Tuesday, June 30, 2020

जिल्ह्यातील 48 जण सापडले बाधीत; ; कराडच्या रुक्मिणीनगर मधील एकजणांचा समावेश; कोरोनाचे अक्षरशः थैमान सुरू

सातारा दि. 1 (जि. मा. का): काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 37, प्रवास करुन आलेले 5, सारी 5, आय.एल.आय (ILI) 1 असे एकूण  48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित  आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
            यामध्ये *कराड तालुक्यातील* महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, रुक्मिणी नगर येथील 39 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22,54,32,40,35 वर्षीय महिला व 11 वर्षीय युवक व 60,44 वर्षीय पुरुष, तुळसन येथील 3 वर्षाची बालिका, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, 23,45,70 वर्षीय महिला, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष. मलकापूर येथील 36, 34  वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवती.
*पाटण तालुक्यातील* नवसरी येथील 15 व 17 वर्षीय युवक तसेच 36 वर्षीय महिला, पालेकर वाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील 11 व 29 वर्षीय महिला व 4 वर्षाची बालिका.
*सातारा तालुक्यातील* नागठाणे येथील 45 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 39 वर्षीय पुरुष.
*माण तालुक्यातील* खडकी पाटोळे येथील 62 वर्षीय पुरुष.
*खटाव तालुक्यातील* निमसोड येथील 68 वर्षीय महिला, कन्नवडी मायणी येथील 75 वर्षीय् पुरुष, राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष.
*कोरेगाव तालुक्यातील* करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका.
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ येथील 22,24,32,25 वर्षीय पुरुष व 19 व 49 वर्षीय महिला.
*फलटण  तालुक्यातील* कुरवली येथील 4 वर्षीय बालक, कोरेगाव येथील 5 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 43 वर्षीय पुरुष,  आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष.
*जावळी तालुक्यातील* मार्ली येथील 82 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

वाढीव वीजबिलासंदर्भात नगरसेवक सौरभ पाटील यांची mseb अधिकाऱ्यांशी चर्चा ; विजबिल प्रश्नावर लोकशाही आघाडी कराडकरांबरोबर ठाम; भूमिका केली स्पष्ट..

कराड
वाढीव वीज बीलांसदर्भात काल सोमवार दि 29   रोजी येथील महावितरण चे अतिरीक्त कार्यकारी अभियंता आजीतकूमार नवाळे, संदीप पांढरपट्टे,  शिवजीत पाटील यांनी येथील पालिकेतील लोकशाही आघाडीचे गटनेते श्री सौरभ पाटील यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक मोहसीन आंबेकरी उपस्थित होते.
Mseb च्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी नगरसेवक पाटील यांच्यासमोर आपली भूमिका मांडून त्याबाबतचे निवेदनही दिले.
 यावेळी नगरसेवक सौरभ पाटील या अधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले ,  जनतेमध्ये सध्या वीजबिलांबाबत खूप गैरसमज आहेत. लॉकडाऊन मूळे जनतेची आर्थिक घडी विस्कटल्याने जनतेत आक्रोश आहे. अशा परिस्थितीत लोकशाही आघाडी कराडकरांसोबत ठामपणे उभी आहे.अन्यायी पद्धतीने आलेल्या बिलांबाबत जनतेला त्रास न होता महावीतरणाने व्यवहार्य मार्ग काढावा अशी मागणीही सौरभ पाटील यांनी यावेळी केली. वीज बिलांचे हप्ते ठरऊन देता येतील का याबाबतही यावेळी चर्चा झाली. वीज बीलांबाबत चौकशी करण्यासाठी संबंधीत कार्यालयात प्रचंड गर्दी होते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे आवश्यक आहे. तेंव्हा कराड शहरातील प्रत्येक पेठेला एक एक दिवस द्या जेणेकरून एकाच वेळी गर्दी होणार नाही अशी सूचना सौरभ पाटील यांनी यावेळी बोलताना केली.
   

जिल्ह्यात 14 जण सापडले पॉझिटिव्ह ; कोरोनाचा दणका सुरूच

सातारा दि. 30 (जि. मा. का): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे उपचार घेत असलेल्या 14 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये *पाटण* तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील 18 वर्षीय युवक, 45 व 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील 40 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 60 वर्षीय महिला,
*कराड* येथील गजानन हौसिंग सोसायटी येथील 40 वर्षीय पुरुष, चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष , शिवडे येथील 36 वर्षीय पुरुष, तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील 10 वर्षाचा मुलगा, विद्यानगर, सैदापूर येथील 26 वर्षीय महिला,मलकापूर येथील 26 वर्षीय पुरुष, नडशी येथील 31 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
*145 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
एन.सी.सी.एस., पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 145 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
तसेच 27 जून रोजी एन.सी.सी.एस. पुणे  यांनी कळविलेल्या रिपोर्टमधील 55 वर्षीय पुरुष हा गोडोली येथील असल्याचे कळविले होते, परंतु त्याचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे ता. मावळ असल्याने या बाधिताची नोंद जिल्ह्यातून वगळण्यात आली आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
00000

Monday, June 29, 2020

सातारा जिल्ह्यात 19 जण सापडले पॉझिटिव्ह ; रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनाची पळापळ सुरू ; धोका वाढला

सातारा दि. 29 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 12 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून त्यातील 4 प्रवासी, 10 निकटसहवासित आणि 5 सारीचे रुग्ण आहेत.

*जावली तालुक्यातील* रामवाडी येथील 48 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय युवक, वय 42, 48, 43 व 55 वर्षीय महिला, बामणोली तर्फे कुडाळ येथील 46 वर्षीय पुरुष, आखेगणी येथील 16 वर्षीय युवक.,

*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ येथील 83 वर्षीय वृध्द, व 31 वर्षीय महिला.,

*सातारा तालुक्यातील* दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन कॉर्टर 39 वर्षीय पुरुष, जिहे येथील 68 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय 2 पुरुष, क्षेत्र माहूली येथील 50 वर्षीय पुरुष.,

*वाई तालुक्यातील* धरमपुरी येथील 35 वर्षीय पुरुष व ब्राम्हणशाई  येथील 68 वर्षीय महिला.,

*माण तालुक्यातील* खडकी (पाटोळे) येथील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

000
, 28 जून : राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी राज्यात सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर ते बोलत आहेत. राज्यात लॉकडाऊनदरम्यान, शिथिलता दिल्यामुळे कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. अशात राज्यातला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्य अनलॉक होत असताना अनेक दुकानं आणि व्यवसाय सुरू होत आहे. पण त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही बाहेर पडून नका असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. यावेळी आपण शेतकऱ्यांच्या मागे खंबीर उभं राहणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.

कोरोनाच्या लॉक डाऊन काळातील विजबिले माफ करा ; कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडींच्या नेतृत्वाखाली भाजपाची मागणी

कराड
कोरोनाच्या लॉक डाऊन काळातील विजबिले माफ करा अशी मागणी करणारे निवेदन आज शहर भाजपा च्या वतीने अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनास देण्यात आले.
कोरोनामुळे तीन महिन्यांपासून सर्वत्र महासंकट चालू असून या कालावधीत वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वाढीव वीज बील मिळाले असल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे.  महावितरण कंपनीकडून मनमानी करत सरासरी बीलामुळे ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबवावी. अंदाजे बीले टाकण्यापेक्षा रिडिंग घेतल्या शिवाय नागरिकांची वीज बीले तयार करू नयेत. ज्या कंपनी व व्यावसायिक आहेत यांच्यासह सर्व नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वाढीव बीले आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. वीज बील भरणा करण्यासाठी व वीज बीलाची रक्कम कमी करून घेण्यासाठी कंपनीमार्फत अर्ज भरण्यास सांगितले जात आहे. यामुळे वीज बील भरणा केंद्रावर नागरिकांच्या रांगा वाढत असल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो. सदर सर्व बाबींचा विचार करून कोरोना काळातील वीज बीले माफ करावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टी कराड यांच्या वतीने आज येथे करण्यांत आली. बीला संदर्भात काही तक्रार असल्यास कराड शहर अध्यक्ष यांच्या व्हाट्स अप नंबरवर 9822449444 या वर संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दरम्यान कराड शहर भाजपा अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या वतीने सदर निवेदन तहसीलदार व प्रांत अधिकारी तसेच एम. एस. इ. बी  यांना देण्यात आले .
 यावेळी कराड शहर सरचिटणीस श्री. प्रमोद शिंदे व सरचिटणीस श्री. राहुल भिसे, महिला मोर्चा कराड शहर अध्यक्षा सौ. सीमा घार्गे, अनुसूचीत जाती कराड शहर अध्यक्ष श्री. सागर लादे, श्री. शुभम पवार,श्री. इसाकचाचा मुजावर श्री. विवेक भोसले,श्री.क्षीरसागर इ. उपस्थित होते.

वाढीव वीज बिलाबाबत कराडच्या नगराध्यक्षांची महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा ; लोकनियुक्त नगराध्यक्षांची लोकांसाठीची धडपड कौतुकास्पद

कराड -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमध्ये वीज बिले ग्राहकांना देण्यात आली नव्हती.सदर बिलांचे वाटप सध्या सुरू केले असून ही वीज बिले वाढीव दराने आकरण्यात आली आहेत.यामुळे नागरिकांच्यात प्रचंड नाराजी असून,लॉकडाऊन मध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाले असल्यामुळे सदरची बिले भरायची कशी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या अन्यायकारक वीज बिल संदर्भात कराडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.रोहिणी उमेश शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याबरोबर सविस्तर चर्चा केली.
 ही वीज बिले अन्यायकारक असून आधीच अडचणीत असलेल्या जनतेने सदरची बिले भरायची कशी असा सवाल केला.व याबाबत सर्वमान्य असा तोडगा काढून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा.अशी मागणी नगराध्यक्षांनी केली.

यावेळी झालेल्या चर्चेत जेष्ठ नगरसेवक श्री.विनायकराव पावसकर (आण्णा) कुंभार समाजाचे नेते श्री.नथुराम कुंभार यांनीही भाग घेतला.यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कराड शहरचे श्री.अजितकुमार नवाळे , शिवजीत पाटील,संदीप पांढरपट्टे,तुषार खराडे सर्व सहाय्यक अभियंता, प्रमोद धुमाळ - लिपिक व इतर उपस्थित होते.

