कराडच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांचा कराड शहरातून गाठी-भेटीवर जोर देत लोकसंपर्क ठेवण्याचा झपाटा सध्या सुरू आहे यातून त्यांचा एकप्रकारे प्रचाराचा झंझावातच शहरातून सुरू असल्याचे चित्र दिसत आहे...दरम्यान लग्न, कार्य, वाढदिवस अशा कार्यक्रमाना उपस्थिती लावत तसेच दिवाळी शुभेच्छा देत यादव सध्या थेट लोकसंपर्कात दिसत आहेत
गेली दोन दशके नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांची सेवा करत शहरातील सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे तसेच पालिकेत सभापती पदासह उपनगराध्यक्ष पद भूषविलेले यादव आता नगराध्यक्षपदाच्या होणाऱ्या निवडणुकीत उमेदवार म्हणून सज्ज आहेत...
त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे... हिंदू- मुस्लिम तसेच सर्वच धर्मीयांमध्ये त्यांचा सन्मान आहे... 24x7 त्यांचे लोककार्य चालूच असते...
राजेंद्रसिंह यादव यांनी गेल्या दोन दशकात शहराची सेवा केली आहे... सर्व धर्मातील सण साजरे होताना त्यांचे सहकार्य व मदतीचा हात कायमच देत त्यांनी आपली बांधीलकी नेहमीच जपली आहे...
कोविड मध्ये देखील त्यांनी शहरात खूप मोठं काम केलं आहे...
पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोट्यवधी रुपयेचा निधी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून खेचून आणला...शहरातील सुविधा आणखी प्रगल्भ करण्यासाठी त्यांनी आजही प्रयत्न सुरू ठेवले आहेत...बेरोजगार युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी "जॉबफेअर' मेळाव्याचे आयोजन करत सातत्याने ते प्रयत्नशील असतात ...शिक्षण, आरोग्य, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यात त्यांचा हातभार व सहकार्य नेहमीच असते... त्यांची नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार म्हणून शहरात चर्चा आहे...
No comments:
Post a Comment