कराड येथील News Bharat 24 च्या ब्युरो चीफ आणि Daily Latest News च्या प्रतिनिधी पत्रकार विद्या मोरे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अमरावती येथे पार पडलेल्या संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या बैठकीस केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय संपर्कप्रमुख रवींद्र मेंढे, सातारा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे हे उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीबद्दल कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पत्रकार विद्या मोरे यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार डॉ. अतुल बाबा भोसले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवासजी पाटील, रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार, तहसीलदार कल्पना ढवळे, प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे, यशवंत आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, लोकशाही आघाडीचे नेते सुभाषराव पाटील, लोकसेवा आघाडीचे नेते जयवंत पाटील, तसेच कराडमधील सर्व आजी-माजी नगरसेवक आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्ह्याचे माजी पदाधिकारी यांनीही सौ. विद्या मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment