वेध माझा ऑनलाईन
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रायगडमधील संघर्ष चांगलाच पेटला आहे. पालकमंत्री पदावरून सुरू झालेली राजकीय कुरघोडी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी तीव्र झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी दिवाळीतच मोठा धमाका केला आहे. रायगडमध्ये गोगावले यांनी सुनील तटकरे यांना धक्का दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथीची सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सुनील तटकरे आणि अजितदादा पवार यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे विकास गायकवाड यांनी आज अधिकृतपणे शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.
मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या घटनाक्रमामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
No comments:
Post a Comment