अखेर जाधव गटासह संपूर्ण जनशक्ती आघाडीचा भाजप मध्ये प्रवेश होणार हे आता नक्की झालं आहे अशी माहिती आहे या महिना अखेरीस म्हणजे येत्या मंगळवारी हा प्रवेश होणार आहे मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल असे समजते या विषयाबाबत आमदार अतुल भोसले यांनी जाधव यांच्याशी चर्चा केली होती ती चर्चा यशस्वी झाली असल्याची माहिती आहे माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी यासाठी मध्यस्थी केली होती दरम्यान संपूर्ण जनशक्ती आघाडीचे सर्व मेम्बर्स भाजप मध्ये मुंबईत जाऊन प्रवेश करणार आहेत अशी माहिती आहे
दरम्यान कराडच्या नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी ओपन आरक्षण पडले आहे त्यामुळे भाजप सहित शिवसेना व काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी आहे बरीच नावे चर्चेत आली आहेत त्यामध्ये या रेसमध्ये किती जण राहतात व कितीजण नुसतीच चर्चा करतात हे लवकरच कळणार आहे त्यातच शहरांतील जाधव गटाची एन्ट्री भाजप मध्ये होणार अशीही चर्चा बरेच दिवस होत आहे मात्र भाजप बरोबर जाधव गटाची बैठक होऊन या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात संपूर्ण जनशक्ती चा मुंबईत भाजप प्रवेश होईल यावर शिक्का मोर्तब झाले आहे असे कळते
अरुण जाधव शारदाताई जाधव व आशुतोष जाधव यांच्यासह एकूण 8 ते 10 जण हा प्रवेश करतील असे समजते
या सर्वांनी भाजप मध्ये यावे यासाठी स्वतः आमदार डॉ अतुल भोसले प्रयत्नशील व इच्छुक आहेत आणि त्यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे जनशक्तीचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक अतुल शिंदे यांच्यावर जाधव गटाच्या भाजप प्रवेशाची जबाबदारी आहे आणि अतुल शिंदे यांच्याच मध्यस्थीने यासंबंधीची बैठक 2 दिवसापूर्वी पार पडली होती ती बैठक यशस्वी होऊन मुंबईत या संपूर्ण गटाचा शेवटच्या आठवड्यात भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे
No comments:
Post a Comment