Friday, October 10, 2025

वेध माझा शी बोलताना श्री पेंढारकर म्हणाले... नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मागणी करणार ; कराडातील भाजपचे निष्ठावन् कार्यकर्ते श्री पेंढारकर यांची रिंगणात उतरण्याची तयारी ;

वेध माझा ऑनलाईन
 भाजप चे निष्ठांवत कार्यकर्ते व माजी नगरसेवक घन:श्याम  उर्फ श्री पेंढारकर कराड नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असे त्यांनी वेध माझा शी बोलताना सांगितले त्यांच्या या उमेदवारीची मागणी ते पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचेही ते म्हणाले

कराडातील भाजपचे निष्ठावान नेते म्हणून ओळख असलेले श्री पेंढारकर यांनी संघ स्वयंसेवक म्हणून शालेय जीवनापासून सामाजिक कार्याची सुरुवात केली.  त्यानंतर जनसंघाचे पणती या चिन्हावर काम केले नंतर जनता पार्टीच्या हलधर या चिन्हावर काम केले. आणि आता भाजपाच्या स्थापनेपासून भाजपच्या विचाराने कमळ या चिन्हावर काम करत आहेत. 

तसे पाहिले तर कराड शहरांमधील भाजपामध्ये काम करणाऱ्या जुन्या, एकनिष्ठ, हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. भाजपा विरोधीपक्षाची भूमिका बजावत असताना अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. कधीही भाजप च्या विचारांशी फारकत त्यांनी घेतली नाही. काही काळासाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना संधी मिळाली त्यात त्यांनी शहरातील अनेक कामे करत त्या संधीचे सोने केले सोशल मिडीया माध्यमाचा देखील आपल्या सामाजिक कामासाठी त्यांनी उपयोग करत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे निरसन केले व त्यांच्या अडचणी सोडवल्या 

प्रत्यक्षात देखील अडचणीच्या ठिकाणी जाऊन ते तक्रारीचे निरसन करताना नेहमीच दिसतात त्यासाठी ते 24 x7 गावात हजर असतात आजही त्यांचे हे काम अविरत चालू आहे . लोकांना आपलंच वाटणार आणि साधी राहणी असणारे व्यक्तिमत्व नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरणार असल्याने त्यांच्या आतापर्यंतच्या एकूणच सामाजिक बांधीलकीचा विचार करून त्यांना शहराच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी मागणी ते भाजप नेतृत्वाकडे करणार आहेत असेही ते म्हणाले आहेत

No comments:

Post a Comment