(अजिंक्य गोवेकर यांजकडून)
कराड-
येथील पालिकेचे आरोग्य सभापती नगरसेवक महेश कांबळे हे येत्या सोमवार पासून आपले उपोषण सुरू करणार आहेत.मुख्याधिकाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून सांगूनही शहरातील बारा डबरी परिसरातील पालिकेने बांधलेल्या घरकुल परिसरातील स्वच्छता अद्याप करण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी दुर्गंधीच प्रमाण एवढं वाढलं आहे की,तिथे आता रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे,तरीही सी. ओ. याकडे कानाडोळा करत असल्याने या भागातील नगरसेवक महेश कांबळे येत्या सोमवारपासून उपोषण करणार असल्याचे त्यांनी पत्रकाराना सांगितलं. दरम्यान सी. ओ. डांगे शहरातील राजकारणाला यातून खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांच्यावर यानिमित्ताने होत आहे.काल शुक्रवार दि.13 रोजी अतिक्रमण विषयी झालेली सभा सी. ओ. यांनी होऊ नये यासाठी प्रयत्न केले अशी चर्चा झाली. ही सभा नगरसेवकांच्या "कोरम' अभावी होणार नाही असे अगोदरच सांगून सदर सभेला नगरसेवकांची संख्या आवश्यक तेवढी भरणार नाही असं त्यानी पत्रकारांना सभेपूर्वीच सुचवले होते याचे पत्रकारांना आश्चर्य वाटले.म्हणजे डांगे हे सत्ताधारी गटाचे पुढारी आहेत की मुख्याधिकारी?अशी शंका सर्वानाच आली.दरम्यान याच सभेला पालिका अधिकाऱ्यांनी हजर रहायचे नाही असा डांगे यांनी "स्टाफ' अंतर्गत "फतवा' काढलेला कागद यावेळी पत्रकारांना मिळाला. या सर्व गोष्टींना राजकीय हस्तक्षेप नाही म्हणायच तर काय म्हणायचं ?अशी शहरातून विचारणा होते आहे. त्यांच्याकडून अशा चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामाच्या निमित्ताने सम्पूर्ण गावाकडून ते आता शिव्याच्या लाखोल्या खाऊ लागल्याचं चित्र आहे.
यशवंत डांगे हे कराड शहरातील कार्यक्षम सी.ओ. असल्याची चर्चा काही दिवसापर्यंत होती.मात्र,येथील अतिक्रमण मोहिमेने त्यांना बदनाम केले.त्यांचं खर स्वरूप लोकांसमोर आलं. त्यांनी ही मोहीम राबवली त्याबद्दल लोक त्यांना नाव ठेवत नाहीत, मात्र ती मोहीम त्यांनी ज्या पद्धतीने चालवली त्याची निंदा,निषेध शहरातून सुरू आहे.एवढ्या घाणेरड्या पद्धतीने कामकाज करून सगळ्या गावाचे एकप्रकारे नुकसान व वाटोळं करणारा मुख्याधिकारी म्हणून त्यांची शहरात आता नवी ओळख बनली आहे अशी टीका काही नगरसेवकांकडून होत आहे.
शहरातील व्यापारी,लहान लहान व्यावसायिक हातावर पोट असणाऱ्या अनेकांना अतिक्रमण नावाखाली त्यांनी अक्षरशः उपासमारी पर्यंत नेऊन ठेवलंय अशीही चर्चा शहरात सुरू आहे. शहरातील धेंडांची अतिक्रमणे अद्याप त्यांनी काढली नाहीत यामुळे त्यांना शहरातून रोज लोकांच्या रोशास तोंड द्यावे लागत असल्याचेही चित्र आहे.एवढा बदनाम सी. ओ. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच इथे पाहीला असेही इथले व्यापारी त्यांच्याबद्दल बोलत आहेत. त्यामुळे सध्या डांगे म्हणजे एखाद्या चित्रपटातील व्हिलन असल्या प्रमाणे चुकीच्या पद्धतीच्या कामकाज करण्याने बदनाम झाले आहेत असे चित्र आहे व चर्चाही...
व्यापाऱ्यांचे त्यांनी अतिक्रमण नावाखाली केलेलं नुकसान,या मोहिमेत केलेला दुजाभाव शहरातून चर्चेत असतानाच,त्यांचा दुसरा एक प्रकार आता चर्चेत आहे. येथील बारा डबरी परिसरात पालिकेनेच बांधलेल्या गरिबांसाठीच्या घरकुल परिसरातुन अनेक महिन्यापासून असणाऱ्या घाणीच्या साम्राज्याला तिथे तसेच मुद्दाम ठेवत तेथील लोकांना जाणूनबुजून रोगराईच्या खाईत येथील सी. ओ. यांनीच ढकलले आहे अशी त्या ठिकाणचे लोक चर्चा करत आहेत. तेथील नगरसेवक महेश कांबळे यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की ,डांगे याना याठिकाणचे घाणीचे वाढते साम्राज्य काढण्यासाठी वारंवार सांगितले तरीही त्यांनी ऐकले नाही.आता इथं इतकी घाण वाढली आहे की येथे साठणारा मैला लोकांच्या घराजवळून वाहतोय,दुर्गंधी पसरतेय,रोगराई वाढते आहे,आणि याची कल्पना देऊनही सी. ओ. डांगे इकडे लक्षच देत नाहीत तर निष्ठुरपणे वागत आहेत.राजकारण करण्याला खतपाणी घालत आहेत. यासाठी आपण येथील लोकांना न्याय मिळावा म्हणून येत्या सोमवारपासून उपोषण करणार आहोत.याबाबत जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना भेटून तक्रार देखील आपण करणार आहोत असेही ते म्हणाले. दरम्यान ,एवढे होऊनही डांगे,येथील बारा डबरी परिसरातील प्रश्नी लक्ष न घालता पालिकेतील सत्तारूढ गटातील अंतर्गत असलेल्या गटबाजीला एकप्रकारे खतपाणीच घालत असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. यातून त्यांचा शहरातील राजकारणातील हस्तक्षेप दिसतो असेही बोलले जात आहे.एकूणच, चुकीच्या चाललेल्या व शहराचे नुकसान करणाऱ्या डांगे यांच्या कामाच्या पद्धतीच्या चर्चेमुळे तसेच, राजकीय हस्तक्षेप वाढल्याच्या कारणाने कराडकरांच्या कौतुकास पात्र ठरलेले एकेकाळचे हेच डांगे सध्या मात्र कराडकराच्या रोशास तोंड देत लोकांच्या शिव्या शाप खाताना दिसत आहेत.
No comments:
Post a Comment