Sunday, June 28, 2020

जिल्ह्यात 39 जण सापडले पॉझिटिव्ह ; प्रशासन चक्रावले

*जिल्ह्यात 39 नागरिकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह*

सातारा दि. 29 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 39 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये *खटाव* तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला
*जावली* तालुक्यातील रामवाडी येथील 27 व 48, 30 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, आखेगनी येथील 68 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, बिरामनेवाडी येथील  52 वर्षीय पुरुष
*कराड* तालुक्यातील गोळेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 45, 65 वर्षीय महिला 12 मुलगी, 20 वर्षीय युवक, 8 वर्षाचा मुलगा,  उब्रंज येथील 47 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षाचा मुलगा, 50 वर्षीय महिला,  56, 27, 23 वर्षीय पुरुष
*पाटण* तालुक्यातील सांघवड येथील 31 वर्षीय पुरुष
*फलटण* तालुक्यातील जिंती येथील 44 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 26, 27 वर्षीय महिला, 9, 6, 4 वर्षाची मुलगी, 7 वर्षाचा मुलगा, अलगुडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष
*वाई* तालुक्यातील वाघजाईवाडी येथील 44 वर्षीय महिला, पसरणी येथील 47 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष
*सातारा* तालुक्यातील नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष
*कोरेगाव* तालुक्यातील चौधरवाडी येथील 32 वर्षीय पुरुष
*खंडाळा* तालुक्यातील शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
00000

Saturday, June 27, 2020

जिल्ह्यातील 36 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह ; धक्कादायक बातमी

सातारा दि. 28 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 37 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये *कराड* तालुक्यातील  खूबी येथील 19 वर्षीय युवक, रेठरे खु येथील 21 वर्षीय महिला, तारुख येथील 60 वर्षीय महिला
*पाटण* तालुक्यातील  सितापवाडी 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष
*माण* तालुक्यातील खांडेवाडी वारुडगड येथील 33 वर्षीय पुरुष
*खटाव* तालुक्यातील येळीव येथील 76 वर्षीय महिला व 24, 26 वर्षीय पुरुष
*कोरेगाव* तालुक्यातील बनवडी 39 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 23 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 28 वर्षीय पुरुष, नागझरी येथील 28 वर्षीय पुरुष
*जावली* तालुक्यातील रामवाडी येथील 48 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 22 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 18 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, धोंडेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष
*सातारा* तालुक्यातील गोडोली येथील 55 वर्षीय पुरुष,  जिहे येथील 50 वर्षीय महिला, चंदननगर कोडोली येथील 39 वर्षीय महिला, धावली  येथील 26 वर्षीय पुरुष, बोरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष
*खंडाळा* तालुक्यातील शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, शिरवळ येथील शहाजी चौक येथील 20 व 42 वर्षीय पुरुष
*वाई* सह्याद्रीनगर  येथील 30 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
एक रुग्ण हा पुणे येथे स्थायिक असल्याने त्याची गणना जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत केलेली नाही.
*191जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड यांनी 191 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


0000

जिल्ह्यात आणखी 19 जण सापडले बाधित

सातारा दि. 27 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या कोरोनाबाधित 19 रुग्णांमध्ये 13 पुरुष व 6 महिलांचा समावेश असून यात  मुंबई येथून प्रवास करुन आलेले  12 प्रवासी, 7 निकटसहवासित आहेत.
बाधित रुग्णांमध्ये *कराड तालुक्यातील* जखीणवाडी येथील 47 वर्षीय महिला,23 वर्षीय युवती, 52 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक, लटकेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय युवक आणि 42 वर्षीय महिला व 21 वर्षीय युवती, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, खंडोबानगर (मलकापूर) येथील 8 वर्षीय बालक, वय 30 व 50 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 30 वर्षीय महिला.,

*पाटण तालुक्यातील* नवसरे येथील 42 वर्षीय पुरुष, गमेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष.,

*खटाव तालुक्यातील* खटाव येथील येथील 62 वर्षीय पुरुष.,

*माण तालुक्यातील* म्हसवड येथील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.


000

शहरातील कोरोना बाधित परिसराला नगराध्यक्षा सौ रोहिणीताई शिंदेंची भेट ; सम्पूर्ण परिसरात केली औषध फवारणी ; "घाबरू नका' असे सांगत दिला जनतेला धीर

कराड
 शनिवार पेठ येथील खरेदी विक्री पेट्रोल पंप परिसरात राहणाऱ्या  ७५ वय असलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे, त्यामुळे येथील नगराध्यक्षा सौ रोहिणीताई शिंदे यांनी या ठिकाणी तातडीने भेट दिली व तो परिसर सानीटाईझ करून घेतला. तसेच त्यांनी रुग्णाच्या घरातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. व त्या लोकांच्या आरोग्याच्या ड्रीष्टीने तो संपूर्ण परिसरच औषध फवारणी करून निरजंतूकिकरण केरून घेतला.
नगराध्यक्षांनी तातडीने दाखल घेवून केलेल्या कामाबददल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी त्या ठिकाणच्या लोकांना अफवावर विश्वास ठेवू नका. घाबरून जाऊ नका,आम्ही आपल्या सोबत आहोत .प्रशासनाने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे, पालिकेचे सर्वच अधिकारी कर्मचारी आम्ही सर्वजण आपली काळजी घेत आहोत
असे सांगून तेथील जनतेला धीरही दिला.
यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Friday, June 26, 2020

जिल्ह्यात 28 जण सापडले पॉझिटिव्ह ; प्रशासन पुन्हा हडबडले

*जिल्ह्यात 28 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह*
*185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह*

सातारा दि. 27 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 28 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून 185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
              या कोरोनाबाधित 28 रुग्णांमध्ये 21 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून यात  मुंबई, ठाणे, शाहजहा येथून प्रवास करुन आलेले  6 प्रवासी, 18 निकटसहवासित आणि 4 सारीचे रुग्ण आहेत.
बाधित रुग्णांमध्ये *वाई तालुक्यातील* कडेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, बावधन येथील 57 वर्षीय पुरुष.,

*खटाव तालुक्यातील* मायणी येथील 29 वर्षीय पुरुष.,

*सातारा तालुक्यातील* धावली(रोहोट) येथील 45 वर्षीय महिला, राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष.,

*खंडाळा तालुक्यातील* शिंदे वस्ती (लोणंद) येथील 38 वर्षीय महिला, आसवली येथील 27 वर्षीय पुरुष.,

*पाटण तालुक्यातील* उरुल येथील 60 वर्षीय पुरुष.,

*कराड तालुक्यातील* तारुख येथील वय 21, 22 वर्षीय युवक तसेच वय 27, 28 व 48 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 50 वर्षीय महिला,  चरेगाव येथील 4 वर्षीय बालक, वय 38 व 36 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील 75 वर्षीय पुरुष.,

*कोरेगाव तालुक्यातील* नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष.,

*जावळी तालुक्यातील*  रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, आखेगनी (रांजणी) येथील 42 वर्षीय पुरुष यांचा  समावेश आहे.

000

3 जण सापडले पॉझिटिव्ह

सातारा दि. 26 (जि. मा. का): कराड कृष्णा मेडीकल कॉलेज येथे उपचार घेणाऱ्या 3 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील  खटाव येथील 50 वर्षीय महिला व कराड तालुक्यातील खंडोबानगर, मलकापूर येथील 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
000

Thursday, June 25, 2020

22 जण सापडले पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या वाढतच चालली आहे...; चिंता आणखी वाढली

*22 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह*
  सातारा दि.25 (जिमाका) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी. सी. एस. पुणे  यांच्याकडून प्रापत झालेल्या अहवालानुसार 22 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये *कराड* तालुक्यातील उंब्रज येथील 26 वर्षीय पुरुष, येळगांव येथील  53,28 व 58 वर्षीय महिला, वडगाव येथील 55 वर्षीय महिला, चचेगाव येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष.
*कोरेगांव* तालुक्यातील नायगाव येथील 40 वर्षीय महिला, 15 वर्षाचा मुलागा व 14 वर्षाची मुलगी, करंजखोप येथील 40 व 62 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण.
*फलटण* रविवार पेठ येथील 68,25,62 व 60 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 35 वर्षीय महिला तर फलटण तालुक्यातील  फडतरवाडी येथील 45 वर्षीय पुरुष.
*वाई* तालुक्यातील सुरुर येथील 50 वर्षीय पुरुष.
*जावली* तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुष.
*पाटण* तालुक्यातील चाफळ येथील 27 वर्षीय पुरुष.
00000

Wednesday, June 24, 2020

14 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह ; जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच

सातारा दि. 24 ( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड  व एन. सी.सी.एस. पुणे यांच्याकडून प्राप्त  झालेल्या अहवालानुसार 14 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये *पाटण* तालुक्यातील शितापवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी (बहुले ) येथील 50 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला.
*कराड* तालुक्यातील रेठरे खुर्द येथील 45 वर्षीय महिला, तारुख येथील 20,40,56,40 व 45वर्षीय पुरुष व 7 वर्षीय मुलगी,
*वाई* तालुक्यातील कवठे येथील 20 वर्षीय पुरुष, एकसर येथील 25 वर्षीय पुरुष,
*कोरेगांव* तालुक्यातील पिंपोडे येथील 35 वर्षीय पुरुष,
*सातारा* तालुक्यातील गोवे (लिंब ) येथील 36 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


00000

Tuesday, June 23, 2020

5 जण सापडले पॉझिटिव्ह ; आताचा रिपोर्ट

सातारा दि. 24 ( जि. मा. का ) : एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कराड तालुक्यातील बनवडी   येथील 32 वर्षीय पुरुष, तारुख येथील 25 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील 49 वर्षीय महिला, बोंडरी येथील 34 वर्षीय पुरुष, सातारा येथील वाढे फाटा येथील 56 वर्षीय महिला असे एकूण 5 रुग्णांचा रिपोर्ट कोविड बाधित आल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*305 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह*
          काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड  यांच्याकडून 305 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

0 0 0 0

आज 2 जण सापडले पॉझिटिव्ह

सातारा दि. 23(जिमाका) : कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या दोन नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये *पाटण* तालुक्यातील सडा दाडोली येथील 70 वर्षीय पुरुषाचा व *कराड* तालुक्यातील चरेगाव येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
00000

Monday, June 22, 2020

जिल्ह्यात सात जण सापडले पॉझिटिव्ह ; प्रशासन अलर्ट ; कोयना वसाहत मधील एक जण कोरोना पॉझिटिव्ह


सातारा दि. 22 ( जि. मा. का ) : प्राप्त झालेल्या अहवालानुसार 7 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
         यामध्ये सातारा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सातारा तालुक्यातील वडुथ येथील 63 वर्षीय पुरुष कोविड बाधित असल्याचे संबंधित हॉस्पिटलने कळविले आहे.
*जावली तालुक्यातील* म्हातेखुर्द येथील 38 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगा.
*फलटण तालुक्यातील* कोरेगाव येथील 26 वर्षीय महिला.
*कोरेगाव तालुक्यातील* नायगाव येथील 44 वर्षीय पुरुष.
*पाटण तालुक्यातील* आचरेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष.
*कराड तालुक्यातील* कोयना वसाहत येथील 40 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

0 0 0 0

Sunday, June 21, 2020

20 जण सापडले पॉझिटिव्ह ; जिल्ह्याला पुन्हा धक्का

सातारा दि. 22 ( जि. मा. का ) :  रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 20 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये *जावली* तालुक्यातील गांजे येथील 24 वर्षीय पुरुष.
  *कराड* तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय 2 पुरुष व 24 वर्षीय  पुरुष.
*पाटण* येथील गोवारे येथील 40 वर्षीय महिला, 24 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय मुलगी, हवालेवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 21 वर्षीय महिला, बागलवाडी येथील 60 वर्षीय पुरुष.
*फलटण* येथील रविवार पेठ येथील 3 वर्षीय बालक.
*खटाव* तालुक्यातील शिरसवाडी येथील 50 वर्षीय महिला, 40 व 56 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचे बालक, म्हासूर्णे18 वर्षीय तरुणी.
*सातारा* तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 49 वर्षीय 2 महिला व 16 वर्षीय तरुण.

