माजी आ बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक व लोकशाही गटाचे सक्रिय कार्यकर्ते जयंत बेडेकर यांनी नवरात्रीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी शहरात फ्लेक्स लावले होते त्यावर नेते माजी आ बाळासाहेब पाटील यांच्या फोटोसह आमदार डॉ अतुलबाबा यांचाही फोटो होता त्यामुळे होणाऱ्या शहरातील नगरपालिका निवडणुकीत या दोन नेत्यांचे मनोमिलन होणार असल्याचे यातुन संकेत मिळत आहेत का? अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे
सामाजिक कार्यकर्ते जयंत बेडेकर हे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे निष्ठावन्त म्हणून ओळखले जातात केवळ वार्डातच नाही तर संपूर्ण शहरात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते नेहमीच 24x7 मदतीसाठी पुढे असतात त्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या या प्रवृत्तीचा अनेकांना सामाजिक फायदा झालेला दिसूनही येतो
त्यांच्या पत्नी सौ बेडेकर या कराड पालिकेच्या मागील एका झालेल्या निवडणुकीतून नगरसेविका म्हणून पालिकेत निवडून गेल्या होत्या मात्र यावेळी सोमवार पेठेतून लोकशाही आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून जयंत बेडेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे ..नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत जयंत बेडेकर यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले यांचा प्रचार केल्याचे ते स्वतःउघडपणे सांगतात दरम्यान अतुल भोसले यांना लोकशाही गटातील अनेकांनी या निवडणुकीत मदत केल्याची चर्चाही शहरात असते.. आमदार भोसले यांच्या गावातील अनेक कार्यक्रमातून लोकशाही गटाचे काही माजी नगरसेवक उपस्थित असलेले दिसतात.. त्यामुळे या एकूणच शहरातील वातावरणामुळे होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चे नेते बाळासाहेब पाटील व भाजप चे अतुल भोसले हे पक्षीय झूल बाजूला ठेवून गटपार्टीचे राजकारण करत एकमेकाला मदत करणार का? अशा चर्चा यानिमित्ताने आहेत ...
माजी नगरसेवक सुहास पवार यांनीही याच दोन नेत्यांचे फोटो आपल्या फ्लेक्सवर लावत शहरात जोरदार आखाडी साजरी केली होती त्यावेळी देखील अशीच चर्चा पालिका निवडणुकीच्या निमित्ताने झाली होती.....त्याचे कारण असे की...माजी नगरसेवक सुहास पवार तसेच जयंत बेडेकर हे दोघेही माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर व पहिल्या फळीतले समर्थक आहेत... आणि अशा कट्टर समर्थकांच्या फ्लेक्स बोर्डवर जर... आमदार अतुलबाबा झळकत असतील तर मग होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर यातूनच पडद्याआड मनोमिलनाचे राजकारण शिजतय का ? अशी शंका घेण्यासाठी वाव आहे अशीही गावात चर्चा आहे...
No comments:
Post a Comment