(अजिंक्य गोवेकर यांजकडून)
कराड
येथील पालिकेची आज शुक्रवार दिनांक 13 रोजी सायंकाळी पाच वाजता होणारी विशेष सभा येथील पालिका मुख्याधिकारी डांगे यांनी न होऊ देण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न केला खरा ?,मात्र नगरसेवक आण्णा पावसकर, नगराध्यक्षा सौ. शिंदे यांच्यासह नगरसेवक फारुख पटवेकर व सर्व सहकाऱ्यांनी तो हाणून पाडल्याचे समजते. ही विशेष सभा आज संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. शहरातील अतिक्रमणे,व हॉकर्सच्या शहरातील असणाऱ्या प्रश्नांवर ही सभा वादळी होण्याची चिन्हे आहेत.दरम्यान ही सभा न होऊ देण्यामागचा मुख्याधिकाऱ्यांचा हेतू अद्याप स्पष्ट होत नसला,तरी या अतिक्रमण मोहिमेतून झालेल्या नुकसानीला आपणच जबाबदार असल्याच्या ठपक्याच्या बदनामीला टाळण्यासाठी मुख्याधिकारी ही सभा होऊ न देण्याच्या पवित्र्यात होते का ? अशी चर्चा पालिकेत ऐकायला मिळाली.काही दिवसांपूर्वीच येथील मुख्याधिकारी डांगे यांनी शहरातील असणारे अतिक्रमण काढण्याचं काम हातात घेतलं. या मोहिमेला कोणाचाच विरोध नव्हता.नाही. पण ती ज्या पद्धतीने ती राबवण्यात आली,त्या पद्धतीला शहरातून मोठा विरोध झाला.आजही आहे. कोणालाही कसलीही नोटीस किंवा अगोदर कायदेशीर कल्पना न देता येथील मुख्याधिकार्यांनी येथील मुख्य ररस्त्यावर असणारी व्यापाऱ्यांची अतिक्रमणे काढायला सुरुवात केली.त्यावेळी येथील बाजार पेठेतील याच व्यापाराच्या दुकानाचे लाखो रुपयांच्या फलकांचे तोडून,फोडून प्रशासनाकडून नुकसान करण्यात आले. कोणाचे हजारात तर कोणाचं लाखात याबाबत नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय. येथील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या असल्या कारभाराविरोधात शहरातून मोर्चा काढला.पोलिसांना निवेदन दिले.हे घडत असताना मुख्याधिकारी शहरातील खोकी,टपऱ्या, हातगाडी आशा अतिक्रमनावर
हातोडा फिरवून शहरातील अतिक्रमणे झपाझप काढत पुढे चालले होते, दुसरीकडे शहरातील काही सहकारी बँकांच्या मालकीच्या असणाऱ्या येथील बझार ची अतिक्रमणे, तसेच काही राजकीय नेत्यांची अतिक्रमणे डांगे यांनी तशीच ठेवली अशा चर्चा त्यावेळी होऊ लागल्या होत्या. मुख्याधिकार्यांच्या असल्या दुजाभाव करणाऱ्या या मोहिमेविरोधात त्यावेळी शहरातून मोठा विरोधही झाला होता. आजही आहे. त्यामुळे व्यापारी व लहान व्यावसायिक यांच्याकडून मुख्याधिकार्यांनी केलेल्या या पार्सलेटीमुळे डांगेच्या नावाची त्यावेळी छि,,, थू,,, होताना दिसली. अक्षरशः त्यांच्या नावाने शहरातून शिव्यांच्या लाखोंल्या वाहिल्या गेलेल्या देखील ऐकायला मिळाल्या. आपल्या नावाने सम्पूर्ण शहर खडे फोडतय हे माहीत असलेल्या डांगे यांनी याच विषयावर आज सभा बोलावण्यासंदर्भात ,ती कायद्यात बसत नाही असं सांगत ती होऊच न देण्याचा प्रयत्न केला? मात्र नगरसेवक विनायक पावसकर यांनी तुमच्या बोलावलेल्या सभा कायदेशीर आणि आम्ही बोलावल्या की त्या कायद्यात कशा बसत नाहीत?असा सवाल करत कायद्याने ही सभा होऊ शकते हे दाखवून दिले, तरीही ही सभा झाली नाही तर आपण पालिकेसमोर उपोषण करणार व पत्रकार परिषद घेऊन या विषयी शहराशी बोलणार असा पवित्रा घेतला तेव्हा हा विषय सभा घेण्यावर संपला?? असे पालिकेतून समजते. ही सभा होऊ नये व जर झाली तर दुसरे दिवशी सभेतून होणाऱ्या आपल्यावरच्या आरोपाच्या प्रसिद्ध होणाऱ्या वर्तमानपत्रातील बातम्या आपली बदनामी करू शकतात? त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान करून बदनाम झालेल्या या अतिक्रमण मोहिमेच्या अपयशाच खापर आपल्या टाळक्यावर फुटेल? असा विचार करून ही सभा मुख्याधिकाऱ्यांना होऊच द्यायची नव्हती ? मात्र आता ती होणार असल्याने ही सभा सम्पूर्ण जिल्ह्यात गाजणार अशी चर्चा आहे. तसेच या अतिक्रमण मोहिमेतील झालेल्या अनेक भानगडी आता या निमित्ताने शहरासमोर येणार अशी शक्यताही वर्तवली जात आहे.याची कल्पना स्वतः डांगे यांनाही आहे? म्हणून ही सभा न व्हावी यासाठी सगळे प्रयत्न त्यांनी करून बघितले?? मात्र नगरसेवक आण्णा पावसकर,फारुख पटवेकर,नगराध्यक्षा सौ.शिंदे यांनी हा विषय लावून धरल्याने ही सभा होत असल्याचं पालिकेतून समजते.
No comments:
Post a Comment