00000

Saturday, June 20, 2020

जिल्ह्यात 14 जण सापडले पॉझिटिव्ह,तर 19 जण झाले कोरोनामुक्त... प्रशासन मात्र चिंतेत

सातारा दि. 21 ( जि. मा. का ) :  एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 14 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.रुग्ण संख्या आटोक्यात येण्याबाबत प्रशासन चिंतेत आहे,तरी दरम्यान आज एकूण 19 जणांना कोरोनामुक्त म्हणून डिस्चार्ज देण्यात आला.

दरम्यान बाधितांमध्ये फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी ( हिंगणगाव )  येथील  61 व  32 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिला.
*कराड तालुक्यातील* वडगाव (उंब्रज) येथील 28, 20 व 44 वर्षीय महिला.
*खटाव तालुक्यातील* वाकळवाडी येथील  35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष.
*माण तालुक्यातील* खोकडे येथील 34 वर्षीय पुरुष.
*जावली तालुक्यातील*  म्हातेखुर्द येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष.
*सातारा तालुक्यातील* राजापूरी येथील 5 वर्षीय बालिका व 31 वर्षीय महिला याचा समावेश आहे. 00000

Friday, June 19, 2020

13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह ; जिल्ह्याची चिंता आणखी वाढली

सातारा दि. 19 ( जि. मा. का ) :  कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 13 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये *पाटण*  तालुक्यातील शेजवलवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील  24 वर्षीय महिला, धामणी येथील 21 वर्षीय तरुण
*कराड* तालुक्यातील चिकली येथील 69 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरुष, हिंगनोळे येथील 54 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 50, 45, 54 व 79  वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला,
*जावली* तालुकयातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला,
*सातारा* तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष.
00000

Thursday, June 18, 2020

आताचा रिपोर्ट ; 17 जण सापडले बाधित ; जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक

सातारा दि. 18 ( जि. मा. का )
 कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 17 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून, यामध्ये खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 61 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये *कराड* तालुक्यातील वडगांव (उंब्रज) येथील 59 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22 वर्षीय पुरुष, येळगाव येथील  65 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 39 वर्षीय पुरुष,सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, सुपने  येथील   37 वर्षीय महिला
*पाटण* तालुक्यातील कराटे येथील 59 वर्षीय पुरुष,
*कोरेगाव* येथील  39 वर्षीय महिला
*फलटण* तालुक्यातील शेऱ्याचीवाडी ( हिंगणगाव )  येथील 10 वर्षीय मुलगा,
  *माण* तालुक्यातील दहिवडी येथील 39 वर्षीय पुरुष,  21 व 17 वर्षीय तरुण
*खटाव* तालुक्यातील शिरसवाडी येथील 4 वर्षाची बालीका व 32 वर्षीय महिला
*सातारा* तालुक्यातील आरे तर्फ परळी येथील  55 वर्षीय पुरुष
*वाई* तालुक्यातील कडेगाव येथील 74 वर्षी महिला.
*खटाव* तालुक्यातील वाकळवाडी येथील 61 वर्षीय पुरुष 14 जून रोजी मुंबईहून आला , वाकळवाडी गावात घरीच विलगीकरणात होता , ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पीएचसी निमसोड ने 17 जून ला कराड कृष्णा  येथे पाठवले, आज सकाळी 11 वा उपचार चालू असताना मृत्यू झाला
0000

कराड तालुक्यातील 1 जण बाधित ; 20 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 18 ( जि. मा. का )
 विविध रुग्णालयांमध्ये व कोरोना केअर सेंटरमध्ये  दाखल असणाऱ्या 20 जणांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कराड तालुक्यातील हिंगनोळे येथील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये *माण* तालुक्यातील पिंपरी येथील 28 वर्षीय महिला व 58, 70 वर्षीय पुरुष, वडजल येथील   56 व 38 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 55 वर्षीय पुरुष, भालवडी येथील 25 वर्षीय महिला
*खटाव* तालुक्यातील वडगाव येथील 68 वर्षीय पुरुष
*जावली* तालुक्यातील प्रभुचीवाडी येथील 52, 28 व 26 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, कळकोशी येथील 39 वर्षीय
            महिला, जावली येथील 43 वर्षीय पुरुष
*खंडाळा* तालुक्यातील पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष, पळसगाव येथील 41 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
*सातारा* तालुक्यातील वावदरे येथील 45 वर्षीय महिला, माणगाव (अतित) 35 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 65 वर्षीय महिला
*134 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 28, वेणूताई चवहाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 19, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 4, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 7, शिरवळ येथील 5, रायगाव येथील 7, पानमळेवाडी येथील 6, मायणी येथील 11, महाबळेश्वर येथील 1, पाटण येथील 25 असे एकूण 134 जणांचे नमुनो एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत
*130 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 130 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशीही माहिती डॉ.  गडीकर यांनी दिली आहे.
00000

Wednesday, June 17, 2020

7 जण सापडले पॉझिटिव्ह ; 3 जण मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह

सातारा दि. 16 ( जि. मा. का ) :  आज आलेल्या रिपोर्टनुसार एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 7 नागरिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यापैकी तीघांचा रिपोर्ट मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
  यामध्ये *कोरेगाव* तालुक्यातील चोरगेवाडी येथील 27 वर्षीय पुरुष.
*रविवार पेठ सातारा* येथील  14 वर्षाची मुलगी.
*सातारा* तालुक्यातील पिंपळवाडी येथील 56 वर्षीय महिला.
*वाई* तालुक्यातील सह्याद्री नगर येथील 9 वर्षाची बालीका.
*पाटण तालुक्यातील*
 मूळ गोवारे येथील 14 जून रोजी मुंबई येथून आलेला 50 वर्षीय पुरुष गावच्या शाळेतील विलगीकरणात असताना 16 जुन रोजी अचानक मृत  पावला होता,
हावळेवाडी ( बहुले ) येथे  14 जून रोजी 45 वर्षीय महिला मानखुर्द मुंबई येथून आली होती  आणि घरातच विलगीकरणात मृत्यू पावली होती.
   *जावली* तालुक्यातील शिंदेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, 12 जून रोजी मुंबईवरून आला होता 16 जून रोजी मृत्यू श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे हॉस्पिटल आणत असताना रस्त्यात मृत्यू झाला.
 असे एकूण तीघांचा रिपोर्ट मृत्यू पश्चात पॉझिटीव्ह आला असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
00000

सहकारी संस्थांच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलल्या ; ना.बाळासाहेब पाटील

मुंबई,
 राज्यातील कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका  पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले,देशातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी  संस्थाच्या निवडणूका दि.18 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
सध्याच्या कोरोना विषाणू (कोव्हीड-19) मुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणू (कोव्हीड-19) संसर्ग टाळण्यासाठी शासनाने  दि. 31 मे, 2020 रोजीच्या आदेशान्वये राज्याचा लॅाकडाऊन कालावधी दि. 30 जून, 2020 पर्यत वाढविण्यात आला आहे. तसेच अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदविस वाढ होत आहे.  अशावेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या  निवडणूका घेणे उचित होणार नाही. म्हणून
 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतुदीनुसार ज्या प्रकरणी मा. उच्च/सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घेण्याचे आदेशीत केले आहे. आशा सहकारी संस्था वगळून  राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्यावर असतील त्या टप्यावर पुन्हा पुढील तीन महिन्यांपर्यत पुढे ढकलण्यात येत आहेत असेही श्री. पाटील यांनी संगितले.
000

ऍड.उदयसिंह पाटील लवकरच जाणार विधानपरिषदेवर ? पृथ्वीराज बाबांनी घेतली काकांची भेट ;चर्चेला उधाण


अजिंक्य गोवेकर
कराड
आमदार पृथ्वीराज चव्हाण दोन दिवसापूर्वी गृहराज्यमंत्री नामदार सतेज पाटील यांचे समवेत मुंबईला जात असताना साताऱ्यात माजी आमदार विलासकाका पाटील उंडाळकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरिता काही काळ थांबले. त्यानंतर बाबा- काका यांच्या मनो मिलनाच्या चर्चा सुरू झाल्या, मात्र या दोघांचे मनोमिलन येथील मलकापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवेळीच झाले आहे हे सगळेच जाणतात. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक दुरंगी न होऊ देता तिरंगी घडवून आणून पृथ्वीराज बाबांना आमदार करण्यात मोलाचा वाटा उचलून काका गटाने त्यांची सिद्धता देखील दिली आहे. आता त्यापुढे जाऊन ऍड.उदयसिह पाटील यांना विधानपरिषदेवर पाठवण्यासाठी या मनोमिलनाचा पुढचा अध्याय घडवून आणण्याचे  प्रयत्न एकत्रपणे या दोघांकडून सुरू आहेत अशी चर्चा सुरू आहे.

आमदार पृथ्वीराज चव्हाण व राज्याचे गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील हे दोन दिवसापूर्वी मुंबईला जाण्याकरिता एकत्रपणे चालले असताना अचानक त्यांनी सातार्यात जाऊन माजी आमदार विलासकाका पाटील उंडाळकर यांचे घरी त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यानंतर राज्यभर त्यांच्या मनोमिलन झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. खरं तर त्यांचं मनोमिलन येथील मलकापूरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यानच झाल्याचे अनेक जण जाणतात. कराड दक्षिण मतदारसंघात डॉ. अतुल बाबांना थांबवणे हा यामागचा हेतू आहे. या झालेल्या निवडणुकीनंतर मनोहर शिंदे याना काका गटाच्या महत्वपूर्ण मदतीने मलकापूर काबीज करता आले. त्यानंतर विधानसभा पार पडली. त्याचेही गणित जर पाहिले तर ही निवडणूक अतुल भोसले आणि पृथ्वीराज बाबा अशी दुरंगी झाली असती तर अतुल बाबांचा विजय झाला असता कदाचित...? अशी त्यावेळची परिस्थिती चर्चेत होती, मात्र त्यावेळी ऍड उदयसिह पाटील यांचा पाठिंबा न घेता त्यांना या निवडणुकीतून उभे करत ग्रामीण भागातील काँग्रेस मतांच्या विभाजनाचे चित्र उभे करून विरोधकांना अंधारात ठेवले व काकांच्या बालेकिल्ल्यात बाबांना मते देण्याचे राजकारण ग्रामीण परिसरातून घडवून आणले. पर्यायाने या दोघांची मते विभाजित न होता ऐनवेळच्या मिळणाऱ्या काकांच्या मताच्या आधारे पृथ्वीराजबाबा जोरात चालले, आणि आमदार झाले. डॉ. अतुल बाबांची देखील मते दुर्लक्षित करता येणार नाहीत इतकी वाढली. अर्थात ही निवडणूक दुरंगी झाली नाही हेच काँग्रेसच्या पथ्यावर पडले. यावेळी देखील काका गटाने पृथ्वीराज बाबांना व पर्यायाने काँग्रेसला मदत करत डॉ. अतुल बाबांना बाजूला करण्यात मोलाची भूमिका बजावली अशी चर्चा त्यावेळी झाली.

