कृष्णा विश्वविद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त आ डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक व भाजपचे शहर उपाध्यक्ष अभिषेक भोसले यांच्या मित्रमंडळच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते तसेच काही शासकीय योजनांचा लाभ देखील यावेळी अभिषेक भोसले मित्रपरिवाराच्या वतीने नागरिकांना देण्यात आला
कराडच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक नगरपरिषद शाळा क्रमांक १० मध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी १५० हुन अधिक नागरिकांनी या सर्व आरोग्य व शासकीय अशा एकूणच सर्व उपलब्ध सेवांचा लाभ घेतला.
यावेळी अभिषेक भोसले मित्रपरिवाराच्या वतीने लाडकी बहीण KYC अपडेट, वय वंदना, आयुष्मान भारत,कास्ट सर्टिफिकेट, डोमासेल, रेशनकार्ड अपडेट अश्या सर्व शासकीय योजना येथील नागरिकांसाठी राबवण्यात आल्या या सर्व योजनांचा लाभ गरजू नागरिकांनी यावेळी घेतला
त्यासोबतच यावेळी मोफत सर्व रोगनिदान शिबीरामध्ये सर्जरी,स्त्रीरोग बालरोग कान नाक घसा,नेत्ररोग त्वचारोग दंत चिकित्सा तसेच फिजिओथेरपी,मानसोपचार आदी आजारावर मोफत उपचार तपासणी व मोफत औषधे देण्यात आली.या शिबिरास कृष्णा चारिटेबल ट्रस्ट कडून डॉक्टर्स आणि औषधे मोफत सेवा देण्यात आली.
यावेळी स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला १५० हुन अधिक नागरिकांनी यावेळी उपलब्ध सेवांचा लाभ घेतला.
भाजपा कराड शहर अध्यक्ष मा. सौ. सुष्मा लोखंडे, ऍड. सौ. तबस्तुम मुल्ला, सौ. काटवटे व भाजपा पदाधिकारी त्या सोबत कराड दक्षिणचे आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा. श्री. दिलीप जाधव आणि सागर माने, ओंकार ढेरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमेटी अध्यक्ष मा.श्री.राहूल भोसले, श्री. सुदेश थोरवडे मा. श्री. सुनिल थोरवडे, श्री. शिवराज इंगवले, श्री. भावेश शहा, श्री. किशोर आठवले, श्री. सागर लादे, श्री. विवेक भोसले, श्री. नितीन भोसले,श्री. वाजीद मुल्ला, श्री. संतोष मुटेकर, श्री. विकी वाघमारे, मा. सुमित कांबळे, वैभव आवळे,मंगेश वीर, अतिश थोरवडे, निखिल साळुंखे, राहूल थोरवडे, रोहित कांबळे, अनिकेत वास्के
तसेच विविध पदाधिकारी आणि वेगवेगळ्या स्थानिक कमेटी, बचत गटातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भेट दिली.
No comments:
Post a Comment