Saturday, October 11, 2025

"आपला माणूस' म्हणून ओळख असलेले नेते अतुल शिंदे कराडच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत ; तिकीट मिळाल्यास अतुल शिंदे भाजपकडून इच्छुक ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजप कडून अनेक नावे समोर येत आहेत त्यातच युवा नेते अतुल शिंदे यांचे नाव देखील अग्रक्रमाने शहरात चर्चेत आहे... वेध माझा शी बोलताना ते म्हणाले...भाजप कडून तिकीट मिळाल्यास मी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून  इच्छुक आहे...

सध्या शहरात नगराध्यक्ष कोण होणार?याबाबत तर्क वितरक लावले जात आहेत चौका चौकात चर्चा सुरू आहेत कोण निवडून येणार? कोण पडणार ? याही चर्चा रंगल्या आहेत असं असताना युवा नेते अतुल शिंदे हे देखील भाजप च्या गोटातूननगराध्यक्षपदाच्या चर्चेच्या शर्यतीत पुढे आहेत
अतुल शिंदे हे आमदार डॉ अतुल भोसले व उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे निकटवर्तीय मानले जातात... शहरातील जनशक्ती आघाडीचे ते उपाध्यक्ष आहेत त्यांनी या त्यांच्या पदाचा राजीनामा देत सम्पूर्णपणे भाजप चे काम स्वीकारले आहे... ते भाजप चे अधिकृत सदस्य देखील आहेत... तसेच ते स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील शहराला परिचित आहेत... त्यांचे वडील नगरसेवक आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून सर्वांना परिचित होते...
त्यांच्या मातोश्री नगरसेविका म्हणून दोन वेळा निवडून येत यापूर्वी शहराला परिचित होत्या... त्यांचे कराड दक्षिण व उत्तर मध्ये परिचित लोकांचे मोठे जाळे आहे... अतुल शिंदे यांनी आमदार भोसले यांच्या नुकत्याच झालेल्या आमदारकीवेळी महत्वाची भूमिका बजावत पहील्या फळीतील काम पाहीले आहे... आणि त्यांना आमदार होण्यासाठी शहरात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे...  
सध्या शहराच्या नगराध्यक्षपदासाठी ओपन आरक्षण पडले आहे... आणि भाजप कडून सर्वाधिक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरू इच्छित आहेत... मात्र युवा नेते अतुल शिंदे  यांची "राजकीय पाटी' अद्याप 'कोरी" आहे असल्याने भाजप मधून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे...अर्बन बँकेच्या माध्यमातून  लोकांना सर्वतोपरी सहकार्य करत त्यांचे सामाजिक कार्य समाजात सुरूच आहे...
अनेक गणेश मंडळे तसेच सर्वच समाजातील सण उत्सवासाठी त्यांचे सर्वतोपरी सहकार्य नेहमीच असते... त्यांचा मित्रपरिवार राजकारण विरहित आणि खूप मोठा आहे... सर्वांच्यात त्यांची प्रतिमा आपला माणूस अशीच आहे... आणि म्हणूनच शहरातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा भाजप गोटात जोरदार सुरू आहे...

No comments:

Post a Comment