एकूणच कराड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राखला गेला आहे. गेली 35 वर्ष विलासकाका उंडाळकर यांनी राज्यात बिकट राजकीय परिस्थिती असताना दक्षिण च्या माध्यमातून काँग्रेसचे नाक नेहमीच उंच ठेवले होते हा इतिहास आहे. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, दूध संघ, खरेदी-विक्री संघ च्या माध्यमातून विलासकाकांनी मतदारसंघात काँग्रेसचे जाळे विणले. त्यांच्या मदतीशिवाय कृष्णा कारखान्याचा चेअरमनदेखील ठरत नव्हता अशी परिस्थिती होती. भोसले आणि मोहिते यांना पर्याय म्हणून अविनाश मोहिते यांचे नेतृत्व त्यांनीच कृष्णेच्या सभासदांना पर्याय म्हणून दिल्याचे सर्वज्ञात आहे. दक्षिणेत असणारी त्यांची ताकद संपूर्ण राज्याला परिचित आहे. पैलवान संजय पाटील खूनखटल्यानंतर दक्षिण चे राजकारण फिरले. उदयसिंह पाटील यांचे नाव यामध्ये येऊ लागले. परंतु त्यातून उदयसिंह पाटील निर्दोष झाल्यानंतर मात्र नाट्यमय घडामोडी घडत गेल्या व काँग्रेसचे आमदार म्हणून पृथ्वीराज चव्हाण दक्षिणचे नेतृत्व करू लागले. सध्याही तेच दक्षिणचे आमदार असले तरी डॉ. अतुलबाबा या मतदारसंघात आमदार होण्यासाठी म्हणून पुढे येऊ लागले आहेत. त्यांनी काका बाबांना टक्कर देत त्याठिकाणी यापूर्वी निवडणूक लढवली आहे. त्यावेळच्या मिळालेल्या मतापेक्षा आताच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी मोठी मते मिळवून आपली घोडदौड सिद्ध केली आहे. याच कारणाने त्यांना थांबवणे काका किंवा बाबा गटाला एकट्याने व स्वतंत्रपणे शक्य नाही. म्हणूनच मतदारसंघावर काँग्रेसची पकड कायम ठेवण्यासाठी या दोघांची एकमेकांशी तडजोड गरजेची आहे. त्याला मनोमिलन असे नाव देऊन हे दोघेही यशस्वी राजकारण करत आहेत अशीही चर्चा असते. त्याचाच एक भाग म्हणून यापुढेही हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे राहवा यासाठी काका- बाबा यांनी अप्रत्यक्ष एकत्रितपणेच याठिकाणी भाजपला थांबवले आहे. काकांची पस्तीस वर्षाची मतदारसंघाची बांधणी आहे. पृथ्वीराज बाबांनी देखील दहा वर्षात आपली मोट बांधली आहे. याची बेरीज कायमच राहावी यासाठी ह्या दोघांचे एकत्रीकरण गरजेचे आहे. त्यासाठी उदयदादाना विधान परिषदेवर पाठवून काका- बाबा गटासह मतदार संघातील काँग्रेसदेखील अबाधित ठेवणे महत्त्वाचे आहे.त्याच कारणाने बाबानी साताऱ्यात अचानक जाऊन काकांची घेतलेली भेट होणाऱ्या विधानपरिषदेच्या निमित्ताने काँग्रेससाठी गरजेची व महत्त्वाची मानली जात आहे.
पाहूया...पुढे काय होतय ते...!!

Tuesday, June 16, 2020

नवीन 21 जण सापडले बाधीत ; तालुका निहाय बाधीत रुग्ण यादी

*जिल्ह्यात एकूण 21 जण बाधित..  तालुकानिहाय यादी*
*सातारा* - शाहूनगर - 2, वाढेफाटा
 - 1
*पाटण* - उरुल - 1
*जावळी* - गांजे  - 1
*वाई* - शेलारवाडी - 2
*कराड* - तुळसण- 4, मालखेड -1, तारूख - 1
*फलटण* - वडले - 1
*खटाव* - मायणी -1
*कोरेगाव* - पवारवाडी - 4
*औरंगाबाद जिल्ह्यातील*-1
*पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील* - 1

मोदी सरकारच्या कार्याची माहिती देणाऱ्या पत्रकांचे कराडात वाटप

कराड-
 पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची वर्षपूर्ती झालेच्या निमित्ताने भा.ज.पाचे. सातारा जिल्ह्याध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सोशल डीसटंसिंग पाळून केंद्र सरकारच्या कार्याची माहिती देणाऱ्या पत्रकांचे  शहरातून घरोघरी जाऊन वाटप केले.

यावेळी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी , कराड शहर कामगार आघाडी अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे , कराड शहर चिटणीस प्रमोद शिंदे तसेच राहुल भिसे सुहास चक्के,अभिषेक कारंडे, किरण गुजले आणि  शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, June 15, 2020

उद्योजकांनी भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून घ्यावा ; ना.शंभूराज देसाई

सातारा दि. 15
 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. यामुळे जिल्ह्यातील उद्योग बंद करण्यात आले होते. त्यामुळे परप्रांतीय मजुर आपापल्या राज्यात गेले आहे. लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत, पण त्यांना कुशल कामगारांची कमतरता भासत आहे, तरी जिल्ह्यातील उद्योजकांनी भूमिपुत्रांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज केले.
जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, सहायक आयुक्त कौशल्य विकास  सचिन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.
  जिल्ह्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा,असे आवाहन करुन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई पुढे म्हणाले, एमआयडीसींमध्ये परप्रांतीय मोठ्या प्रमाणात कामावर होते ते आता आपल्या राज्यात निघून गेले आहे त्यांच्या जागी स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्या. एमआयडीसीतील उद्योजकांबरोबर लवकरच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घेऊन बैठक घेतली जाईल व  जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध देण्यासंदर्भात  प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.
एमआयडीसीतील उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाईल. 18 व 19 जून रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगांना कुशल कामगार मिळतील. कामगार विभागाने व उद्योग विभागाने उद्योगांना किती कुशल कामगारांची गरज आहे याची नोंदणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत केल्या.
0000

जिल्ह्यातील 7 जण पुन्हा सापडले कोरोना बाधीत

सातारा दि. 14 (जि. मा. का):  सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या मुंबईहून प्रवास करुन आलेल्या 4 व बाधित रुग्णांचे निकटसहवासित असलेल्या 3 अशा एकूण 7 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये *सातारा तालुक्यातील* गोजेगाव येथील 46 वर्षीय महिला व *क्षेत्रमाहूली येथील 50 वर्षीय पुरुष.
*कोरेगाव तालुक्यातील* अनपटवाडी येथील 65 वर्षीय महिला.
*खटाव तालुक्यातील* बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला,
*खंडाळा तालुक्यातील* झगलवाडी येथील 50  वर्षीय पुरुष
*माण तालुक्यातील* दहिवडी येथील 60 वर्षीय पुरुष व किरकसाल येथील 49 वर्षीय यांचा समावेश आहे.

00

तुळसनच्या 6 जणांची कोरोनावर मात ; कृष्णा हॉस्पिटलमधून 9 जणांना आज दिला डिस्चार्ज

कराड, ता. 15
कराड तालुक्यातील तुळसण येथील 6 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या 6 जणांसह एकूण 9 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 194 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कराड तालुक्यातील तुळसण येथील 60 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय महिला, वडगाव-उंब्रज येथील 49 वर्षीय महिला, कोळकी-फलटण येथील 45 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरूष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

या कोरोनामुक्त रूग्णांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. अरूण पाटील, डॉ. अनिल हुद्देदार, डॉ. संजय पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.


Sunday, June 14, 2020

10 जण सापडले कोरोना बाधीत

सातारा दि. 14 (जि. मा. का): आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 10 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले असून यातील जावळी तालुक्यातील गांजे येथील 48 वर्षीय पुरुष व रविवार पेठ फलटण येथील 70 वर्षीय महिला  या 2 कोरोना बाधितांचा घरीच मृत्यू झाला असून त्यांचे रिपोर्ट मृत्यपश्चात पाझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये *साताऱ्यातील* शाहूनगर येथील 52 वर्षीय पुरुष.
*कोरेगाव तालुक्यातील* पवारवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, चोरगेवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, ग्रामीण रुग्णालयातील 53 वर्षीय महिला स्वच्छता कर्मचारी
*जावळी तालुक्यातील* गांजे येथील घरीच मृत्यू झालेला 48 वर्षीय पुरुष .
*फलटण* येथील मंगळवार पेठ येथील 62 वर्षीय सारीचा पुरुष, व रविवार पेठ येथील घरीच मृत्यू झालेली 70 वर्षीय महिला
*खटाव तालुक्यातील* वडगाव येथील 57 वर्षीय महिला, व बोंबाळे येथील 29 वर्षीय पुरुष
*पाटण तालुक्यातील* दिवशी बुद्रुक येथील 31 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 738 झाली असून कोरोनातून 508 ब-या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 198 इतकी झाली आहे तर  34 जणांचा मृत्यु झालेला आहे.

गरोदर महिलेला झाला कोरोना; साताऱ्यातील खासगी रुग्णालयाचा अहवाल

सातारा येथील खाजगी रुगणालयातून खाजगी प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविलेल्या 23 वर्षीय गरोदर महिलेचा नमुना कोरोना बाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने कळविले आहे.
मायणी कोविड सेंटर येथील 2, बेल एअर हॉस्पिटल पाचगणी येथील 3, कोविड केअर सेंटर पार्ले येथील 2, कोविड केअर सेंटर म्हसवड येथील 1 व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 1 असे एकूण 9 जणांना दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*मायणी कोविड सेंटर* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये  *खटाव तालुक्यातील* पाचवड येथील 56 वर्षीय पुरुष, वांझोळी येथील 52 वर्षीय पुरुष.
*बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये  *महाबळेश्वर तालुक्यातील*  कासवंड गोळेवाडी येथील 36, 62 व 12 वर्षीय महिला.
*कोविड केअर सेंटर, पार्ले* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये  *कराड तालुक्यातील* वानरवाडी येथील 70 वर्षीय महिला व 17 वर्षीय युवती.
*कोविड केअर सेंटर, म्हसवड* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये  *माण तालुक्यातील* दहिवडी येथील 17 वर्षीय पुरुष.
*ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव* येथे दाखल असणाऱ्यांमध्ये  *खटाव तालुक्यातील* निढळ येथील 23 वर्षीय महिला.
            *35 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 16, शिरवळ येथील 13 व पानमळेवाडी येथील 6 असे एकूण 35 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस., पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 728 झाली असून कोरोनातून 508 बऱ्या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 188 इतकी झाली आहे तर  32 जणांचा मृत्यु झालेला आहे.
0000

जुलै पासून टप्याटप्याने शाळा सुरू होण्याची शक्यता


अजिंक्य गोवेकर
कराड
कोरोना प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या शाळांचे सत्र कधी आणि कसे सुरू होणार हा प्रश्न  पालक, विद्यार्थ्यांसह शिक्षण विभागालाही  पडला होता. पण शिक्षण विभागाने यावर टप्याटप्याने शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव तयार केला असून मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे  पाठविला आहे.
         जुलैपासून ऑनलाईन शाळा सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभाग विचार करत असले तरी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून सूट देण्यात आली  आहे. आणि नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग फक्त जुलैमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला असून, त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.
         *त्याचप्रमाणे शाळा सुरु करण्यापूर्वी एक महिना गावामध्ये किंवा परिसरामध्ये कोविड १९ चा रुग्ण आढळला नाही याची खात्री करून शाळा सुरु करण्यात येणार आहे*.      .
       यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला असून त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
      सर्वसाधारणपणे शाळा सुरु करण्यासंदर्भातील वेळापत्रक ठरविण्यात आले आहे, त्यानुसार
         नववी, दहावी, बारावी चे वर्ग जुलै  २०२० पासून
सहावी ते आठवी चे वर्ग  ऑगस्ट २०२० पासून ,
इयत्ता पहिली ते पाचवी चे वर्ग  सप्टेंबर २०२० पासून आणि
अकरावी चे वर्ग  दहावीच्या निकालावर आधारित  सर्व पूर्ततेनंतर  प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती  शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

Saturday, June 13, 2020

आज जिल्ह्यात एकूण 8 जण कोरोना बाधित

सातारा दि. 13 (जि. मा. का):  आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 8 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा  शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये  *सातारा तालुक्यातील* कोडोली येथील 42 वर्षीय पुरुष,  वय 17 व 14 वर्षीय युवती.
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद (आनंदगाव) येथील 38 वर्षीय महिला.
*वाई तालुक्यातील* शेलारवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, बावधन नाका वाई येथील 25 वर्षीय पुरुष.
*कराड तालुक्यातील* तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष
*महाबळेश्वर तालुक्यातील* बेल एयर हॉस्पीटलमध्ये मुळचा चेंबूर मुंबई येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 726 झाली असून कोरोनातून 499 ब-या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 196 इतकी झाली आहे तर  31 जणांचा मृत्यु झालेला आहे.

Thursday, June 11, 2020

जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचा दणका ; आणखी 13 जण सापडले पॉझिटिव्ह

सातारा दि. 11  (जिमाका) :  महाबळेवर तालुक्यातील कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तसेच खटाव तालुक्यातील निढळ येथील 20 वर्षीय गरोदर स्त्रीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्णांमध्ये *फलटण तालुक्यातील* वडाळे येथील 40 वर्षीय महिला, 12  वर्षीय मुलगा, 1 वर्षीय बालक, 89 व 30 वर्षीय पुरुष, बरड येथील 23 व 26 वर्षीय पुरुष.
*खटाव तालुक्यातील* निढळ येथील 20 वर्षीय महिला.
*महाबळेश्वर तालुक्यातील* कुरोशी येथील 55 वर्षीय पुरुष (मृत) या व्यक्तिने गळपास घेवून काल आत्महत्या केलेली होती. मृत्यू पश्चात त्याच्या स्त्रावाचे नमुने घेतले होते त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
*वाई तालुक्यातील* आसरे येथील 55 वर्षीय पुरुष
*जावली तालुक्यातील* ओझरे येथील 5 वर्षाची मुलगी, 34 वर्षीय पुरुष व 25 वर्षाची महिला यांचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 703 रुग्ण आढळले आहेत. 448 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये 223 जणांवर उपचार सुरु असून  30 जणांचा मृत्यु झालेला आहे.
0000

कराडात " आरोग्यम ' उपक्रमाचा संकल्प ; चंद्रकांतदादाच्या आवाहनाला प्रतिसाद ; यशवंत बँकेचाही सहभाग

कराड
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री चंद्रकांतदादा_पाटील यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे यंदाच्या वर्षी "आरोग्यम्' हा उपक्रम संकल्पित करण्यात आला.या उपक्रमास प्रतिसाद म्हणुन आज शेखरजी चरेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय_जनता_पार्टी व यशवंत बँक यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत भवन येथे कराड शहरातील विविध  धार्मिक स्थळांना सॅनिटायजरचे  स्टॅन्डसहित वाटप करण्यात आले.

यावेळीलोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.रोहिणीताई उमेश शिंदे , उद्योजक श्री.मुकुंददादा चरेगांवकर, मा.नगरसेवक श्री.घनश्याम पेंढारकर (काका),उद्योजक श्री ज्ञानदेव राजापुरे साहेब ,श्री.नितीन वास्के , भाजपा कराड शहर उपाध्यक्ष श्री.उमेश शिंदे ,भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाअध्यक्ष सातारा श्री.रुपेश मुळे , श्री. किरण मुळे, श्री.समाधान चव्हाण,श्री.साबीरमिया मुल्ला,अंकुश खैरमोडे, श्री.विजय काटवटे, विनोद पवार , सौरभ शहा व यशवंत बँकचे CEO धनंजय डोईफोडे ,सौ.वैशाली मोकाशी , श्री.रुपेश कुंभार, सौ.श्रध्दा जोशी व पदाधिकारी उपस्थित होते.
  

छ.शिवाजी स्टेडियम परिसरात आयुर्वेदिक काढ्याचे मोफत वाटप


कराड,दि.11(प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, सुखायु फाऊंडेशन आणि ध्यास मंच कराड यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोग प्रतिकार शक्ती वाढविणार्‍या आयुर्वेदिक़ काढ्यांचे मोफत वाटप येथील छ.शिवाजी स्टेडियम परिसरात व्यायामासाठी येणार्‍या नागरीकांना करण्यात आले. नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविणे हा या जनजागृती अभियानामागचा प्रमुख उद्देश आहे.

आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या या आयुर्वेदीक काढ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती व सुखायु फाऊंडेशनच्या माध्यमातून कराड शहरात ठिकठिकाणी कोरोनाच्या लढाईत सक्रिय असणार्‍यांना मोफत वाटप केले जात आहे. हे अभियान गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. येथील छ.शिवाजी स्टेडियम परिसरात सकाळी व्यायामासाठी येणार्‍या नागरिकांना गेल्या एक आठवड्यापासून मोफत आयुर्वेदीक काढ्याचे वाटप केले जात आहे. या काढा वितरणाचा शुभारंभ मुळचे कराडचे व सध्या गडचिरोली येथे कार्यरत असलेले जिल्हा पोलिस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत छ.शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यावेळी सुखायु फाऊंडेशनचे अध्यक्ष वैद्य नचिकेत वाचासुंदर,  रा.स्व.संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख राजेंद्र आलोणे, जिल्हा कार्यवाह श्रीकांत एकांडे, सहकार्यवाह गणेश गिजरे, दादासो मानकर, सचिन जोशी व संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी आरोग्यप्रेमी नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग ठेऊन या काढ्याचा लाभ घेतला. या उपक्रमाचे नियोजन ध्यास मंच कराडचे दीपक खटावकर व त्यांच्या सहकार्‍यांनी केले.

Wednesday, June 10, 2020

आत्ताचा रिपोर्ट ; 17 जण सापडले बाधित ; जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक

सातारा (जि मा का) आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज जिल्ह्यात 17 जण कोरोना बाधित सापडले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

*सविस्तर माहिती थोडा वेळात*

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने लोक भयभीत झाले असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. प्रशासनाची तारांबळ उडाली असून कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस जिल्ह्याभोवती घट्ट होत चालला असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी येणार याच प्रश्नाने प्रशासनाची झोप आता उडाल्याचे दिसते आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात...



Tuesday, June 9, 2020

धक्कादायक ; जिल्ह्यातील आणखी 20 जण सापडले पॉझिटिव्ह

सातारा दि. 10  (जिमाका) : रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कराड तालुका - 12, वाई तालुका - 3, सातारा तालुका - 3, जावली तालुका - 1, फलटण तालुका - 1 असे एकूण 20 जणांचे रिपोर्ट कोरोना बाधित आल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
बाधित रुग्णांमध्ये   *फलटण तालुक्यातील* तांबवे येथील 25 वर्षीय पुरुष.
*जावळी तालुक्यातील*  ओझरे येथील 75 वर्षीय पुरुष.
*कराड तालुक्यातील*  तुळसण येथील 26, 60, 51 वर्षीय पुरुष, 28, 40 वर्षीय महिला, केसे येथील 50,42,64,20 व 60 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष. शिंदेवाडी येथील 42 वर्षीय् महिला.
*वाई तालुक्यातील* वेरुळी  येथील 46 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा , 26 वर्षीय महिला.
*सातारा तालुक्यातील* कुसवडे येथील 19 व 47 वर्षीय महिला, देगांव येथील 55 वर्षीय पुरुष.

Monday, June 8, 2020

18 जण पॉझिटिव्ह सापडले ; प्रशासनाची झोप उडाली ;रुग्ण संख्या अधिकच वाढू लागल्याने वाढली चिंता

 सातारा (जी मा का )आताच आलेल्या रिपोर्टनुसार 18 पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने लोक आता भयभीत झाले असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. प्रशासनाची याच कारणाने  तारांबळ उडाली असून कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस जिल्ह्याभोवती घट्ट होत चालला असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी येणार याच प्रश्नाने प्रशासनाची झोप आता उडाल्याचे दिसते आहे.जिल्ह्यातील रुग्ण संख्या 649 झाली आहे

कोरोनाबाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 5,
वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 1, पाचवड येथील 1
जावळी तालुक्यातील भणंग येथील 1, धोंडेवाडी येथील 1, पिंपळवाड येथील 1
खटाव तालुक्यातील वडगाव येथील 1, पळसगाव येथील 1
महाबळेश्वर तालुक्यातील दाभेकर येथील 1
माण तालुक्यातीन वडजल येथील 3, भालवडी येथील 1
 व भालवडी येथील 1 .



Sunday, June 7, 2020

जिल्ह्यात आणखी 10 जण बाधित ; मृत्यू पश्चात दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा दि. 8 (जिमाका) :  सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोराना बाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्णांमध्ये *वाई तालुक्यातील* पसरणी येथील 75 वर्षीय पुरुष (मृत) व सोमेश्वरवाडी येथील 68 वर्षीय महिला.
*खंडाळा तालुक्यातील* आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा संजीवनी हॉस्पिटल, सातारा येथे उपचारा दरम्यान मृत्यु
 झाला असून या पुरुषाला सारीचा आजार होता.
*खटाव तालुक्यातील* पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष व  विसापूर येथील   71 व 62 वर्षीय पुरुष
*जावली तालुक्यातील* काळोशी येथील 39 वर्षीय महिला व प्रभुचीवाडी येथील 28 व 26  पुरुष व 50 वर्षीय महिला
यांचा  समावेश आहे.

*181 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
 एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार 181 जणं निगेटिव्ह आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
00000

कुख्यात दाऊद इब्राहिम जिवंत आहे,,की मेलाय... हे केंद्र सरकारने जनतेला सांगावे ; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी

मुंबई : कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून भारतीय प्रसार माध्यमातून येत आहेत भारत सरकारने यावर मौन बाळगले आहे त्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे दाऊदचा खरेच मृत्यू झाला की तो जिवंत आहे हे केंद्र सरकारने एकदाचे ठरवून देशाच्या जनतेला सांगावे,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना सावंत पुढे म्हणाले की, दाऊदला कोरोनाची लागण झाल्यानंतर पाकिस्तानच्या कराची येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या भारतातील मुद्रीत तसेच टीव्ही माध्यमातून येत असून यातील सत्य काय आहे याचा खुलासा केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे. दाऊद हा भारताचा शत्रु असून तो भारतासाठी मोस्ट वॉटेंड आहे. पण २०१४ पासूनच दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या पसरवण्याचे अनेक योगायोग झाले असून आतापर्यंत सहा वेळा दाऊद मरुन जीवंत झाला आहे. मोदी सत्तेवर येताच आता दाऊदची खैर नाही, मोदींच्या नेतृत्वामुळे पाकिस्तान भयभीत झाला असून दाऊदही प्रचंड घाबरला आहे, मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर प्रचंड घाबरलेल्या दाऊदने आयएसआयकडे संरक्षण वाढवून देण्यासाठी फोन केला, अशा बातम्या आल्या होत्या. आश्र्चर्य म्हणजे या चॅनेल्सची सूत्रे साक्षात आयएसआय पर्यंत पोहोचली आहेत असे ते स्वत:च म्हणतात. मोदी सरकारने संसदेला दिलेल्या उत्तरात दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही असे सांगितले होते. म्हणून या वाहिन्यांच्या प्रमुखांना ‘रॉ’चे एजंट केले तर देशाला फायदा होईल असे सावंत म्हणाले.

देशातील चॅनेलवर हेडलाईन्स काय यावी हे देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व मोदींचे तथाकथित जेम्स बाँड अजित डोवाल ठरवत असतात अशी चर्चा सुरू असते. जेव्हा जेंव्हा मोदी सरकारच्या विरोधात जनमत तयार होते, लोकांमध्ये नाराजी निर्माण होते, तेव्हा तेव्हा दाऊदला वाहिन्यांवर मारले जाते हा योगायोग दिसून आला आहे. किंवा भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम हे विषय चर्चेला घेतले जातात.दाऊदला फरफटत भारतात आणू अशा वल्गना मोदींसहित भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारसभेत केल्या परंतु आजपर्यंत दाऊदला भारतात आणण्यात त्यांना काही शक्य झालेले नाही. परंतु दाऊदची बेगम मात्र राजरोसपणे देशात मोदी सरकारच्या कार्यकाळात येऊन परतही गेली. नेपाळ हा भारताचा मित्र राष्ट्र पण आता मात्र हा चिमुटभर देशही भारताला डोळे वटारत आहे. चीनने सीमेवर आगळीक केलेली असून चीनचे सैन्य लडाखमध्ये ६० किलोमीटर भारताच्या सीमेच्या आत आले आहे. परराष्ट्रीय धोरण फसलेले आहे. तसेच कोरोनाचे संकट हाताळण्यात मोदी सरकारला मोठे अपयश आले आहे. स्थलांतरीत मजुरांचा प्रश्नही सोडवता आला नाही. स्वातंत्र्यानंतर झालेले सर्वात मोठे स्थलांतर झाल्याचे विदारक चित्र जगाने पाहिले आहे. अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून देशभरात मोदी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कोरोनाच्या अपयशामुळे देशात चिंतेचे वातावरण असून सरकारच्या अपयशावर सर्वत्र चर्चा होत असल्यामुळेच आता दाऊदला पुन्हा मारले गेले अशी शंका जनतेला येत आहे. केंद्र सरकारने हा संशय दूर करण्यासाठी खुलासा करुन सोक्षमोक्ष लावावा,असे सावंत म्हणाले.

Saturday, June 6, 2020

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 10 आमदार होणार निवृत्त ; काँग्रेसच्या 4 तर राष्ट्रवादीच्या 6 आमदारांचा समावेश

कराड
आज विधानपरिषदेतील तब्बल १० राज्यपाल नामनियुक्त सदस्य निवृत्त होणार आहेत.मुदत संपणा-या या आमदारांमध्ये काँग्रेसच्या ४ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६ आमदारांचा समावेश आहे. काँग्रेसचे अनंत गाडगीळ आणि घटक पक्षाचे ( पीपल्स रिपब्लीकन पार्टी ) प्रा.जोगेंद्र कवाडे यांची मुदत येत्या १५ जून रोजी संपत आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी झालेली निवडणूक चांगलीच गाजली असतानाच आज ( शनिवारी ) राज्यपाल नामनियुक्त १० विधानपरिषदेतील आमदारांची मुदत संपत असून,मुदत संपणा-या सदस्यांत प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे.या यादीत काँग्रेसचे ५ राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ तर घटक पक्षांच्या एका आमदाराचा समावेश आहे.विधान परिषदेत असणारे राज्यपाल नामनियुक्त सदस्य हुस्नबानू खलिफे,जनार्दन चांदूरकर,आनंदराव पाटील,रामहरी रूपनवर हे काँग्रेसचे ४ तर प्रकाश गजभिये,विद्या चव्हाण,राहुल नार्वेकर,ख्वाजा बेग,रामराव वडकुते,जगन्नाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आमदार आज शनिवारी ६ जून रोजी निवृत्त होत आहेत.तर काँग्रेसचे अनंत गाडगीळ आणि घटक पक्षाचे ( पीपल्स रिपब्लीकन पार्टी ) प्रा.जोगेंद्र कवाडे यांची मुदत येत्या १५ जून रोजी संपत आहे. असे एकूण १२ आमदार निवृत्त होत आहेत.त्यापैकी राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर,रामराव वडकुते यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा दिल्या कारणाने या दोन जागा रिक्त होत्या. या दोन रिक्त जागेवर सदस्यांची नियुक्ती करावी अशी शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती.मात्र राज्यपालांनी या रिक्त जागेवर नियुक्त्या केल्या नव्हत्या.

साहित्य,कला,समाजसेवा आणि सहकार आदी क्षेत्रातील व्यक्तींची राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करावी अशी तरतूद घटनेत आहे.राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीकडून ज्या  नावांची शिफारस केली जाईल.ती या निकषावर तपासण्याचे काम राज्यपाल काटेकोरपणे करण्याची शक्यता आहे.तिन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी असून,सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे १२ सदस्य राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवले जाणार आहेत.महाराष्ट्र विकास आघाडीमधील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी चार नेत्यांना याद्वारे विधानपरिषदेवर संधी दिली जावू शकते.मंत्रिमंडळाने १२ जणांच्या नावांची शिफारस राज्यपालांकडे केली तरी ते तत्काळ निर्णय घेण्याची शक्यता नसल्याने विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून १२ सदस्यांची नियुक्ती विविध कारणांनी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.हा मुद्दा राजभवन विरुद्ध राज्य सरकार अशा वादाचाही ठरण्याची शक्यता आहे.राज्यपाल या नियुक्त्याबाबत काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

कराड तालुक्यातील तुळसन आणि कसे येथील 2 महिला सापडल्या पॉझिटिव्ह

सातारा दि. 6 ( जि. मा. का )
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या सोळा नमुन्यापैकी कराड तालुक्यातील तुळसण येथील 65 वर्षीय महिला व केसे येथील 32 वर्षीय महिला या दोन महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरित 14 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
     वाई तालुक्यातील  पसरणी  येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 75 वर्षीय पुरुषाचा मुत्यू झाला असून  मृत्यूपश्चात नमुना तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे.
*211 जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला*
वेणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 13 ग्रामीण रुग्णालय वाई येथील 80, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथील 45, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 32 व रायगाव येथील 41 असे 211 अनुमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहितीही डॉ गडीकर यांनी दिली.
00

कृष्णा हॉस्पिटल मधून 23 जण झाले कोरोनामुक्त ; आज दिला डिस्चार्ज

कराड, ता. 6 : सातारा जिल्ह्याच्या विविध भागातील एकूण 23 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 144 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कराड तालुक्यातील म्हासोली येथील 27 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, 71 वर्षीय पुरूष, कलेढोण येथील 45 वर्षीय महिला, सदुर्पेवाडी-सळवे-पाटण येथील 35वर्षीय पुरूष, मोरगिरी-पाटण येथील 72 वर्षीय महिला, दहिवडी-माण येथील 28 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, देगाव-वाई येथील 42 वर्षीय महिला, धामणी येथील 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय युवक, 35 वर्षीय पुरूष, 36 वर्षीय पुरूष, मालनपूर-चिखली-वाई येथील 24 वर्षीय युवक, सिधांतवाडी-वाई येथील 52 वर्षीय पुरूष, मानेचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, आढे-पाटण येथील 35 वर्षीय पुरूष, म्हावशी-पाटण येथील 45 वर्षीय पुरूष, कास-खुर्द येथील 44 वर्षीय पुरूष, शामगाव येथील 38 वर्षीय पुरूष, शिराळ-पाटण येथील 52 वर्षीय महिला, तामिनी-पाटण येथील 7 वर्षीय मुलगी, मोरगिरी-पाटण येथील 65 वर्षीय पुरूष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संतोष टकले, डॉ. राहुल फासे, राहुल माळी, अवधूत अवसरे, श्रीनिवास जोशी, विशाल पाटील, इम्रान इनामदार, रश्मी पंढरपुरे, दीपाली धोत्रे, वनिता नावडकर, श्रीपाद खुपसंगीकर, अस्मिता देशपांडे, नंदिनी चव्हाण, महेंद्र आलाटे यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर,डॉ. विश्वास पाटील, विक्रम पवार यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

आज एकूण 43 कोरोना मुक्त
 जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर खावली येथून 6 व मायणी येथून 2 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे होऊन कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. जिल्ह्यासाठी  चांगली ठरत चाललेली बाब म्हणजे आज अखेर उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या जास्त असून ती  303 इतकी आहे.
बरे होऊन घरी गेलेल्या मध्ये खंडाळा तालुक्यातील घाटदरे येथील 51 व 70 वर्षीय 2 पुरुष, सातारा तालुक्यातील निंब येथील 30 वषी्रय पुरुष,  जावळी तालुक्यातील मोरघर येथी ल 24 वर्षीय महिला व 3 वर्षीय बालक, आणि खटाव तालुक्यातील बनपूरीतील 38 वर्षीय पुरुष व शेळकेवाडी येथील 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
रात्री 8 पर्यंत जिल्ह्यातील कोरोना अपडेट असे आहे, एकूण कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांची संख्या 620 इतकी झाली असून 6835 नमुने हे निगेटिव्ह आले आहेत.  एकूण बाधित रुग्णांपैकी 303 इतके बाधित रुग्ण बरे पूर्णपणे बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.  तर 291 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत कोरोनाने मृत्यु झालेल्यांची संख्या 26 इतकी आहे.
000

लोकशाही आघाडीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा ; शिवछत्रपतींच्या प्रतिमेस केले अभिवादन

कराड
 शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या दिमाखात साजरा होत असताना येथील लोकशाही आघाडीच्या वतीने देखील याच दिवसाचे औचित्य साधून  येथील पालिकेतील लोकशाही आघाडीच्या दालनामध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.यावेळी शिवछत्रपतींच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

यावेळी लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील,नगरसेवक मोहसीन आंबेकरी,शिवाजी पवार तात्या,जयंत बेडेकर,अमित शिंदे,सचिन चव्हाण,महेश पाटील, रोहित वाडकर आदी उपस्थित होते.

