहे असच म्हणावे लागेल असही ते म्हणाले.
कृष्णा कारखान्याची निवडणूक शासनाच्या धोरणानुसार पुढे ढकलली गेली असली तरी,आम्ही या निवडणुकीसाठी सज्ज आहोत.भाऊंच्या विचारांची बांधिलकी मानणारा कोणीही,आणि कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं या निवडणुकीसाठी आम्ही आमच्या बाजूने स्वागत करणार आहोत. पक्षविरहीत आणि शेतकरी हाच पक्ष म्हणून आम्ही सर्व समावेशक अशी या निवडणुकीसाठी बांधणी करून उतरणार आहोत.आजही कारखाना भाऊंच्या विचाराने चालतो आहे.उभा राहिला आहे म्हणूनच शेतकऱ्यांना चांगले दिवस आज पहायला मिळत आहेत.भाऊंच्या विचारांने चालणारा सहकार शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.सहकार हा राजकारणाचा मुख्य कणा मानला गेला आहे.त्यामुळे साखर कारखानदारी वजा करून राज्याचं राजकारण व सहकार क्षेत्र अपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलं.
कृष्णेच्या निवडणुकीदरम्यानचा प्रचार हा सत्ताधाऱ्याकडून सभासदांच्या हिताचा केला गेला नाही,तर तो शेतकऱ्यांची फसवणूक करणारा होता.दर्जेदार नव्हता.खासगी कारखाने सहकाराला धोकादायक ठरू पाहत आहेत,त्यामुळे भविष्यात सहकार क्षेत्राला त्याचे आव्हान असेल. त्याचे असणारे तंत्रज्ञान, कामगार भरती प्रक्रिया, व आधुनिकता सहकारी कारखान्यापेक्षा सरस असल्याने सहकार प्रक्रिया टिकवण्याचे मोठे आव्हान या निमित्ताने आहे.
मी या पूर्वीच्या कृष्णेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आवर्जून जात होतो,मात्र जेव्हा पासून लोकशाहीला मारक अशी या सभेची पद्धती सुरू झाली तेव्हा पासून तिथे जात नाही.खोट्या केसेस करणे,जाळ्या लावणे, बॅरिगेट्स ने अडआडवी करणें अशा पद्धती ने आता या सभा होत असल्याने आपण त्या ठिकाणी जात नसल्याचं मोहिते यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment