कराड नगरपरिषदेच्या रिंगणात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अनेकजण शड्डू ठोकून उमेदवारीसाठी तयार आहेत भाजप मात्र या निवडणुकीत नवीन चेहरा उमेदवार म्हणून बाहेर काढून सर्वांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे तो नवीन चेहरा कोण?याचीच चर्चा यानिमित्ताने शहरात सुरू आहे
दरम्यान ओपन नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत असल्याने कोणतीच पार्टी किंवा राजकीय पक्ष युती किंवा आघाडी करण्याच्या मनस्थितीत नाहीये कारण प्रत्येकाला या पदासाठी निवडणूक लढवायची आहे... कारण एखाद्या पार्टीकडे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार नसेल... तर ती नामुष्कजनक बाब असल्याने प्रत्येकाला यात स्वतंत्रपणे उतरावे लागणार आहे
दरम्यान शहरातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना,लोकशाही आघाडी तसेच एम आय एम तसेच काँग्रेस व भाजप हे सगळे राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत त्यामुळे यासाठी इच्छुक उमेदवारांची नावे देखील पुढे आली आहेत त्यातील कोण उमेदवार चालेल हे आताच सांगू शकत नाही, आता या उमेद्वारांबद्दल शहरात फक्त चर्चा सुरू आहेत त्यात आता भाजप कडून एका नव्या चेहऱ्याला उमेदवार म्हणून पुढे करून धक्कातंत्र अवलंबल जाईल अशी शक्यता आहे
भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक उमेदवार इच्छुक आहेत जिल्ह्यात खासदार भाजप चा... सर्वाधिक आमदार भाजप चे... अशी अवस्था आहे... आणि माजी नगराध्यक्षा देखील बऱ्यापैकी भाजपच्याच होत्या... असे असल्यामुळे एकूण जिल्ह्यात भाजप कडून या पदासाठी क्लेम सांगितला जात आहे....
कराडात भाजप कडून याच धर्तीवर राजकीय ड्रीष्ट्या "कोरी पाटी' असलेला उमेदवार जाहीर होणार अशी दाट शक्यता आहे
त्यातच आता दिवाळी सण नुकताच संपन्न झाला आहे त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी खर्या अर्थाने आता सुरू होणार आहे त्यामुळे भाजप नेतृत्वाकडून कधी एकदा त्या "नवीन' चेहऱ्याच्या उमेदवाराची घोषणा होते याचीच शहराला प्रतीक्षा लागली आहे
भाजप ने अनेक ठिकाणी असे प्रयोग करत राज्यभरात नवीन चेहरे दिले आणि निवडूनही आणले आहेत...
ही स्टेटजी राबवताना भाजप ने अनेक स्थानिक स्वराज संस्थेत व इतर निवडणुकीतदेखील यापूर्वी हा प्रयोग ऐनवेळी केलाय आणि धक्काही दिला आहे...असाच प्रयोग कराड पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत भाजप करेल अशी अशी माहिती मिळत आहे...आमदारकी आणि खासदरकीच्या निवडणुकीला देखील भाजपने हीच स्टेटजी बऱ्याच ठिकाणी अवलंबली आहे
कराड चे भाजप शहर अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी पेच निर्माण झाला असता तो निर्णय बराच काळ प्रलंबित ठेवला गेला त्यानंतर मात्र राष्ट्रवादी च्या नगराध्यक्षा म्हणून कराडमध्ये ज्यांनी यापूर्वी यशस्वीपणे काम पाहिले आहे अशा सौ सुषमा लोखंडे यांची अचानकपणे वर्णी लावून भाजप ने शहराला धक्काच दिला...असाच धक्का शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबद्दल भाजप यावेळी देणार असेही वृत्त आहे
No comments:
Post a Comment