Friday, June 5, 2020

आणखी 19 जण पॉझिटिव्ह ; जिल्ह्यात कोरोनाची दहशत वाढली

सातारा दि. 6 (जिमाका) : सातारा जिल्हयातील एकोणीस जणांचे रिपोर्ट काल रात्री उशिरा कोविड बाधित आले आहेत. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे वडगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष कोविड बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे मेंदुच्या पक्षाघाताची लक्षणे होती. अशी माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.
काल रात्री उशिरा प्राप्त  झालेल्या रिपोर्टनुसार *फलटण तालुक्यातील होळ* येथील 7 व तांबवे येथील  6.
*कराड तालुकयातील तुळसण* येथील 5.
*खंडाळा तालुक्यातील शिरवळ* येथील 1.
यामध्ये 3 ते 65 वर्षे वयोगटातील अकरा पुरुष व आठ महिलांचा समावेश असुन एक जण प्रावास करुन आलेला व अठरा जण कोविड बाधित रुग्णांचे निकट सहवासित आहेत.
000000

कराड तालुक्यात सापडले दोन जण पॉझिटिव्ह

सातारा दि. 5 (जिमाका)
कराड तालुक्यातील वडगाव उंब्रज येथील 49 वर्षीय महिला व 86 वर्षीय पुरुष असे दोन जणांचा रिपोर्ट कोरोना  (कोविड 19) बाधित आहेत. तसेच 9 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*6 जणं कोरोनामुक्त*
कोविड केअर केंद्र खावली ता. सातारा येथील 2 व   कोविड  केअर केंद्र, रायगाव ता. जावली येथील 4 असे एकूण 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
*215 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 68, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 15, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 6, ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथील 93, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 33 असे एकूण 215 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
00000

Thursday, June 4, 2020

जिल्ह्यातील 18 जण सापडले पोझिटिव्ह ; रुग्ण संख्येत पडली आणखी भर ; चिंता वाढली

सातारा दि. 5 (जिमाका)
 सातारा जिल्हयातील अठरा जणांचे रिपोर्ट कोविड बाधित आले आहेत. यातील मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या गुरसाळे गावठाण ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला होता. या पुरुषाचा मृत्यु पश्चात रिपोर्टही पॉझिटिव्ह आला  आहे, अशी माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
बाधित रुग्णांमध्ये *खटाव तालुक्यातील* साठेवाडी येथील 76 वर्षीय महिला, गुरसाळे गावठाण येथील 75 वर्षीय पुरुष
(मृत)
*खंडाळा तालुक्यातील* अर्बन सिटी धनगरवाडी 50 वर्षीय महिला
*सातारा तालुक्यातील* समर्थनगर कोंडोली सातारा येथील 19 वर्षीय युवक, करंडी येथील 25 वर्षीय महिला
*कराड तालुक्यातील* वानरवाडी येथील 70 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवती
*फलटण तालुक्यातील* जोरगाव येथील 25 वर्षीय महिला, 21 वर्षीय युवक व 12 वर्षांचा मुलगा, कोळकी येथील
25 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला.
*जावली तालुक्यातील* प्रभूचीवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, कावडी येथील 15 वर्षाचा मुलगा, 58 वर्षीय पुरुष,
 47 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक.
*माण तालुक्यातील* वडजल येथील 55 वर्षीय पुरुष
*175 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
तसेच एन.सी.सी.एस. पुणे यांनी 175 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचेही कळविले आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
00000

...तर नव्याने पुरवणी अर्थसंकल्प मांडणे गरजेचे ; आ.पृथ्वीराज चव्हाण यांचे मत

कराड
कोरोना महामारीच्या लॉकडाउन मुळे निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक परिस्थितीत केंद्र शासनाने १ फेब्रुवारी ला सादर केलेले वार्षिक अंदाजपत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ करीता अंदाजित केलेले राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) कर व कराशिवाय महसूल, कर्जाद्वारे उभा करावयाचा निधी तसेच विकास कामांवरील नवीन  प्राधान्यक्रम अशा सर्वच आकड्यांचे संदर्भ बदलले आहेत यासाठी अर्थसंकल्पाची फेरमांडणी होणे गरजेचे आहे.म्हणून संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प मांडणे गरजेचे असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराजबाबानी ट्विटर वरून व्यक्त केले आहे.

२२ मे रोजी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी संबोधित केलेल्या पत्रकार परिषदेत भारताचा आर्थिक विकासदर उणे राहील असा अंदाज वर्तवला आहे. गोल्डमन सॅक्स, नोमुरा यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी सुद्धा यावर्षी भारताचा आर्थीक विकासदर उणे ५-७ टक्के असेल असे अंदाज वर्तविले आहेत.
लॉकडाऊन सुरू होण्या पूर्वीपासूनच भारताची अर्थव्यवस्था सतत घसरत होती. २०१९-२० आर्थीक वर्षातील अर्थव्यवस्थेचा विकासदर फक्त ४.२% नोंदवला गेला आहे, जो या दशकातील नीचांकी विकासदर आहे. हे सर्व लक्षात घेता संसदेच्या जूनमध्ये सुरु होणाऱ्या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी नवीन अर्थसंकल्पाची फेरमांडणी करून बदललेल्या परिस्थितीत महसूलाची स्थीती, कर्ज काढण्याबद्दलचे अंदाज तसेच खर्चाची प्राथमिकता, विकासखर्चात संभाव्य कपात ही सर्व माहिती संसदेसमोर सादर केली पाहिजे आणि संसदेची नव्याने मंजूरी घ्यावी अशी मागणी मी करत आहे असेही त्यांनी म्हटले आहे

नवी मुंबई,ठाणे महापालिका क्षेत्रातील लोकांना जिल्हाअंतर्गत प्रवास करता येणार


मुंबई : राज्य सरकारने आज आदेश जारी करून राज्यातील लॉकडाऊनच्या नियमावलीत काही बदल केले आहेत. नव्या आदेशानुसार मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये  प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.त्यामुळे आता ठाणे,नवी मुंबई,कल्याण-डोंबिवली,बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन विभागातील  महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करता येणार आहे.

राज्य सरकारने पाचव्या लॉकडाऊन मध्ये जिल्ह्याअंतर्गत वाहतूकीस बंदी केली होती यामुळे मुंबई महानगरीय क्षेत्रात कामानिमित्त प्रवास करणे शक्य नव्हते.राज्य सरकारने आज जारी केलेल्या नव्या आदेशात खासगी कार्यालये काही अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे.तसेच यामुळे राज्य सरकारने कायद्यात बदल केला आहे आणि एमएमआरडीए क्षेत्रात वाहतूक परवानगी दिली आहे. या नव्या आदेशानुसार मुंबई एमआरआर रिजनमध्ये  प्रवासाची परवानगी देण्यात आली असल्याने ठाणे,नवी मुंबई,कल्याण-डोंबिवली,बदलापूर या मुंबई मेट्रोपोलिटन विभागातील  महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवास करणे सुलभ झाले आहे.

Facebook

खासगी कार्यालये 8 जून पासून होणार चालू ; राज्य सरकारचा आदेश जारी

मुंबई
लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊनमधून शिथीलता देण्यास  सुरुवात करण्यात केली असून, येत्या ८ जूनपासून राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश आज राज्य सरकारने जारी केला आहे. खासगी कार्यालये ही १० टक्के कर्मचा-यांच्या हजेरीत सुरू करता येवू शकतील असे या आदेशात म्हटले आहे.

राज्य सरकारने राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमधून आता काही प्रमाणात शिथीलता देण्यास सुरूवात केली आहे.राज्य सरकारने आज एक आदेश जारी करीत येत्या ८ जूनपासून राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्याची परवानगी दिली आहे.अशी कार्यालये सूरू करताना १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी (यापैकी जे जास्त असेल) त्यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकता असे या आदेशात म्हटले आहे. इतर कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करावे लागेल.आपली कार्यालये सुरू करताना कंपनीला कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घ्यावा लागणार.अशा कार्यालयातून कर्मचारी घरी परतल्यानंतर कोणालाही लागण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

येत्या रविवारपासून वृत्तपत्रे घरपोच वाटण्यास परवानगी देण्यात आली आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनी वृत्तपत्र घरपोच देणाऱ्या तरूणांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे व त्यांना मास्क, सॅनिटायझरसारख्या सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.त्याच बरोबर विद्यापीठ आणि महाविद्यालय,शैक्षणिक संस्थांचे कार्यालयाचेही कामकाज सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये केवळ शिकवण्याचे काम करणारे कर्मचारी यांना वगळून इतर कर्मचा-यांना कार्यालयात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ई शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे,उत्तरपत्रिका तपासणे आणि निकालाचे काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आणखी एक जण सापडला पॉझिटिव्ह

सातारा दि. 4 (जिमाका)
 कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या 16 नमुन्यांपैकी खटाव तालुक्यातील वडगाव येथील 75 वर्षीय पुरुष कोविड बाधित आला असून उर्वरित 15 नमुने निगेटिव्ह आले आहेत. तसेच काल 3 जून रोजी पाठविण्यात आलेल्या सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथील 16 जणांचे नमुनेही निगेटिव्ह आले आहेत. असे एकूण 31 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*161 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 23, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 28, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 14, ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथील 52, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 33 व रायगाव येथील 11 असे एकूण 161 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस., पुणे यांच्याकडे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 579 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 254 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 301 रुग्णांवर उपचार सुरु असून 24  जणांचा मृत्यु झालेला आहे.

0000

महिला पोलीस अधिकाऱ्यांसह 5 जण झाले कोरोनामुक्त ; आज दिला डिस्चार्ज

कराड, ता. 4
कराड तालुक्यातील उंब्रज येथील रहिवासी असणाऱ्या 29 वर्षीय महिला पोलिस अधिकाऱ्याने कोरानावर यशस्वी मात केली. त्यांच्यासह कोरोनावर मात करणाऱ्या 5 जणांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

उंब्रज येथील 29 वर्षीय महिला मुंबई येथे पोलिस दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सेवेत असतानच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यावेळी त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यशस्वी उपचाराने त्यांनी कोरोनावर मात केली असून, त्या आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यांच्यासह वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक, 25 वर्षीय महिला, सदुर्पेवाडी-सळवे-पाटण येथील 30 वर्षीय महिला आणि नवारस्ता - पाटण येथील 12 वर्षीय मुलगी अशा एकूण 5 जणांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी पोलिस उपनिरीक्षक दीपज्योती पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी जमदाडे, कृष्णा अभिमत विद्यापीठातील भक्ती जोशी, मेघा पाटील, गोपालकृष्ण जोशी, वरद जंबगी यांच्या हस्ते या कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

*चौकट*

*‘कृष्णा’च्या नैतिक आधारामुळे मिळाले कोरोनाशी लढण्याचे बळ*

कोरोनाची बाधा झाल्यावर सर्वांनाच खूप मोठा मानसिक धक्का बसतो. मलाही जेव्हा कोरोनाची बाधा झाली तेव्हा अशाच मानसिक अवस्थेतून जावे लागले. पण कृष्णा हॉस्पिटलमधील सर्वच डॉक्टर्स व अन्य स्टाफने दिलेल्या नैतिक आधारामुळे, तसेच घेतलेल्या विशेष काळजीमुळे माझ्यासह अनेकजण कोरोनावर मात करून बरे होऊ शकले आहेत. त्याबद्दल मी कृष्णा हॉस्पिटलचे आभार मानते.
- कोरोनामुक्त महिला पोलिस अधिकारी

*सोबत : फोटो व व्हिडिओ*

Wednesday, June 3, 2020

आणखी 7 जण सापडले पॉझिटिव्ह ; जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ होतेच आहे

सातारा दि. 4 (जिमाका)
 रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार सातारा जिल्हयातील 7 जणांचे रिपोर्ट कोरोना  (कोविड 19 ) बाधित आल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
      यामध्ये कराड तालुक्यातील खराडे 15 वर्षीय युवक व शिंदेवाडी विंग येथील 15 वर्षीय युवक, शेणोली स्टेशन येथील 14 वर्षीय युवती, वाई तालुक्यातील डुईचीवाडी येथील 15 वर्षीय युवती, सातारा तालुक्यातील कुसबुद्रुक येथील 16 वर्षीय युवक, खटाव तालुक्यातील निढळ येथील 26 वर्षीय् महिला तसेच कारंडवाडी ( देगाव रोड )ता.सातारा  येथील 65 वर्षीय महिला.

Tuesday, June 2, 2020

पुन्हा 15 जण पॉझिटिव्ह सापडले

सातारा दि. 3 (जिमाका)
 रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथील 62 वर्षीय पुरुष, 24 व 55 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील वाहगाव येथील 34 वर्षीय पुरुष, काटवली येथील 29 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील वावदरे येथील 45 वर्षीय महिला, माणगाव-अतित येथील 35 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 2 वर्षीय बालक, दिवशी मारुली येथील 29 वर्षीय पुरुष, नवसारी येथील 55 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 55 वर्षीय महिला, माण तालुक्यातील दहिवडी येथील 19 वर्षीय युवक, कराड तालुक्यातील तुळसण येथील 62 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, फलटण तालुक्यातील कोळकी येथील 54 वर्षीय सारी आजाराचा पुरुष, असे एकूण 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
*3 जणांचा मृत्यु पश्चात अहवाल निगेटिव्ह*
बोपेगाव ता. वाई येथील 85 वर्षीय महिला, गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिलेचा व वेळेकामती ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुषाचा मृत्यु पश्चात घेण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आला आहे.
*कोळकी येथील एका कोरोना बाधिताचा मृत्यु*
फलटण तालुक्यातील कोळकी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेला 54 वर्षीय कोरोना बाधितचा मृत्यु झाला आहे.
*208 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह*
काल रात्री   प्राप्त झालेल्या अहवालानुसार 208 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
मुंबई येथे खासगी प्रयोगशाळेत तपासणी करुन आलेल्या दिवड ता. माण येथील 29 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय,सातारा येथे दाखल करुन उपचार सुरु आहेत.
0000

एका बाधिताचा मृत्यू ; एक जण सापडला मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह

सातारा दि. 2 ( जि. मा. का )
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा  येथे दि. 22 मे रोजी दाखल असलेला अंधोरी ता. खंडाळा येथील 43 वर्षीय (सारीचा रुग्ण)  कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच रांजणी ता.जावळी  येथील मुंबई वरुन प्रवास करुन आलेल्या  85 वर्षीय महिलेचा मृत्यू पश्चात अहवाल  पॉझिटिाव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण दोन कोरोना बाधित  रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तसेच हडपसर पुणे येथून प्रवास करुन आलेला 27 वर्षीय पुरुष  व मुंबई येथून प्रवास करुन आलेला वेळेकामथी  ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू प्रश्चात नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 556 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 223 रुग्ण बरे झाले आहेत.तर 310 रुग्णांवर उपचार सुरु असून 23  जणांचा मृत्यु झालेला आहे.

00000

Monday, June 1, 2020

नवे 18 बाधीत सापडले ; जिल्ह्याला कोरोनाचा विळखा घट्ट ; प्रशासनापुढे पेच कायम

 कराड
आताच हाती आलेल्या रिपोर्टनुसार 18 नवे बाधित सापडले आहेत म्हणजेच आज दिवसभरात एकूण सगळे मिळून 40 रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याची नोंद झाली . जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने लोक भयभीत झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाच तारांबळ उडालीआहे.कोरोना दिवसेंदिवस कमी होण्याचे नावच घेत नसल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी येणार याच प्रश्नाने प्रशासनाची झोप आता उडाली असल्याचे दिसते आहे. आज रात्री उशिरा 18 जण नवे पॉझिटिव्ह झाल्याची बातमी आल्यावर प्रशासनाची पुन्हा पळापळ झाली. दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने लोक भयभीत झाले आहेत.रुग्ण संख्या आता कोणत्याही परिस्थितीत आटोक्यात येणे महत्वाचे आहे

18 बाधित तालुकानिहाय आकडेवारी

▪️कराड - वानरवाडी 4

▪️पाटण - जांभेकरवाडी 1
▪️वाई - दह्याट 1
▪️महाबळेश्वर - हरचंदी 1, कासवंड - 3
▪️सातारा - कुस ( बु.) -2
▪️जावळी - रांजणी1,आंबेघर 1
▪️खंडाळा - शिरवळ - 1
▪️माण - पिंपरी - 3

आज जिल्ह्यात पुन्हा रुग्ण वाढले ; 17 पॉझिटिव्ह सापडले ; प्रशासन पुन्हा हडबडले ; दिवसभरात झाले 22 रुग्ण

सातारा दि. 1  (जिमाका)
 सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले  आहेत. तसेच  मुंबईवरुन आलेल्या व घरीच क्वॉरंटाईन असेलल्या बोपेगांव ता.  वाई येथील रक्त दाबाचा त्रास असलेल्या  85 वर्षीय महिला. सारीचा आजार असलेली गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिला तर 15 वर्षापूर्वी कॅन्सरने आजारी असलेला 29 मे रोजी  मुंबई येथून आलेला 52 वर्षीय पुरुष अशा 3 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पश्चात त्यांच्या घाशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
बाधित रुग्णांमध्ये   *फलटण* तालुक्यातील बरड येथील 55 वर्षीय महिला, वडाळे येथील 35 वर्षीय पुरुष.
*जावळी* तालुकयातील गवडी येथील 52 वर्षीय महिला, काळोशी येथील 41 वर्षीय पुरुष, केळघर (सोळशी) येथील 39 वर्षीय महिला.
*कराड* तालुक्यातील  विंग येथील  43 वर्षीय महिला,  19 वर्षीय तरुण.
*पाटण* तालुक्यातील काळेवाडी येथील 21 वर्षीय  महिला, नवसरेवाडी  येथील 25 व 22 वर्षीय पुरुष.
*खंडाळा* तालुक्यातील शिरवळ येथील 72 वर्षीय महिला.
*खटाव* तालुक्यातील  अंभेरी येथील 3 व 6 वर्षीय बालीका, 29 वर्षीय पुरुष.
*महाबळेश्वर* तालुक्यातील हरचंदी येथील 53 वर्षीय महिला, गोरोशी येथील 72 वर्षीय महिला.
*वाई* ग्रामीण रुग्णालयातील 24 वर्षीय महिला आरोग्य सेवक.
000000

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची शंभरी ; जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली शाबासकी

कराड, ता. 1 : सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 19 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 100 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या योगदानाचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी शेखर सेह यांनी केले आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या टप्प्यातच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा तुलनेने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यातही कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदविस वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारास प्रारंभ झाला आणि 18 एप्रिल रोजी कराड तालुक्यातील पहिल्या असणाऱ्या तांबवे येथील कोरोनामुक्त रूग्णाला टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्टिलटने यशस्वी उपचाराने कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना, सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्याची मालिकाच सुरू केल्याने लोकांमधील कोरोनाबद्दलची भिती कमी होण्यास मदत झाली. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 100 व्या कोरोनामुक्त रूग्णाला कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये गावडेवाडी येथील 20 वर्षीय युवक, उंब्रज येथील 40 वर्षीय पुरूष, म्हासोली येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी, शिराळ-पाटण येथील 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, भरेवाडी-पाटण येथील 36 वर्षीय पुरूष, बनपुरी-पाटण येथील 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय युवक, 48 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगा, 8 वर्षीय मुलगा, शितपवाडी-पाटण येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा, 19 वर्षीय युवक, ढेबेवाडी फाटा येथील 23 वर्षीय पुरूष, 44 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगी अशा एकूण 19 जणांचा समावेश आहे.

यावेळी कोरोनाची लढाई यशस्वीपणे जिंकलेल्या या कोरोनामुक्त रूग्णांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. सिंह म्हणाले, कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 100 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ही आपल्या जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कोरोनामुक्तीच्या या लढाईत डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व अन्य स्टाफने अमूल्य योगदान दिले आहे. सातारा जिल्ह्यात अद्ययावत व अत्याधुनिक आरोग्यविषयक सोयीसुविधा असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलमुळे आज याठिकाणी 100 रूग्ण कोरोनामुक्त होण्यात यश प्राप्त झाले असून, मी डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व टीमचे सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष अभिनंदन करतो.

दरम्यान, कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोरोना विशेष वॉर्डकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच अन्य रूग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत कमी कालावधीत कृष्णा हॉस्पिटल व्यवस्थापनाने तयार करण्यात आलेल्या या विशेष मार्गाचे कौतुक केले.

याप्रसंगी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, कॉन्ट्रॅक्टर दिपक रैनाक यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.